विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 19 July 2021

इतिहास प्रसिद्ध राक्षसतागडी ची लढाई आणि एका वैभवशाली साम्राज्याचा अंत

विजयनगर   साम्राज्याचा अस्त


इतिहास प्रसिद्ध राक्षसतागडी ची लढाई आणि एका वैभवशाली साम्राज्याचा अंत


23 जानेवारी 1565 साली राक्षस व तांगडी या ठिकाणी झालेल्या लढाई ला राक्षसतागडीची लढाई म्हणून ओळखली जाते. तसेच या लढाईला तालिकोट ची लढाई पण म्हणलं जात.


पार्श्वभूमी :


1559 साली झालेल्या पराभवानंतरही, निजामाने कुतुबशहाच्या मदतीने आदिलशहा च्या मुलखात कुरापती काढणे चालूच ठेवले होते.

1562 साली आदिलशहाने विजयनगर चा राजाकडे आपले दोन वकील पाठवून निजामा विरुद्धच्या लढाईत मदत मागितली .रामरायाने आपली 50000 ची फौज आदिलशाहाच्या मदतीला पाठवली.

निजामाची आणि कुतुबशाहाची फौज कल्याण मध्ये जमा झालेली पण विजयनगरकडील आणि आदिलशहा कडील फौजेने निजामाचा दारूण पराभव केला.

विजयनगरकडील फौज माघारी फिरताच निजामाने त्यांची कुरापत काढायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा आदिलशहा आणि विजय नगर कडील फौजेने संयुक्तरीत्या निजामाला अहमदनगर पर्यंत मागे रेटले.

या लढाईमध्ये गोवळकोंड्याच्या कुतुबशाहकडून रामरायाला घनदुर आणि पांगुळ प्रदेश मिळाले.

हा विजयनगर साम्राज्याचा शेवटचा विजय ठरला.

विजयनगरचा खरा राजा सदाशिवराव होता पण त्याचा प्रधान रामराया सर्व कारभार बघत होता म्हणजे एक प्रकारे सदाशिवराव नजरकैदेत होता. या रामराया कडे 60 बंदर होते आणि आणि गडगंज संपत्ती असल्यामुळे तो मुस्लिम शाह्यांना कमी लेखू लागला.


विजयनगर विरोधात शाही एकजूट :-


आदिलशाहीच आणि कुतुबशाहीच सौख्य जमलं पण निजामाचं आणि अलिआदिलशहाचा हाडवैर होते.

कुतुबशाहने आपला एक चतुर वकील पाठवून निजाम व विजापूर यांच्यात सौख्य घडवून आणले आणि शरीरसंबंध सुद्धा घडवून आणला.

निजामाची मुलगी चांदबीबी ही अली आदिलशहाला देण्यात आली, तिच्या लग्नात सोलापूर भागातील काही किल्ले हुंडा म्हणून निजामाने आदिलशाहीला भेट दिले आणि त्याच्या (हुसेन निजामच्या) थोरल्या मुलाला आदिलशाहची बहीण दिली.

या प्रकारे सर्व मुस्लिम शाह्या एकत्र आल्यानंतर ते विजयनगरच्या राजाशी भांडण काढण्याचं कारण शोधू लागले.

अशातच आदिलशाहने विजयनगरच्या राजाकडे आपले वकील पाठवून काही प्रदेश माघारी मागितला यावरून रामराया चिडला आणि त्या वकिलांचा अपमान करून रामरायाने त्यांना दरबारातून हाकलून काढले. हेच कारण या शाह्यांना लढाईसाठी मिळाले.


विजयनगर कडील परिस्थिती :-


मागील प्रत्येक लढाईत राजाला मिळालेल्या यशामुळे प्रजेचा राजावर प्रचंड विश्वास होता .सदाशिव हा राजा असला तरी उल्हासी होता आणि प्रधान रामराया कडे सर्व सत्ता होती.

रामरायाने वकिलांना हाकलून दिल्यानंतर रामराया सावध होताच या तीन शाह्या कृष्णेच्या तीरी असलेल्या तालिकोट येथे जमलेल्या.

रामराया सावध होताच त्याने आपला भाऊ तिरुमल सोबत 20000 घोडेस्वार व एक लाख पायदळ व पाचशे हत्ती एवढा अफाट सैन्य फौजफाटा देऊन युद्धक्षेत्राकडे पाठवून दिले.

त्यानंतर दुसरा भाऊ व्यंकटाद्री बरोबर ही तेवढे सैन्य देऊन रवानगी केली आणि प्रत्येक प्रांतातील सरंजामदारांना आपल्या सोबत असलेल्या सैन्यासह हजर व्हायला लावले.

कृष्णेच्या तिरावर असलेल्या उतारांवर विजयनगरकडील फौजेने आपला उत्तम बंदोबस्त केलेला होताच, आणि काही ठिकाणी मोर्चे लावून ठेवलेले. पण या सगळ्यांना हुलकावणी देत तिसऱ्या रात्री शाही फौज नदी पार करून अलीकडे उतरली. या घटनेने रामराया आश्चर्यचकित झाला पण सावध मात्र झाला नाही.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...