मिरज प्रांतातील मराठा सुभेदार खंडोबा येदेव (यादव) यास रामचंद्र पंत आमत्याने संताजी घोरपडे यांच्या सरदेशमुखी संबंधीत पत्र पाठवलेले.
संभाजी माहाराजांच्या नंतर संकटकाळात संताजी घोरपडे यांनी स्वराज्याचे रक्षन करुन औरंगजेबास दहशत कशी लावली याचे वर्णन पंताने केले आहे.
राजश्री खंडोबा येदव यादव देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पास माहाल मिरज प्रांत गोसावी. अखंडीत लक्ष्मी अलंकृत राजमान्य सेवक रामचंद्र निळकंठ आमत्या नमस्कार सु ।। सुलास तीनसेन आलफ राजश्री संताजी बिन म्हाळोजी घोरपडे सेनापती लष्कर यांसी राजश्री छत्रपती स्वामी कर्नाटकात जाते समई ईकडे गनिमाची धामधूम बहुत होऊन कुल दूर्गे हस्तगत केली होती राज्यामध्ये काही अर्थ उरला नव्हता कुल मराठे यांही ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहूतच एकनिष्ठ धरुन ईमानास खाता करुन गनिमाकडे गेले याही राजश्रीच्या पायासी बहुतच एकनिष्ठ धरुन ईमानास न खाता करता जमाव करुन सेख निजाम व सर्जाखान व रणमस्तानखान व जानसारखान येस उमदे वजीर बुडविले. जागा जागा गनिमास कोटगा घालुन नेस्तनाबुद केला आणि देश सोडविला राज्य रक्षणतेच्या प्रसंगास असाधरन श्रम केले औरंगजेबास दहशत लाविली. पुढे कितेक स्वमी कार्याचे ठायी हिमंत धरिताती. या करिता यावरी संतोशी होउन मामले मिरज कार्यात सत्ताविस येथील देशमुख होते नेस्तनाबुद झाले त्यांचे वंशी कोनी ना त्याचें मुतालिक होते तेबळाउन देशमुखी वतन खात होते तेहडी बुध्दी धरून गनिमास मिलोन फिसात केली एकनिष्ठ धरुन ईकडे भेटले नाहीत म्हणून त्यांची देशमुखी दुर करून मशार जिल्हेस राजारामला देशमुखी आपले मजकुराचे आवलाद व अफलादपुत्रपौत्र दिल्हि असे तरी मामले मजकुराची देशमुखी यांचे दुमला करणे जानिजे. निदेश समक्ष.
या पत्राची तारीख होती - 9 जुलै इ.स.1692.
-सरदार
No comments:
Post a Comment