विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 July 2021

१ मे १६७७ मराठ्यांची दुर्लक्षित दक्षिण राजधानी “किल्ले जिंजी”.

 


१ मे १६७७ मराठ्यांची दुर्लक्षित दक्षिण राजधानी “किल्ले जिंजी”...🚩

छत्रपती शिवरायांनी जेंव्हा ३१ मे १६७७ रोजी जेंव्हा जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला त्याचवेळी शिवरायांनी त्याजवळच्या प्रदेशाच्या संरक्षणाची काळजी घेतली.. जिंजीच्या किल्ल्याची बारकाईने पाहणी करत किल्ल्याच्या भोवती नवे तट उभे केले, खंदक खणले, बुरूज बांधले आणि इतर आवश्यक तरतुदी केल्या, हे बांधकाम इतके उत्कृष्ट होते की याचा युरोपीयांना सुध्दा हेवा वाटावा ज्याचे किल्ले त्याचे राज्य हे शिवरायांचे धोरणच होते आणि यामुळे शिवरायांनी जिंकलेल्या मुलखातील किल्ल्यांच्या संरक्षणाची आणि निगेची अतिशय काळजी घेतलेली दिसते...
जिंजीच्या शेजारी असलेल्या पॉंडीचेरीच्या फ्रेंच लोकांनीही जिंजीचा किल्ला पाहिला आणि त्यांचे गव्हर्नर फ्रांस्वाचा मारतने तर आपल्या रोजनिशीत लिहून ठेवले आहे की...,
“शिवाजीराजाने जिंजीचा जुना कोट पाडला जिंजी भोवती खंदक खणले, नवीन तटबंदी बांधून त्यात आवश्यकतेनुसार भक्कम बुरुज बांधले हे बांधकाम इतके मजबूत व सुंदर झाले आहे की ते स्थानिक लोकांनी न करता एखाद्या युरोपियन इंजिनियरने केल्यासारखे वाटते शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणी नामक कलेचे इतके सूक्ष्म ज्ञान होते की, निष्णात शिल्पज्ञ ओळखण्यास व त्याला दुर्गकार्यात कामावर योजण्यास त्यांना अडचण नव्हती...
ह्या बद्दल समकालीन युरोपियन इतिहासकरांनी लिहिलेले आहे की..,
“He (Shivajiraje) has studied with extreme care everything about the duty of general, soldier, about all the art of fortification which he understood better than the ablest engineers...”
सेनापती व सैन्य यांच्या कार्यांचा शिवाजीराजांनी अतिशय सूक्ष्म अभ्यास केलेला असून दुर्गांची पुनर्रचना करण्याची कला निष्णात स्थापत्य विशारदापेक्षाही त्यांना अधिक चांगली अवगत होती..
: Foreign Biographies Of Shivaji, By Dr. Surendranath Sen...
――――――――――――
राजाधिराज....🚩 #🚩गड किल्ले माहिती #📜इतिहास शिवरायांचा #🚩शिवकन्या #🚩जय जिजाऊ #🚩शिवरायांचे भक्त

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...