विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 21 July 2021

सरदार आनंदराव धुळप यांचा वाडा-

 











सरदार आनंदराव धुळप यांचा वाडा-

किल्ले विजयदुर्ग,शिवरायांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेला खासा गड, कान्होजी आंग्रेरूपी मराठी आरमाराच्या सुवर्णयुगाचा मुक साक्षीदार,मराठी आरमाराचं बलाढ्य सत्ताकेंद्र.
किल्ले विजयदुर्गच्या भेटीत आपण मराठी आरमाराच्या गतवैभवात रमून जातो,अशा या विजयदुर्गच्या भेटीत दुर्गप्रेमींनी आवर्जून पहावे असे अजुन एक ठिकाण म्हणजे सरदार आनंदराव धुळप यांचा राजवाडा.
इ. स. १७६३ साली माधवराव पेशव्यांनी सरदार आनंदराव धुळप यांची विजयदुर्ग किल्ल्यावर सुभेदार म्हणून नेमणूक केली.धुळपांनी लवकरच आपल्या शौर्याने सागरी इंग्रजी सत्तेवर जरब निर्माण केली.रामेश्वर देवालयातील अजस्र घंटा आजही आनंदराव धुळपांच्या कीर्तीची आठवण करून देते.आजही धुळपांचा राजवाडा विजयदुर्ग गावात सुस्थितीत आहे. या वाड्यातील भित्तीचित्रे,वास्तुशिल्प केवळ अप्रतिमच.
विजयदुर्गच्या भेटीत हे गतवैभव पाहताना भान हरपून न जाईल तर नवलच.......
-. गडकिल्ले आणि मी

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...