विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 14 July 2021

कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध “किल्ला पन्हाळा”

 


कोल्हापूर जिल्ह्यातील इतिहासप्रसिद्ध “किल्ला पन्हाळा”...🚩
पन्हाळा किल्ला शिलाहार वंशीय राजा भोज व्दितीय याने इ.स ११८७ रोजी बांधला त्यानंतर ह्या किल्ल्यावर यादव-वंशीय सिंघन राजाचे वर्चस्व आले व इ.स १४८९ साली तो आदिलशाही सत्तेखाली आला मराठी राज्याचा इतिहासात ह्या गडाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले व छत्रपती शिवाजी महाराजांनी २८ नोव्हेंबर १६५६ साली पन्हाळा जिंकून घेतला...
बालेकिल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तू धान्य साठविण्यासाठी बांधलेली इमारत ‘अंबरखाना’ (धान्यकोठार) :
सैन्य पोटावर चालते अशी म्हण आहे.. एखादा किल्ला दीर्घकाळ लढवण्यासाठी जशी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते तसेच सैन्याला अन्न आणि पाण्याचीही गरज असते युद्ध, दुष्काळ अशा आणीबाणीच्या काळात धान्याचा साठा अपुरा पडू नये यासाठी किल्ल्यांवर धान्यकोठारे बांधली जाते धान्यकोठारांच्या इमारती वस्तीजवळ आढळून येतात किल्ल्याचा घेर मोठा असल्यास एकापेक्षा धान्यकोठार बांधलेली पाहायला मिळतात धान्यकोठारांच्या इमारती दगड, विटा, चुना याने बांधलेल्या पक्क्या इमारती असतात या इमारतींचे छतही पक्के असते यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि छताला झरोके असतात. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी धान्य कोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनीपासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरसबंदी केलेली असत लाकडी पाटांवर धान्याची पोती रचून ठेवलेली असतात...
पन्हाळा किल्ल्यावरील गंगा, यमुना, सरस्वती ही तीन धान्य कोठारं प्रसिद्ध आहेत....
➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : श्री पाटील...♥️

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...