विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे भाग ४

 इतिहासातील हरवलेलं एक पानं.

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )

भाग ४
जिंजीच्या प्रवासाची तपशीलवार माहिती केशव पंडित याने लिहिलेल्या ' राजाराम चरितम्' या संस्कृत काव्यग्रंथात मिळते.
बहिर्जी हिंदुराव यांच्या संदर्भातील केशव पंडिताने वर्णलेले काही प्रसंग...
राजाराम महाराज गोकाक,सौंदत्ती वरून पुढे जातांना त्या भागातील मोगली अधिकारी यांना बातमी लागले मुळे त्यांनी महाराजांच्या पाठलागावर आपल्या सैनिकांना सोडले. महाराजांना हेरांकरवी हे कळताच 'थोर घोरपडे घराण्यांतील बहीर्जी व मालोजी मदतीस आले '
केशव पंडिताने पुढे म्हणलं आहे...
आपले लोक मोगल सैन्याने वेढलेले पाहून राजा बहिर्जी ला म्हणाला... ' हे शुर बहीर्जी, मोगलांच्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. तू आता मला सहाय्य कर... ' तेव्हा त्या साहसी पुरुषाने राजाला आपल्या खांद्यावर घेऊन, मोगल सैन्यसागर व तुंगभद्रा नदी ओलांडून मार्ग काढला.
जिंजीच्या वाटेवरच बिदनुर च्या राणी चन्नम्मा च्या राज्यात असाच एक जीवावर बेतणारा प्रसंग आला असता मोगली सैन्याच्या गराड्यातून राजे बहीर्जी हिंदुराव आणि मालोजीराजे नी मोठ्या युक्तीने, साहसाची शर्थ करत महाराजांना बाहेर काढून नेले.
'मासिरे आलमगिरी' या फारसी ग्रंथात वर्णील्याप्रमाणे..
मोगल सेनाधिकार्याने राजाराम व त्याच्या सहकाऱ्यांवर एके रात्री छापा घातला. मोठीच चकमक उडाली. तीत रुपाजी भोसले याने शत्रुबरोबर हातघाई चालू ठेवली व राजाराम आणि बहिर्जी घोरपडे यांना पळून जाणेस वाट उपलब्ध करून दिली. सर्व बाजूंनी मोगली सैन्याचा गराडा असता बहीर्जी राजाराम महाराजांना घेऊन निसटले.
याच फारसी ग्रंथात बहीर्जी राजेंनी छत्रपती ना कसे सुरक्षित ठेवले याची माहिती दिली आहे.
केशव पंडिताने जिंजीच्या प्रवास वर्णनामध्ये बहीर्जी हिंदुरावांचा गौरवपर उल्लेख केला आहे...
सर्वे तुरंगामारुढा: प्रलपंत: परस्परं
तत: श्रीरामसेवायै भैरजीक: समागमत्
युतो मल्लजिता भ्रात्रा वरघोरपडान्वय:
भवशाली रुपसिंह: स्वसैन्येय समन्वित:
जिंजीचा लढा... १६९८ पर्यंत चालला पण याच दरम्यान बंधू संताजींचा मराठ्यांच्या अंतर्गत दुहीमुळे मृत्यूमुखी पडला... हा घाव तर बहीर्जी ना अत्यंत जिव्हारी बसला.
मुख्यत्वे याच कारणास्तव बहीर्जी ना स्वतंत्र राज्याची कल्पना सुचली. त्यांच्या पूर्वीच्या जहागिरी च्या जवळपास कर्नाटकात घोरपड्यांचे राज्य स्थापन करण्याची इर्षा त्यांनी मनात धरली. आणि तसे जोमाने प्रयत्न सुरू केले. बहिर्जी नी गुत्तीचा किल्ला जिंकून घेतला होता. हाच किल्ला नंतरच्या मुराररावांच्या काळात या प्रदेशाचे प्रमुख सत्ताकेंद्र बनला ( याच प्रदेशात घोरपडे घराण्याची जहागीर होती जी शहाजी महाराजांच्या काळात घोरपडे घराण्यांतील वाटणीत आपला भाग म्हणून मिळाली होती)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...