विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

क्रांतिकारक उमाजी नाईक

 

क्रांतिकारक उमाजी नाईक 

क्रांतिकारक  उमाजी नाईक!


               जेव्हा  एक सशस्त्र  क्रांतिकारक  वधस्तंभावर चढून  आपल्या  जीवाचे बलिदान  करतो. तेव्हाच   शंभर निःशस्ञ प्रतिकारकांचा जन्म  होऊ शकतो. क्रांतिकारकांच्या प्राणत्यागाचे मर्म हे होते. स्वातंत्र्यदेवतेला स्वतःच्या  रक्ताचा नैवेद्य  त्यांनी दाखविला. भारत  देशात असे अनेक  क्रांतिकारक  जन्माला आले. त्यांनी देशाच्या  स्वातंत्र्यासाठी हसत हसत फासावर चढले . त्यांतील महाराष्ट्रातील  पहिले क्रांतिकारक  म्हणून  "उमाजी नाईक" यांचे नाव घेण्यात येते.भारतीय  स्वातंत्र्य  लढ्यामधील क्रांतीकारका़चे दोन कालखंड  पडतात. एक म्हणजे  १८५७ च्या स्वातंत्र्य-समराच्या  आधिपासून तर १८५७ पर्यत काळातील क्रांतिकारक ! व दुसरे १९५७ नंतरच्या काळातील  क्रांतिकारक ! माञ भारताच्या  इतिहासात आधिच्या क्रांतीकारका़ची विशेष  दखल घेतली गेली नाही. त्याकाळातीलच   " उमाजी नाईक यांचा जन्म ७ सप्टेंबर  १७९१ मध्ये पुणे जिल्ह्यातील " भिवडी" येथे झाला. उमाजी यांच्या कुटुंबाला पुरंदर किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी  पार पाडत असल्याने  त्यांना " नाईक " ही पदवी मिळाली होती. उमाजी शरीराने धडधाकट  , उंच व करारी होते.  दांडपट्टा , तलवार , भाला या  युध्दकलेत उमाजी नाईक पारंगत होते . त्याकाळात हळूहळू  ब्रिटिशांनी  आपली सत्ता  भारतात स्थापन करण्यास सुरुवात  केली.  १८१८ मध्ये ब्रिटिशांनी  पेशव्यांचा पराभव केला. त्याकाळातच पुरंदर किल्ल्यांची किल्ल्यांची संरक्षणांचे काम उमाजी यांच्याकडून  काढून घेण्यात  आले. जनतेवर ब्रिटिशांचे अत्याचार  वाढू लागले . अशा परिस्थितीत उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरोध लढा सुरु केला. छञपती शिवरायांना आपले श्रध्दास्थान मानणाऱ्या  उमाजी नाईकांनी ब्रिटिशांना सळो की पळो करु सोडले.  त्यांना सुरुवातीला  ब्रिटिशांनी   एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा  दिली. तुरुंगातून सुटल्यावर  आपले कार्य उमाजींनी  अजून जोमाने सुरु केले. त्यांच्या  या कार्याला सर्वसामान्यांची साथ मिळत होती. ब्रिटिश  अधिकारी  मॉकिन टॉस याने त्यांना पकडण्याचे फर्मान काढले. उमाजींनी गनिमी काव्यांचा वापर करुन ब्रिटिश  सैनिकांना अनेक  वेळा पराभूत  केले. रामोशी समाजाचे  पाच हजार सैनिक  त्यांच्या  टोळीत होते. ब्रिटिशांना  उमाजीं नाईक यांनी ठणकांवून सांगितले की , "आज एक बंड तुमच्या विरोधात झाले. असे शेकडो बंड तुमच्या विरोधात उभे राहतील." उमाजी नाईक यांनी जाहिरनामा काढून लोकांना  सांगितले  की , भारतीयांनी ब्रिटिशांची नोकरी सोडून त्यांच्या विरोधात एकञ झाले पाहिजेत . ब्रिटिशांना उमाजी नाईक यांची दहशत बसली  होती. त्यांनी उमाजींची माहिती  देणाऱ्यांना हजारो रुपयांचे बक्षीस  जाहिर केले. अखेर फितुरीचा वापर करुन १५ डिसेंबर  १८३१ मध्ये त्यांना भोर तालुक्यातील उतरोली येथे राञीच्या वेळी छापा टाकून पकडण्यात आले. पुण्याच्या मामलेदार कचेरीतील एका काळ्या  खोलीत साखळंदड अवस्थेत  त्यांना ठेवण्यात आले. ३ फेब्रुवारी  १८३२ मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.
----- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...