इतिहासातील हरवलेलं एक पानं.
राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )
साक्षात छत्रपतींच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे निभावून नेत असतानाच, मोंगली फौजांच्या टेहळणी पथकांना गुंगारा देत, मोगली सैन्याची लांडगेतोड पण चालू च होती.यातच बादशाही फर्मानाप्रमाणे काकरखानाच्या बरोबरीने काही मराठा सरदारांनी पण राजाराम महाराजांशी लढाई ची तयारी केली होती. पण या तीनही बंधूंच्या सजग बाण्याने आणि गनिमी कावा यशस्वी पणे राबवत राजाराम महाराज या सर्वातून सहिसलामत निसटले.
रायगड व पन्हाळगड या दोन्ही ठिकाणी राजकुटूंबाचृया संरक्षणाची जबाबदारी निभावत असतानाच या त्रिवर्ग बंधूंनी केवळ मोगली सैन्यालाच नव्हे तर दस्तुरखुद्द औरंगजेबाला ही दहशत बसेल असे धाडशी, कल्पक आणि अद्भुत कृत्य करण्याचा बेत केला आणि तो प्रमाणाबाहेर यशस्वी पण अमलात पण आणला.
साहजिकच, मोगल छावणीवरच्या , गुलालबार च्या यशस्वी मोहीमेनंतर, गुलालबार येथील बादशाही तंबू जमीनदोस्त करुन तंबू चे सुवर्णकळस कापून घेऊन मोगली छावणीच्या गोंधळलेल्या मनस्थितीत असतानाच घोरपडे बंधू आपल्या सहकाऱ्यांना घेऊन बाहेर पडले. आणि सिंहगडाच्या नजीकच्या डोंगराळ भागात आले. तेथुनच त्यांनी तडक रायगड गाठला, रायगडाला वेढा घालून बसलेल्या इतिकाद खानाच्या फौजेवर हल्लाबोल केला. इथे मोगली सैन्याचे पाच हत्ती, काही शस्त्रास्त्रे व काही सामान घेवून अतिशय जलद गतीने पन्हाळा गाठला. या प्रसंगात घोरपडे बंधूंनी दाखविलेल्या साहसी कल्पक धैर्यामुळेच, छ. संभाजी महाराजांच्या दुर्दैवी वधानंतर मराठी सैन्याने गमावलेला आत्मविश्वास पुनः मिळवलेला दिसून येते.
No comments:
Post a Comment