मराठाशाहीतील एक शूर सेनापति व मुत्सद्दी.
भाग ४
विंचूरकर वाडा (नीरा नृसिंहपुर)
विंचूरकर वाडा (नीरा नृसिंहपुर):-
विठ्ठल शिवदेव विंचूरकर हे नाव इतिहासात आपले स्थान टिकवून आहे ते आपल्या पराक्रम, मुत्सद्दी स्वभाव आणि उत्तम नेतृत्व या गुणांमुळे. लहानपणी हुड असणाऱ्या विठ्ठल ला शाहूंनी शिकारी कसब बघून सुरवातीला १० स्वरांची मनसब दिली. पुढें हबशाच्या मोहिमेंत यानें सिद्दी साताचे घोडे पकडून शौर्य गाजविल्यानें याला शाहूनें पेशव्यांच्या हाताखालीं सरदार नेमलें. थोरल्या बाजीरावाच्या बहुतेक मोहिमांत तो हजर असे. दयाबहाद्दर व बंगष यांच्यावरील स्वार्यांत त्यानें चांगला पराक्रम केला. वसईच्या मोहिमेंतहि तो दाखल झाला होता. नासिरजंगावरील १७४० च्या स्वारींत पेशव्यास मिळालेल्या जहागिरीची वहिवाट पेशव्यानें यालाच सांगितली. याचें कुलदैवत नृसिंह असल्यानें यानें नीरा नरसिंगपूर येथें त्याचें मोठें देऊळ बांधलें. कुंभेरी, ग्वाल्हेर, गोहद (१७५५), सावनूर वगैरे मोहिमांत त्यानें उत्तम कामगिरी केली. ग्वाल्हेरचा बळकट किल्ला यानेंच सर केला पुढें (१७५७) दिल्ली काबीज करून यानें बादशहाला आपल्या ताब्यांत घेतलें. यावेळीं त्याला बादशहानें विंचूरची जहागीर व राजा आणि उमदेतुल्मुल्क किताब दिले. कांहीं दिवस तो दिल्लीस मराठ्यांच्या तर्फें प्रतिनिधि होता. पानपतांतून तो जखमी होऊन माघारा आला त्याबद्दल त्याला स्वतःलाहि खंत वाटे. ''आम्हींहि आपल्या जीवास खातच आहों'' असें त्यानें राघोबादादास लिहिलें.
माहीती आणि पोस्ट साभार - ओंकार खंडोजी तोडकर
No comments:
Post a Comment