Post By
कंबोडियातील प्राचीन हिंदू मंदिरे !
--------------------
--------------------
......................
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
आग्नेय आशियातील कंबोडिया देशात अनेक हिंदू मंदिरे आहेत, या मंदिरांचे निर्माण बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांच्या निर्मितीतील असण्याचा मोठा संभव वाटतो. सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर राजे साळुंखे चाळुक्य नरेश पुलकेशी दुसरा याचा मुलगा विक्रमादित्य आणि नातू विनयादित्य या दोघांचाही आग्नेय आशियाशी जवळचा संबंध आला होता. या काळात भारतीय संस्कृतीचा या भागात बराच प्रसार झाला होता. त्यामुळे हे देश भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली आलेले देश होते. याला इतिहासकार बृहत्तर भारत म्हणतात.
---------
श्लोक :
----------
तारकारातिरिव दैत्यबलमतिसमुद्धतं
त्रैराज्यकान्चीपतिबलमवष्टभ्य क-
रदीकृकमेरपारसिकसिहळादि द्वीपाधीपस्य सकलोत्तरपथनाथ-
मथनोपार्ज्जितोरज्जितपालिध्वजादिसमस्तपारमैश्वर्य्यचिन्हस्य
विनयादित्यसत्याश्रयश्रीपृथ्वीवल्लभमहाराजाधिराजपरमेश्वरभट्टारकस्य ---
--------------
बदामीच्या साळुंखे चाळुक्यांचा आग्नेय आशिया देशांशी खूप जवळचा संबंध आलेला होता. बदामी नरेश विनयादित्य साळुंखे चाळुक्याने आग्नेय आशियातील अनेक देशात विजयी यात्रा करून त्या-त्या देशांकडून मोठमोठ्या खंडण्या काढल्या होत्या. याचे समकालीन चाळुक्य अभिलेख उपलब्ध आहेत. कंबोडियामध्ये अनेक प्राचीन हिंदु मंदिरे असून ही मंदिरे बदामी चाळुक्यांची निर्मिती मंदिरे असण्याची मोठी शक्यता वाटते. या मंदिरांकडे पाहिल्यानंतर बदामी चाळुक्यांची मंदिर निर्माण कार्यशाळा असलेल्या ऐहोळेची कोणाला पण आठवण होईल अशी या मंदिरांची रचना वाटते.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर बदामी नरेश विनयादित्य साळुंखे चाळुक्य राजाने त्याच्या कारकीर्दीत आग्नेय आशियावर मोठ्या स्वार्या केल्या होत्या. यामध्ये त्याने खमेर, पारसिक, कंबोडिया आणि सिंहल या सागर द्वीपाकडे आपला मोर्चा वळवला होता. या देशातील विजयी यात्रा करून विनयादित्य साळुंखे चाळुक्य राजाने त्यांच्याकडून मोठा मोठ्या खंडणी वसूल केल्या होत्या.
याविषयाची राजे साळुंखे चाळुक्यांच्या अभिलेखातून सुद्धा माहिती आली आहे. ती आपण सदरील लेखात वरती पाहिलेच आहे.
सार्वभौम चक्रवर्ती सम्राट सत्याश्रय पुलकेशी दुसरा याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाचा म्हणजे पहिल्या विक्रमादित्याचा तब्बल चाळीस वर्षाच्या राज्यकाळातील बहुतेक काळ युद्धातच गेला. सतत युद्ध मोहिमांवर असल्यामुळे त्याच्या पश्चात त्याचा मुलगा युवराज विनयादित्य याने चाळुक्य राज्याचा कारभार पाहिला. त्यामुळे राज्यकारभाराचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे राजा झाल्यानंतर त्याने त्याचा कार्यकाळ अनेक विजयी यात्रा करून गाजवला. दक्षिणेतील बहुतेक विजय हे विक्रमादित्य याच्या काळातील असले तरी त्याच्या सोबतीने या मोहिमांत विनयादित्य याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध राहिलेला होता. त्यामुळे दक्षिणेतील बऱ्याच विजयी मोहिमांचे श्रेय विनयादीत्याला मिळते. पार्शिया, श्रीलंका आणि आग्नेय आशियातील कंबोडिया खमेर येथील समकालीन राजकीय अस्थिरता लक्षात घेतल्यास त्या देशाकडून विनयादीत्याने मोठमोठ्या खंडण्या वसूल केल्याची सत्यता लक्षात येते. बदामी चाळुक्यांच्या काळात भारताचा अग्नेय अशियातील व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध खूप वाढलेला होता, त्यामुळे हे देश भारतीय संस्कृतीच्या प्रभावाखाली आलेले देश होते. याला इतिहासकार बृहत्तर भारत म्हणतात. चाळुक्य काळातील भारतीय संस्कृतीच्या भारताबाहेरील प्रसाराची माहिती दुर्दैवाने आपल्याकडे कमी अन् विदेशी साधनांमधूनच जास्त मिळते.
( अपूर्ण )
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर, डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.,
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,
मुख्य आयुर्विमा सल्लागार LIC,
ऑल इंडिया चेअरमन्स क्लब मेंबर
एम.डी.आर.टी. यू.एस.ए.
"अग्निवंश",
सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड
9422241339,
9922241339.
No comments:
Post a Comment