post by
सतीशकुमार शिवाजीराव राजे सोळंके-चाळुक्य
एक पराक्रमी निदर्शक पडनाव टोळे !
------------------
------------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
------------------.........
'टोळे' हा अनेकवचनी शब्द 'टोळ' या खतरनाक एकवचनी शब्दापासून बनलेला दिसतो. त्यामुळे 'टोळ’ या एकवचनी शब्दाच्या अनेकवचनी सर्वनामास 'टोळे' म्हणत असावेत. प्राचीन काळी शेतकऱ्यांच्या शेतात टोळधाड आली तर ती झाडपाल्यासहित अख्या पिकांना फस्त करून जायची. असे सांगितले जाते, की जाताना हे टोळ त्या शेतकऱ्यांच्या शेतात मल-मूत्राद्वारे काहीतरी केमिकल सारखा प्रकार सोडून जायचे, ज्याने पुढील दोन तीन वर्ष तरी टोळधाड आलेली ही शेती नापिक व्हायची. त्यामुळे टोळधाड आलेल्या शेतकऱ्याला किमान पुढील तीन-चार वर्ष तरी अनेक संकटे झेलत अन्नान्नदशेत जीवन जगण्याची वेळ येई! पूर्वीच्या काळी टोळधाड हा प्रकार नित्य व्हायचा. म्हणून टोळधाडीची जरब प्रत्येक शेतकऱ्यास असायची!
राजे साळुंखे चाळुक्य राजवंशात अनेक पडनावे असून ही नावे पडल्याची अनेक कारणे सांगितली जातात. ज्यामध्ये व्यक्तीगुण, पराक्रम, दिसणावळ, ढब, संबंध, वागणूक, दासीपुत्र, पदव्या वगैरे वगैरे गोष्टी कारणीभूत असतात. राजे साळुंखे राजवंशात 'टोळे' हे एक प्रतिष्ठित पराक्रमी पडनानाव असून, 'टोळ' या एकवचनी शब्दापासून बनलेल्या अनेक वचनी 'टोळे' शब्दात पराक्रम वाचक अर्थ दडलेला दिसतो. ज्यामुळे राजे साळुंखे राजवंशातील घेरादातेगड भागात नेमणूक केलेल्या या वंशजांना पुढील काळात 'टोळे' अशा पडनावाने ओळखले गेले.
राजे साळुंखे चाळुक्य राजवंशातील 'टोळे या पडनावाच्या शब्दाच्या पराक्रमी अर्थाला समजून घ्यायचे झाल्यास सर्वात अगोदर त्यांच्या गावाच्या भौगोलिक परिस्थितीवर प्रकाश टाकणे महत्वाचे वाटते! सातारा जिल्ह्यातील पाटणच्या पश्चिमेस असलेल्या घेरा दातेगड किल्ल्याच्या माचीवर 'टोळे'या राजे साळुंखे वंशजांचे गाव आहे. यावरूनच टोळे यांचा प्राचीन पराक्रमी इतिहास लक्षात येतो. कारण गडाच्या पायथ्याला राजे साळुंखे चाळुक्यांची राजधानी पाटण हे नगर आहे. चाळुक्यांच्या अभिलेखात राजधानी नगराला ते पाटण म्हणत असत. यावरून सातारा शहर बदामी साळुंखे चाळुक्य काळापासून त्यांची राजधानी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे राजे साळुंखे निर्मित किल्ला आणि त्यांच्या पायथ्यावरील त्यांच्या राजधानीच्या मध्ये गडाच्या माचीवर महत्वपूर्ण जागी नेमणूक असलेल्या टोळे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आहे. नाहीतरी राजवंशाकडून गडाच्या महत्वपूर्ण माचीवर नेमणूक केलेले लढवय्ये क्षत्रिय लेचेपेचे कसे असतील? अशा राजवंशाकडून महत्वाच्या ठिकाणी विश्वासू, निर्भीड, लढाऊ आणि पराक्रमी लोकांनाच नेमणुकीस ठेवले जात असावे.
विशेष म्हणजे घेरादातेगडावर राजे साळुंखे चाळुक्यांच्या वास्तु निर्माण शैलीच्या काही ठळक खुणा दिसून येतात. किल्ल्यावर चाळुक्य राजवंशाच्या काही परिवार देवता आणि त्यांचे टोटेम्स आज देखील इतिहासकारांना आकर्षून घेतात. घेरादातेगड गडावरील ही शिल्प वैशिष्ट्ये किल्ल्याचे निर्माण राजे साळुंखे चाळुक्य राजवंशाचे केल्याचे सूचित करताना दिसतात. बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या म्हणजे इ.सनाच्या सहाव्या सातव्या शतकातील घेरा दातेगड या किल्ल्याचे निर्माण असावे. बदामी चाळुक्यांनी सातारा शहर बसवल्यानंतर या भागात ग्रामे आणि बृहद्ग्रामे निर्माण करताना घरातील अनेक वंशजांना या ठिकाणी नेमणुकी दिल्या. हा प्रकार उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या काळापर्यंत सुरू होता. साताऱ्यातील साळुंखे वंशजांची गडकरी आळी ते साताऱ्याजवळील देगाव पाटेश्वर पासून सातारा जिल्ह्यातील पाटण पर्यंत अनेक महत्त्वाच्या ठिकाणी राजे साळुंखे यांनी वंशातील वंशजांना नेमणुकी दिल्या. म्हणून देगाव पाटेश्वर पासून ते पाटण पर्यंत एका मोठ्या चौरस पट्ट्यात साळुंखे राजवंशाच्या वतनाची अनेक प्राचीन गावे दिसून येतात. यावरून राजे साळुंखे यांनी 'टोळे' वंशजांना घेरा दातेगड भागातील महत्त्वाच्या स्थानावर सातव्या आठव्या शतकात नेमणुकीस ठेवले असावे.
टोळे यांना मोठा पराक्रमी इतिहास असावा हे त्यांच्या 'टोळे' या पडनावावरून लक्षात येते. पूर्वीच्या काळी हे टोळे प्रतिस्पर्ध्यावर चढाई करताना तशी चढाई करत असावेत, की पुढील चार पाच वर्ष तरी त्या प्रतिस्पर्ध्यास पुन्हा लढाई करण्याची इच्छा व्हावी! टोळे यांनी प्रतिस्पर्ध्यावर केलेली सामूहिक चढाई मुळे प्रतिस्पर्ध्याचे होणारे नुकसान आणि टोळधाडीने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान यामध्ये काहीतरी साम्य असावे; म्हणून राजे साळुंखे चाळुक्यांच्या या वंशजांना लोकांतून टोळाची उपमा दिलेली असावी. ज्यावरून प्रतिस्पर्ध्यावर सामूहिक हल्ला करणाऱ्या या लोकांची पुढील काळातील ओळख टोळे अशी झाली असावी हे पटण्याजोगे वाटते.
आज टोळे यांचा रहिवास घेरा दातेगड माचीवर असलेल्या टोळेवाडी, पाटण शहर, मोराची तालुका माळशिरस, माली पारगाव तालुका माजलगाव वगैरे वगैरे गावात दिसून येतो. यांची महाराष्ट्रभर अजून गावे विखुरलेली असावीत, मात्र माहिती अभावी त्यांचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. टोळेवाडी येथे राजेश साळुंखे चालुक्य राजवंशाचे परिवार आणि कुलदेव असलेल्या श्री काळ भैरवा चे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असले तरी, नवीन मंदिराचा निर्माण काळ खूप अलीकडचा वाटतो. साळुंखे राजवंशातील टोळे यांचा प्राचीन इतिहास पराक्रमी असावा हे त्यांच्या पडनावावरूनच लक्षात येते. मात्र नंतरच्या मुस्लिम आणि मराठेशाहीच्या काळात ही यांचा पराक्रमी इतिहास असावा मात्र तो सूत्रबद्ध लिहलेला नसल्याने याठिकाणी मांडणे अवघड होऊन बसते.
आज बऱ्याच जणांना 'टोळधाड' हा शब्द माहितीही नसेल. जास्त नाही पण शे दोनशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्यात 'टोळधाड' विषयी जी भीती होती, ती आज दिसत नाही. पूर्वीच्या काळी टोळधाड आली तर ही टोळधाड शेतातील अख्ख्या पिकांना फस्त करून जायची. टोळ ही अर्थपटेरा या श्रेणीतील प्रजाती असून वाळवंटी टोळांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात घातक समजले जाते. टोळ मोठ्या संख्येने एका देशांतून दुसऱ्या देशात जातात. टोळधाड येण्यापूर्वीचा पिकाचा हिरवागार परिसर टोळधाड होऊन गेल्यानंतर ओसाड आणि उजाड होतो. इतके हे टोळ शेतकऱ्यांचे नुकसान करून जातात. भारतात टोळधाडी आल्याचे पुरातन काळापासून नमूद झाले आहे. टोळांचे मोठे थवे शेतकऱ्यांच्या पिकावर टोळधाड करतात. महाराष्ट्रात शेवटची टोळधाड १९६० ला आली होती.
टोळ अभ्यासकांच्या मते संधिपाद संघातील कीटक प्रवर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात. टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आलेले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर सर्वत्र आढळत असून आफ्रिका खंडात त्यांचा उपद्रव जास्त आहे. स्थल आणि रंगानुसार त्यांना वाळवंटी, प्रवासी, मुंबई, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मोरक्की, डोंगरी, तांबडे व तपकिरी टोळ अशी नावे देण्यात आली आहेत. भारतात शिश्टोसर्का ग्रिगेरिया ही जाती मोठ्या प्रमाणावर आढळते. तिच्यामुळे वनस्पतींचे अतोनात नुकसान होते.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment