इतिहासातील हरवलेलं एक पानं.
राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )
बहिर्जी सरसेनापती संताजी च्या मृत्यूनंतर उद्विग्न मनस्थितीत दक्षिणेकडे निघून गेले. गजेंद्रगड व आसपासचा परिसर हा पूर्वी च त्यांच्या जहागिरी चा भाग होता. मराठ्यांचे छावणीतून दुखावलं जाऊन निघून दक्षिणेतच काही काळ त्यांनी आपला प्रदेश सुरक्षित व सुसंघटित करण्यासाठी त्यांनी कर्नाटकात घालवला. सुमारे १६९७ च्या अखेर त्यांनी गुत्तीचा किल्ला आपल्या राजकीय व लष्करी छावणीचे प्रमुख केंद्र बनवले.
इ स १७०० मध्ये सिंहगडावर
छ राजाराम महाराजांना मृत्यू आला आणि महाराणी ताराराणी यांचे कडे या स्वातंत्र्यलढ्याची सुत्रे आली. महाराष्ट्रातील विखुरलेल्या पराक्रमी आणि निष्ठावंत सेनानींना पुन्हा संघटीत होण्याची हाक दिली.
बहिर्जी स्वराज्याच्या रक्षणाची, स्वराज्य सेवेची संधी दवडणे अशक्य होते. त्यामुळे महाराणी ताराराणी यांनी हाती घेतलेल्या औरंगजेब विरोधी लढ्यात सहभागी झाले.
इ स १७०० पासून फारसी आणि पोर्तुगीज ऐतिहासिक कागदपत्रांच्या मध्ये बहीर्जी हिंदुरावांचा उल्लेख ठळकपणे जाणवतात.
भीमसेन सक्सेना या प्रत्यक्षदर्शी इतिहास लेखकाने आपल्या ' तारिखे दिल्कुशां' या ग्रंथात बरेच उल्लेख केले आहेत.
राजे बहिर्जी हिंदुराव यांची दोन महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्ये म्हणजे एक तर छत्रपतींच्या बरोबर वैमनस्य उत्पन्न झाल्यानंतर ही ते शत्रुपक्षाला कधी सामिल झाले नाही. आणि दुसरं म्हणजे मराठी राज्यात दुही माजेल असे त्यांनी काही केले नाही.
( ममलकतमदार बहिर्जि घोरपडे.
घोरपडे घराण्याला असलेल्या अधिकृत किताबा पैकी ममलकतमदार हा किताब आपण संताजी घोरपडे यांना वापरतो परंतु ऐतिहासिक कागदपत्रे अभ्यासली असता , संताजी घोरपडे यांना सरसेनापती व जफ्तनमुलुक हे नामी किताब तर बहिर्जी घोरपडे यांना हिंदुराव ममलकतमदार समशेरबहाद्दर हा नामी किताब दिसतो.
संदर्भ :
सरंजामी मरहट्टे. प्रा. संतोष पिंगळे. )
विनम्र अभिवादन _/\_
अशा या महाबली श्रीमंत राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांचे ३१३ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )
फोटो साभार - @rahul_2811_ & @love_ghorpade
No comments:
Post a Comment