विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 21 July 2021

रत्नागिरीचा इतिहास



 रत्नागिरीचा इतिहास

इतिहास:-रत्नागिरि आणि कोल येथें बौद्धांच्या वेळचीं लेणीं आहेत त्यांवरून येथें प्राचीन बौद्ध वर्चस्व होतेसें दिसतें. नंतर रत्नागिरि हें एकामागून एक पुष्कळ हिंदु घराण्यांच्या ताब्यांतून गेलें; त्यांपैकीं चालुकय घराणें सर्वांत प्रबळ होतें. १३१२ सालीं रत्नागिरीवर मुसुलमानांनीं हल्ला केला. आणि दाभोळ येथें वस्ती करून राहिले. पुढें १४७० सालीं बहामनी राजांनीं विशाळगड आणि गोवा हस्तगत करून रत्नागिरीच्या बाकी राहिलेल्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. १५०० सालीं सावित्री नदीच्या दक्षिणेचा कोंकणचा सर्व भाग विजापूरकरांच्या ताब्यांत आला. पुढें पोर्तुगीज लोकांचा अंमल हळू हळू कमी होऊं लागला. नंतर मराठे लोकांची सत्ता वाढूं लागली. शेवटीं शिवरायांनी विजापूरच्या सैन्याचा पराभव करून तो आपल्या मराठे लोकांसह रत्नागिरी येथें येऊन राहिला. त्यानें पोर्तुगीज व सिद्दी लोकांनां जिंकलें होतें. नंतर कांहीं वर्षे जिल्ह्याचा कांहीं भाग सिद्दी लोकांच्या ताब्यांत होता. मराठयांनीं कान्होजी आंग्र्यास आरमाराचा मुख्य अधिकारी नेमून रत्नागिरीचा कांहीं भाग त्यास राहण्यास दिला. १७४५ सालीं कान्होजीचा पुत्र तुहाजी यानें बाणकोट व सावंतवाडी यांमधील प्रदेश हस्तगत करून पेशव्यांची सर्व जहाजें लुटलीं. १७५५ सालीं इंग्रज आणि पेशवे यांनी सुवर्णदुर्ग येथील किल्ले उध्वस्त केले. आणि १७५६ सालीं तुळाजी आंग्र्याच्या आरमाराचा नाश करून विजयदुर्ग घेतलें तहांत बाणकोट व नऊ खेडीं इंग्रजांनां मिळालीं. पुढें मालवण व वेंगुर्ले हीं कोल्हापूरकर व सावंतवाडीकर यांकडून इंग्रजांनां मिळालीं.
पुराणावशेष:-रत्नागिरी जिल्ह्यांत एकंदर ३६५ किल्ले आहेत, त्यांपैकीं मंडनगड हा फार प्राचीन किल्ला आहे. येथील पुष्कळ किल्ले १२ व्या शतकाच्या शेवटीं पन्हाळाच्या भोजनराजानें बांधिले असें म्हणतात. चंडिकाबाई आणि संगमेश्वर अशीं दोन हिंदूंचीं प्रसिद्ध देवालयें या जिल्ह्यांत आहेत. दाभोळ येथें एक जुनी मशीद आहे. कोंकणच्या दक्षिण भागांत खारेपाटण येथें जैन लोकांचें एक देवालय आहे. मालवणजवळ सिंधुदुर्ग किल्ल्यांत शिवाजीची मूर्ति आहे. जिल्ह्याची १९२१ सालीं लोकसंख्या ११५४२४४ होती. जिल्ह्यांत मालवण, वेंगुर्ले, रत्नागिरी (मुख्य ठिकाण) आणि चिपळूण हीं मुख्य शहरें आहेत. शेंकडा ९९ लोक मराठी(व कोंकणी) भाषा बोलतात. यांत ब्राह्मण, वाणी, भाटे, सोनार, कुंभार, चांभार इत्यादि जाती आहेत.

No comments:

Post a Comment

चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले

  चोळच्या सिंहासनावर बसले मरहट्टा वेरूळकर भोसले चोल साम्राज्य हे भारतातील मध्ययुगातील सर्वात मोठे, प्रदीर्घ कालखंड , सर्वात पराक्रमी ,सर्व ...