१ जुलै १७२९
४ जुलै सन १७२९ रोजी कोकण किनारपट्टीवरील अनभिषिक्त राजे सरखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांना दिनांक २१ जुलै सन १७२९ रोजी छत्रपती शाहू महाराज यांनी सरखेलीचा कारभार सांगितला.
अल्पकालीन कारकिर्दीत राजनिष्ठ, शुर, सचोटी, इमान या गुणांच्या जोरावर सरखेल सेखोजींनी श्रीमंत चिमाजी अप्पांच्या साह्याने कोकणकिनारपट्टीवरील यवनांना उखडून काढले.
बाणकोटची खाडी ते रेवंदंडा येथपर्यंतचा मुलुख मोकळा झाला. दरम्यान खुद्द पेशवा श्रीमंत बाजीराव राजापूरीवर चालून गेल्याने सेखोजींस बळ चढले सिद्दीचे मोठे आरमार सेखोजींनी धरून आणले.
पोर्तुगीजांनी हबशी सिद्दी याची मदत केली म्हणून सेखोजींनी त्यांच्याकडील चौल हे महत्वपूर्ण बंदर घेण्याचा प्रयत्न केला.
इंग्रजांचे रोझ नावाचे जहाजाचा पाडाव करून ७६०३ रूपये मुंबईकर इंग्रजांकडून दंड वसूल केला व जहाज परत केले.
या प्रकाराने इंग्रजांना सेखोजींची जबरदस्त दहशत बसली.
No comments:
Post a Comment