विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 7 July 2021

आदिशक्ती दुर्गा अर्थात महिषासुरमर्दिनी 👇👇👇 राजे साळुंखे चाळुक्यांची पारिवार देवता

 


आदिशक्ती दुर्गा अर्थात महिषासुरमर्दिनी

👇👇👇
राजे साळुंखे चाळुक्यांची पारिवार देवता
-------------------
--------------.........✍️
सतीशकुमार सोळंके-देशमुख
@
राजे साळुंखे चाळुक्यांनी दुर्गा देवीची अनेक मंदिरे बांधलेली आढळून येतात. शिवाय दुर्गादेवीच्या शिल्पालाही साळुंखे राजांनी अनेक मंदिरावर कोरलेले दिसते.
------------------------
साळुंखे राजवंशाचा
वैभवशाली इतिहास
------------------------
दुर्गा ही राजे साळुंखे चाळुक्यांची पारिवार देवता आहे. त्यामुळे या राजांनी दुर्गा देवतेला त्यांच्या वास्तुनिर्माण शैलीमध्ये वरच्या दर्जाचे स्थान दिलेले दिसून येते. चाळुक्यांच्या काळात दुर्गा देवीच्या पूजनाचे मोठे प्रचालन होते. या काळात तिच्या अनेक रूपांना आराधिले जात होते. तिने आदिशक्तीचे रूप घेऊन चंड, मुंड, शुंभ, निशुंभ इत्यादी राक्षसांचा संहारही केला. त्यात महिषासुराचा संहार करणारी जी देवी तिलाच दुर्गा अर्थात महिषासुरमर्दिनी म्हटले जाते.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्यांच्या अनेक अभिलेखातून दुर्गेला आपल्या वंशाची पारिवारिक देवता मानलेले दिसते. बीम्रा, जि. नांदेड येथील इ. सन ११२२ च्या शिलालेखानुसारही दुर्गेला राजे साळुंखे चाळुक्यांची पारिवारिक देवता असल्याचे म्हटले आहे. मत्स्यपुराण, रूपमंडन आणि देवीमहात्म्य यामध्ये देवीच्या या रूपाला 'कात्यायनी' म्हटले आहे. रंभ नावाच्या दैत्याला महिषीपासून जन्माला आलेल्या महिषासुर या पुत्राने ब्रह्मदेवाची आराधना केली. ब्रह्मदेवाचे त्याला वरदानही बाभले. मात्र स्त्री शिवाय दुसऱ्याच्या हातून मृत्यू येणार नाही असे त्याला ब्रह्मदेवाचे लाभलेले वरदान होते. स्त्रीला अबला असल्याचे समजून आपल्याला तिच्यापासून भीती नसल्याच्या अविर्भावात तो वागू लागला.
महिषासुराने देवतांचे पराभव करून इंद्र, अग्नी, सूर्य, चंद्र, वायु, यम, ब्रह्मा, वरून इत्यादींचे अधिकार वापरण्यास त्याने प्रारंभ केला. स्वर्गावरही त्याने अधिकार प्राप्त केला, तेथून त्याने देवतांना हुसकावून लावले. महिषासुराने पराजित केलेल्या सर्व देवतांनी ब्रह्मा-विष्णू-महेश यांची प्रार्थना केली. त्यावेळी या तिन्ही देवांच्या मुखातून अपूर्व तेज बाहेर पडून ते एकत्र झाले. या तेजातून जी स्त्री उत्पन्न झाली, त्याच स्त्री महाशक्तीला 'दुर्गा' म्हटले जाते.
दुर्गेचे वाहन सिंह असून तिला वेगवेगळ्या देवतांकडून आयुधे मिळाली. खडगे, ढाल, डमरू, त्रिशूल, वज्र, धनुष्यबाण, चक्र, शंख, पद्म, परशु, शलाका, अंकुश, पाश, मुद्गल, कट्यार, गदा, मुंड, खेटक, ध्वज, आरसा, शक्ती, अक्षमाळा, दंड, घंटा, पानपात्र अशी महिषासुरमर्दिनीची आयुधे आढळून येतात. देवीला चार- आठ-दहा -सोळा -अठरा- वीस हात आढळून येतात. दुर्गेच्या निरनिराळ्या रूपांचे वर्णन मिळते. तिने महिषासुराचा वध केला आणि पुन्हा दैवी संपत्ती व समृद्धीची स्थापना केली. त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी म्हणतात. दुर्गादेवी अर्थात महिषासूरमर्दिनीचे स्तन सुपुष्ट, विशाल नेत्री, सुंदर मान असते. तिच्या रूपाला चंडी सुद्धा म्हटले जाते.
‌‌दुर्गा अर्थात महिषासुरमर्दिनी ही राजे साळुंखे चाळुक्यांची पारिवारिक देवता असल्यामुळे त्यांच्या बदामी, वेंगी, गुजरात आणि कल्याण सर्वच शाखांनी त्यांच्या वास्तूकला व शिल्प निर्मितीत मोठ्या प्रमाणावर स्थान दिलेले दिसून येते.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
डॉ. नीरज साळुंखे,
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
👉मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
👉ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
👉एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
👉"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
👉9422241339,
👉9922241339.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...