विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 July 2021

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे भाग ३

 इतिहासातील हरवलेलं एक पानं.

राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे
माहिती साभार - इंद्रजितसिंह. वि.घोरपडे ( गजेंद्रगडकर )

भाग ३
हिंदुराव
छ. राजाराम महाराजांनी या कामगिरीबद्दल तीनही घोरपडे बंधू व विठोजीराव चव्हाण यांना मानाचे किताब दिले.
हिंदुराव या बहुमानाच्या किताबा बद्दल आणि तो बहीर्जींकडेच कायम का राहीला यासंबंधी मुंबई सेक्रेटरीएट मधील कागदपत्रांतून असलेल्या उल्लेखातून आणि सदर कागदपत्रांचे संपादन करणाऱ्या जाॅर्ज फाॅरेस्ट च्या मतें हा किताब फार प्राचीन असून,तो बहिर्जी च्या वडील शाखेकडे चालत आला. बेल्लारी डिस्ट्रिक्ट गॅझेटीअर मध्यै पण उपरोक्त उल्लेख सापडतात. या सर्व च माहितीवरुन असे दिसते की 'हिंदुराव' हा किताब घोरपडे घराण्याकडे पुर्वापार चालत आला होता; तोच छ.राजाराम महाराजांनी बहिर्जी ना पुनश्च बहाल केला.
२६ सप्टेंबर १६८९ रोजी छ. राजाराम महाराज पन्हाळगडावरून कर्नाटकाकडे प्रयाण केले. त्यावेळी त्यांचे समवेत बहिर्जी हिंदुराव घोरपडे आणि त्यांचे बंधू मालोजी घोरपडे (अमीर-उल्-उमराव) हे होते. यांचे शिवाय मानसिंग मोरे, दाभाडे,प्रल्हाद निराजी, कृष्णाजी अनंत,खंडो बल्लाळ, कान्होजी आंग्रे,बाजी कदम इ. प्रमुख मंडळी ही होती.
संताजी घोरपडे (ममलकतमदार) व धनाजी जाधव बाहेर राहून शत्रुसैन्यांची लांडगेतोड करून जेरीस आणण्याचे काम करत होते तर राजे बहीर्जी हिंदुराव आणि मालोजीराजे आघाडीवर होते. ते पुढे जाऊन शत्रुसैन्याच्या हालचाली चा आढावा घेत, टेहळणी करता होते. त्यानंतर पूर्वसंकेतानुसार यथासमय राजाराम महाराजांच्या तुकडीत सामील झाले. महाराजांचा हा जिंजी चा प्रवास अनेकानेक संकटांनी भरलेला होता तो यशस्वी झाला तो एकनिष्ठ, शुर व पराक्रमी लोकांमुळे च...!!!
या मोहिमेत काही लोक प्रत्यक्ष राजाराम महाराजांच्या बरोबर होते तर काही दुर राहुन मोगली सैन्याची लांडगेतोड करून जेरीस आणण्याचे काम करत होते. महाराजांची प्रत्यक्ष सोबत करणारेंमध्ये बहीर्जी हिंदुराव घोरपडे प्रमुख होते.
या रोमांचक खडतर सुमारे पाचशे मैलांच्या प्रवासात मोगली फौजा चुकवण्यासाठी अधिकाधिक खडतर मार्गातून मार्गक्रमण करताना वाटेत वेषांतर करून, प्रसंगी पायी चालत जावे लागले. डोंगरदऱ्या,नद्या, नाल्यातून, कधी पावसातून अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत, अविश्रांत मेहनत घेत महाराज आपल्या जीवास जीव देणारे एकनिष्ठ निवडक मंडळी सह २ नोव्हेंबर १६८९ ला जिंजीला सुखरूप पोचले. या निवडक एकनिष्ठ मंडळींमध्ये राजे बहिर्जी हिंदुराव घोरपडे यांचा छ राजाराम महाराजांना जास्तीत जास्त उपयोग झाला. किंबहुना प्रवासात जे दोन तीन जीवावरचे प्रसंग बेतले, त्यावेळी महाराजांचं संरक्षण बहीर्जी हिंदुराव नी आपल्या प्राणांची पर्वा न करता केले नसते, तर मराठी राज्याचा ग्रंथ जिंजीच्या वाटेवरच आटोपला असता.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...