मराठा स्वराज्य मग ते शिवकालातील असो किवा पेशवेकाळातील असो किवा होळकर काळातील असो त्या वीरांचा इतिहास .जे मराठा स्वराज्यासाठी लढले त्या मराठा वीरांचा इतिहास
विनोद जाधव एक संग्राहक
Tuesday, 31 August 2021
इब्राहिम खान गर्दी: मराठा सैन्यात मुस्लिम कमांडर
मराठेशाहीतील एक पराक्रमी सेनानी “नरवीर चिमाजी अप्पा”....🚩
शिवनेरी लेण्या
Saturday, 28 August 2021
सेखोजी आंग्रे
ज्याच्यासमोर बलाढ्य हत्ती देखील हरला तो महाराजांचा मावळा ‘येसाजी कंक’!
Saturday, 21 August 2021
हत्तीवरून राजकारण
The Great Maratha Warriors
Friday, 20 August 2021
प्रतिके मराठ्यांच्या श्रीमंतींची : मराठा स्थापत्यकला भाग 1
प्रतिके मराठ्यांच्या श्रीमंतींची : मराठा स्थापत्यकला
भाग 1
पोस्तसांभार ::
केतन पुरी.
आपल्या तलवारीच्या बळावर स्वराज्यनिर्मिती करताना मराठ्यांनी स्थापत्य,संगीत,नृत्य,वादन,लेखन यांच्यात अभुतपूर्व पराक्रम गाजवला.पुढे 18व्या-19व्या शतकांत सयाजीराव गायकवाड,राजर्षी शाहू महाराज,यशवंतराव होळकर यांसारख्या शासनकर्त्यांनी समाजाला एका उषःकालाकडे नेले.
याचदरम्यान,आपल्या वैयक्तिक वापरासाठी मराठ्यांनी उभारलेल्या काही वास्तू ह्या आजही त्यांच्या श्रीमंतीचा डोलारा मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत.
यातीलच काही महत्वाच्या,अतिसुंदर आणि वैभवशाली उत्तरकालीन स्थापत्याचा आपण मागोवा घेणार आहोत.
1.जय विलास महाल,ग्वाल्हेर.
उत्तरेतील काही प्रमुख मराठा सरदारांपैकी एक प्रमुख घराणे म्हणजे शिंदे घराणे होय.राणोजी शिंदे,दत्ताजी शिंदे,जनकोजी शिंदे,महादजी शिंदे यांसारखे नररत्न देणारे घराणे.याच घराण्यात जन्म घेतलेल्या महाराज जयाजीराव शिंदे यांनी 1874 मधे ग्वाल्हेर येथे एक मोठा महाल बांधला,'जय विलास महाल'..!!
मराठा स्थापत्यशैली आणि इटलीच्या स्थापत्यशैलीचा सुरेख संगम या महालाच्या बांधनीत आपल्याला दिसून येतो.400 खोल्यांची बांधनी असणारा हा महाल सध्या सर्व पर्यटकांसाठी खुला आहे.यातील 40 खोल्यांत असणारे 'जयाजीराव शिंदे संग्रहालय' हे पाहन्यासारखे..
या महालाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील दरबार हॉल.इटली,इंग्लंड,न्यूयॉर्क,इजिप्त,जापान,चीन यांसारख्या देशातून आणलेल्या फर्नीचरने हा महाल नटला आहे.
दरबार हॉल च्या छतावर 2 बेल्जियम पद्धतीचे अतिसुंदर असे झुंबर लटकावले आहेत.अभ्यासकांच्या मते,जगात असणाऱ्या सर्वात महागड्या झुंबरांपैकी ही 2 झुंबर आहेत..!!यातील एकाचे वजन 7 टन एवढे भरेल,इतकी मोठी आहेत.
आजच्या काळाचा विचार केला,तर 1200 कोटी इतका खर्च या इमारतीच्या बांधकामाला आला.
मराठ्यांचा हा वैभवशाली वारसा एकदातरी पाहावाच इतका उत्कृष्ट आहे.
लेणी.महाराष्ट्राला लाभलेल शिल्पकलेच सुंदर लेण.
लेणी.महाराष्ट्राला लाभलेल शिल्पकलेच सुंदर लेण.
लेणी.महाराष्ट्राला लाभलेल शिल्पकलेच सुंदर लेण.
पोस्तसांभार ::केतन पुरी
भारतात आढळणाऱ्या 1200 लेण्यांपैकी जवळ-जवळ 800 लेण्या एकट्या महाराष्ट्रात आढळतात.इथल्या सह्याद्रीने केवळ शुरवीरांचेच संगोपन केले,असे नाही तर अनेक जगप्रसिद्ध आणि सर्वांना आश्चर्य करायला भाग पाडणाऱ्या लेण्याही आपल्या अंगा-खांद्यावर गोंदून घेतल्या.
निसर्गाच्या विविध रंगछटांचा योग्य वापर करुन हजारो वर्षाखाली तीन-तीन मजले खोदून केलेले कोरीवकाम आणि भित्तीचित्रे आजही एक आश्चर्य आहे.मानव आधीच्या काळात किती प्रगत होता,यावरून लक्षात येते.वेरूळ येथील कैलास शिल्प हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण.
मराठवाड्यामधे असणाऱ्या जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ येथील लेण्या,औरंगाबाद लेणी,घटोत्कच लेणी,पितळखोरे लेणी,लातूर नजीक असनारी खरोसा लेणी,अंबेजोगाई येथील हत्तीखाना,पांडव लेण्या,धाराशिव लेण्या यांचे अस्तित्वच आता नष्ट होत चालले आहे.
हीच गत पश्चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या दुर्लक्षित लेण्यांची.कराडची जखिनवाडी लेणी,साताराजवळील पाटेश्वर लेणी,बोरीवली येथील मागाठाणे लेणी,जुन्नर परीसरात आढळणाऱ्या तुळजा लेणी,गणेश लेणी,अंबाअंबिका लेणी,शिवनेरी,नानेघाट लेणी,गीध विहार-भीमाशंकर येथील लेण्या आपल्या गतवैभवाच्या खुणा जपत आजही त्याच डौलाने उभ्या आहेत पण दुर्लक्षित..!!
उन,वारा,पाऊस,झाडी यांमुळे कितीतरी लेण्यांची प्रवेशद्वारे बुजली आहेत,पडली आहेत.साप,विंचू,कटेरी वनस्पती,मधमाशांचे पोळे,साचलेले पाणी यामुळे लेण्या पाहणे जिकारीचे ठरते.त्यात ठिकठिकाणी असनारी अस्वच्छता,विद्रूपिकरन याने लेण्यांची शोभा आणखी खराब झाली.
28 एप्रिल 1819 ला जॉन स्मिथ नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने अजिंठा येथील 10व्या लेणी मधे एका भिंतीवर आपले नाव कोरले.आज या ऐतिहासिक ठिकाणी,गड-किल्ल्यांवर,लेण्यामधे आपल्या गलिच्छ रंगरंगोटीने वास्तू विद्रूप करणारे बहुदा या स्मिथचेच वंशज असावेत.
आपल्या वैभवशाली इतिहासाचा अमूल्य ठेवा आपनच जपायला हवा.ती आपली जबाबदारी आहे.
केतन पुरी.
आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची.
चाफेकरबंधूचा पराक्रम!
चाफेकरबंधूचा पराक्रम!
22 जून रोजी चाफेकरबंधूनी रँडचा वध केला.
आज संपूर्ण जगात कोरोना रोगाची साथ पसरली असून त्यावर योग्य औषधउपचार नसल्याने त्याबाबत भीती आहे. अगदी अशीच भीती १८९७ मध्ये प्लेग हा रोगाची होती. पुण्यात प्लेगची साथ उसळली . ती वेगाने पसरत गेली. घराघरातून माणसांचे बळी गेले. या साथीला प्रतिबंध करण्याचे प्रयत्न सर्व पातळीवर सुरु झाले. प्लेगप्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने प्लेग होणे म्हणजे मरणाच्या दारात दाखल होणे असे मानले जाऊ लागले . पण तो पसरु नये म्हणून अनेक उपाय अवलंबिले जात होते. प्लेगग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात येत असे. ब्रिटिश सरकारने क्वारंटाईन क्षेत्र निर्माण केले खरे ,पण तिथे खाण्यापिण्याची व्यवस्था ठेवल्या नाही.परिणामी जो रुग्ण प्लेगने जाणार होता तो उपासमारीनेच मरु लागला. प्लेगग्रस्ताना कोणी अन्नाची मदत केली तर त्यालाही या क्वारंटाईन सेंटरमध्ये जबरदस्तीने दाखल करण्यात येत असे. तसेच प्लेगचा रुग्ण शोध कार्यासाठी पुण्याचे प्लेग अधिकारी वॉल्टर चार्ल्स रँड यांनी एक लष्कराची तुकडी तैनात केली होती. पेठापेठांची आणि घराघरांची झडती सुरु झाली. सभ्यता आणि संस्कृती याचा संदर्भ विसरुन सैनिकांचा स्वैरविहार सुरु झाला. भर रस्त्यात स्त्रियांना थांबवून काखेतील गाठी पाहण्याचा कार्यक्रम सुरु झाला. या विरोधात लोकमान्य टिळकांनी " रोगापेक्षा औषध जालीम " असा अग्रलेख केसरीत लिहून ब्रिटिश सरकारला समज दिली. पण धटिंगणांना याचे सोयरसुतक नव्हते . ही स्थिती पाहून पुण्यातील दामोदर , वासुदेव व बाळकृष्ण चाफेकर यांचे रक्त उसळून आले. ब्रिटिश लष्कर कधीही घरी येत असे. घरातील लोकांना बाहेर काढून निर्लज्जपणे प्लेगचा रुग्ण शोधत असे. गप्प बसणे , सहन करणे , देवाला साकडे घालणे , नशिबाला दोष देणे , प्रारब्धाचा भाग म्हणून स्वीकार करणे. हा चाफेकर बंधूना मूर्तिमंत भेकडपणा वाटत होता. पुण्यात रँडसारखे अधिकारी लोकांचा छळ करतात , लोकमान्य टिळकांनी व्हाइसरॉयला पत्र लिहिले. मात्र ब्रिटिशांनी त्या पत्राला केराची टोपलीत टाकले. या सर्व परिस्थितीचा विचार करुन या रँडची खोड मोडायचीच हा निर्धार चाफेकर बंधूनी केला.२२ जून १८९७ इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीला पंचवीस वर्ष पूर्ण झाले. तिच्या रौप्य महोत्सव २२जून १८९७ या दिवशी पुणे येथील गणेशखिंडीजवळ गव्हर्नरच्या निवासस्थानी टोलेजंग मेजवाणीचा बेत होता. हा समय चाफेकरबंधूना अनुकूल वाटला. त्यांनी योजना आखली. ब्रिटिश अधिकारी उघड्या घोडागाडीतून रमतगमत , लोकांना हिणवत जात असे. २२जूनच्या रात्री मेजवानी आटोपल्यावर रँडसाहेब विशिष्ट वाटेने जाणार होता. त्यांची गाडी ओळखू यावी म्हणून तिच्या मागोमाग "गोविंदा आला रे " ही घोषणा देत वासुदेव चाफेकर धावणार होते.चाफेकर बंधूनी पिस्तुल मिळवली. रात्रीची वेळ होती. चाफेकरबंधू ठरल्याप्रमाणे आपआपली जागेवर रँडची वाट पाहत होते. भोजने उरकली . मैफल संपली. आधिका-यांच्या गाड्या निघाल्या.पहिल्यांदा पुढे आलेली आणि टिपलेली गाडी निघाली लेफ्टनंट आर्यस्ट यांची , बाळकृष्ण चाफेकर गाडीवर चढले . त्याने आपले पिस्तूल चालवले. आर्यस्टचा वध झाला.मात्र चाफेकरबंधूना हवा असणारा हवा असणारा रँड मागेच राहिला होता.काही क्षणांतच वासुदेव चाफेकराची हाळी ऐकू आली. लगेच दामोदर चाफेकर चित्यासारखा झेपावला. निमिषार्धात रँड गतप्राण झाला. हे सर्व घडताच चाफेकरबंधू शांत चित्ताने एका पायवाटेने चालत होते. हा दिवस होता २२ जून १८९७ चा प्लेगच्या नावाने सर्वसामान्य लोकांचा ब्रिटिश शासनाने जो छळ मांडला होता त्याला दिलेले हे सणसणीत उत्तर होते. काही दिवसांत चाफेकरबंधूना फासावर चढवण्यात आले. बुद्धिवंत म्हणतात की , काही ब्रिटिश अधिकाऱ्यांचा वध करुन स्वातंत्र्य मिळत नाही. मात्र निर्माल्यावस्थेत निपजित पडलेल्या भारतीयांना जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त होते.निशस्त्र १००० निषेध सभेपेक्षा ब्रिटिशांच्या कानटळ्या बसण्यासाठी अशा क्रांतिकार्याची गरज होती.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संत शिरोमणी नामदेव महाराज!
संत शिरोमणी नामदेव महाराज!
संत नामदेव महाराजांनी ३ जुलै १३५० मध्ये समाधी घेतली. त्यांच्या कार्याबाबत थोडक्यात लेख!
महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी! अगदी १२ व्य शतकापासून या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. असेच तेजस्वी संत म्हणजे संत नामदेव महाराज होय. नामदेव महाराजांचा जन्म मराठवाड्यातील नरसी या गावी १२७० मध्ये झाला. बालपणापासून विठ्ठलाबद्दल अपार श्रद्धा नामदेवा मध्ये होती. विसोबा खेचर हे त्यांचे अध्यात्मिक गुरु होते. महाराष्ट्रातील भागवत धर्म वारकरी पंथाचा विस्तार मोठ्या प्रमाणात नामदेव महाराजांनी केला. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग मोठ्या भक्तिभावाने गायली जातात. मात्र महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रसार करणारे संत नामदेव हे पहिले संत होय. संत नामदेव महाराजांनी मध्ये अपार भूतदया होती. एका प्रसंगावरून त्यांच्या असं लक्षात येईल . संत ज्ञानेश्वर माऊली पेक्षा नामदेव महाराज पाच वर्षांनी मोठे होते.नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाचे काम मोठ्या उत्साहाने केले. या दोन महान संतांची भेट आळंदी येथे झाली.संत नामदेवांनी साधारण २५०० अभंग लिहिले. त्यांची नामदेव गाथा मोठ्या भक्तिभावाने महाराष्ट्रात गायली जाते. शीखाचे धर्मग्रंथ "गुरुगंथसाहेब" मध्ये अनेक हिंदी पदे नामदेव महाराजांची समाविष्ट करण्यात आली. वारंकरी संप्रदायांचा विस्तार करण्यात संत नामदेव महाराजांचा महत्त्वाची भूमिका होती. नामदेव महाराजांना ८० वर्षाचे आयुष्य लाभले. या प्रदीर्घ काळात त्यांनी वारंकरी संप्रदायाचे प्रसार संपूर्ण भारतात केला. सन १३५० मध्ये पंजाबमध्ये नामदेव महाराजांचे निधन झाले. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
-- प्रशांत कुलकर्णी मनमाड
मराठ्यांचे आरमारप्रमुख...दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रें--
मराठ्यांचे आरमारप्रमुख...दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रें--
४ जुलै कान्होजी आग्रें यांचा स्मृतीदिनानिमित्त लेख!
मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आरमाराचे महत्त्व जाणणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एकमेव राजे होते. त्यामुळेच शिवरायांना आरमाराचे जनक म्हटले जाते. ब्रिटिश , पोर्तुगीज व जंजिरांचा सिद्दीला तोंड देण्यासाठी आपले आरमार मजबूत असावे असा दुरदर्शी विचार शिवरायांनी केला. शिवरायांचे आरमार उभे राहिले. मराठ्यांचे आरमार सशक्त करण्याची महत्त्वाची कामगिरी कान्होजी आंग्रे यांनी केली. कान्होजींचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील "कालोसे" गावी १६६९ झाला. कालोसे गावातील "आंगरवाडी" ह्या छोट्या भागावरून त्यांचे आंग्रे हे आडनाव रूढ झाले. मराठ्यांच्या आरमारांची धुरा पाव शतक सांभाळून त्यांची शक्ती सतत वाढत ठेवणारे कान्होजी आंग्रे यांना "मराठी आरमार प्रमुख " हे बिरुद अभिमानाने लावले जाते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य संपुष्टात आणण्याचा चंग बांधला होता. ते अस्तित्व टिकवण्यासाठी सर्वच मराठे सरदार एकदिलाने एकत्र आले होते. त्यांत आरमाराची बाजू फक्त सांभाळणे नव्हे तर त्यांची दहशत तमाम शत्रूच्या मनात निर्माण करण्याची अनोखी किमया कान्होजींनी केली.
. इ.स.१६८८ च्या सुमारास सिद्दी कासम ह्या औरंगजेबाच्या सेनापतीस कान्होजींच्या अभ्यासपूर्ण योजनेपुढे आणि जिद्दीपुढे हार पत्करावी लागली. कान्होजींना आमिष दाखवून कोकणातील किल्ले ताब्यात घेणार्या मोगलांचे स्वप्न अखेर धुळीस मिळाले . कान्होजींनी सुवर्णदुर्गचा लढा यशस्वी करून आपल्या पराक्रमास सुरुवात केली. तसेच ह्या विजयानंतर मोगलांनी ताब्यात घेतलेले सर्वच किल्ले काबीज करण्यास त्यांनी सुरुवात केली. कान्होजींचे शौर्य व निष्ठेने पाहून राजाराम महाराजांनी त्यांना ‘सरखेल’ हे सन्मानाचे पद दिले. कान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनी आंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले. इ.स. १७०० मध्ये राणी ताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठी ताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना अनेक परकीयांशी एकाच वेळी लढा द्यावा लागला. कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरी भागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर कान्होजींनी निर्बंध घातले. १६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ता कान्होजींकडे आली आली. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. कान्होजींचा प्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले होते.तरीही कान्होजींनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीने अगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिक शस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग येथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्र किनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता. छत्रपती शाहू महाराज ज्यावेळी १७०७ मध्ये औरंगजेबाच्या तुरुंगातून सुटून महाराष्ट्रात आले. त्यावेळी पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आग्रेंना शाहू महाराजांची बाजू समजून दिली. कान्होंजी शाहू महाराजांच्या पक्षात आले. त्यामुळे शाहू महाराजांची बाजू बळकट झाली. पोर्तुगीज व सिद्दी यांची धार्मिक असहिष्णुता सर्वत्र परिचित होती.कान्होजींचा हा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होती. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातील मंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. कान्होजींनी स्वकर्तृत्वावर उत्तुंग झेप घेतली.शत्रूची दाणादाण उडवणारे दर्याबहाद्दर कान्होंजी आग्रेंचे नाव मध्ययुगीन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. दिनांक ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.
-- प्रशांत कुलकर्णी मनमाड
संदर्भ -
१.मराठ्यांना इतिहास खंड-१ व २ -अ.रा.कुलकर्णी
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट
प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट
आर्यभट्ट
आर्यभट्ट हे भारतीय गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म इ.स. ४७६ मध्ये कुसुमपूर येथे झाला. कुसुमपूर म्हणजेच पाटलीपुत्र म्हणजे आजचे पाटणा शहर होय. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सांगणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे आर्यभट्ट होय.आपल्या खगोलशास्त्राच्या संशोधनानंतर त्यांनी पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी मारायला ३६५ दिवस ६ तास १२ मिनिटे ३० सेंकद लागतात हे सिद्ध केले. आजच्या आधुनिक विज्ञानानूसार याप्रमाणात फक्त काही संकेदाचाच फरक आहे. प्राचीन काळी कोणते साधने नसताना आर्यभट्टांनी हे गणित इतके अचूक कसे मांडले हे खरोखरच आश्चर्यच आहे. आर्यभट्ट यांनी " वयाच्या २३ व्यावर्षी आर्यभट्टीय " हा गणित व खगोलशास्त्रावरील भारतीय प्राचीनतम ग्रंथ मानला जातो.त्यांत ११८ श्लोक आहेत. त्यात तत्कालीन बीजगणिताचा सखोल अभ्यास होता. आर्यभट्टांनी अमावस्येला सूर्यग्रहण व पौर्णिमेला चंद्रग्रहण यांचा संबंध चंद्र व पृथ्वी यांच्या सावल्यांशी आहे हे नोंदवून ठेवले.
रामायण व महाभारत झाले की नाही ? असे प्रश्न आजकाल उपस्थित करतात. मात्र आर्यभट्ट यांनी आपली गणिती पध्दत मांडून महाभारताचे युध्द कुरुक्षेत्रावर इ.स.पूर्व ३००० वर्षापूर्वी झाले असे नमूद केले होते. तर एन.सी.आर.टी. च्या पुस्तकांमध्ये हा काळ खूप जवळ आणून इ.स.पूर्व ९५० मांडलेला दिसतो. अर्थात या पुस्तकांचा संदर्भ हा जर्मन बुद्धीवादी व ब्रिटिशांचा आश्रित इतिहासकार मँक्स मुल्लरच्या संशोधनाचा प्रभाव आहे. भारताच्या वैज्ञानिक इतिहासाचा जेव्हा आढावा घेतला जातो तेव्हा आर्यभट्ट यांचे नाव अगदी पहिले असते. आर्यभट्टाचा प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतर ही प्राचीन भारतावर होता. त्यामुळे वराहमिहिर , ब्रह्मागुप्त , पहिला भास्काचार्य , गोविंदस्वामी असे अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले. आधुनिक विज्ञानातही भारताने पाठवलेला पहिला उपग्रह आकाशात पाठवला. त्याला " आर्यभट्ट" असे नाव देण्यात आले.
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड (नाशिक )
“कोरलाईचा किल्ला”.
१३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...
-
११ माशी अक्करमाशी असा उल्लेख असा येतो. आपण प्राचीन क्षत्रियांचे वंशज आहों असें मराठे म्हणतात. प्रचारांतल्या त्यांच्या आडनांवा...
-
*राणूबाई भोसले-जाधव* राणूबाई म्हणजे शंभूराजांची दुसरी आईच.शंभूराजांचा जन्म झाला त्या दिवशी बेभान होणाऱ्या म्हणजे "राणूबाई".त्यां...
-
## धनगर व माळी समाजातील लढवय्ये ## दामाजी थोरात postsaambhar:Udaykumar Jagtap ## ## ## नायगाव ,तालुका -पुरंदर जिल्हा -पुणे , गा...