मुंबईचे शिल्पकार !
मुंबईचे आद्यशिल्पकार नानाशंकर शेट !
सातबेटांचे "मुंबई " शहर अगदी कमी कालावधीत देशाची प्रमुख आर्थिक राजधानी बनली. जगातील प्रमुख शहरांमध्ये मुंबईचा अव्वल नंबर लागतो. या मुंबईच्या जडणघडणीत महत्वाचे योगदान देणाऱ्या जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचा अग्रकम लागतो. नाना शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ मध्ये झाला. नाना बालपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते. १८२२ मध्ये मुंबईमध्ये शाळा पुस्तक मंडळाची स्थापना त्यांनी केली. त्यावेळी मुंबई ईलाख्यात गव्हर्नर एल्फिन्स्टन यांचा अंमल होता. नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला
नानांनी मातृभाषेतून शिक्षण दिले जावे याबाबत आपले आग्रही मत गव्हर्नर साहेबांसमोर मांडले. गव्हर्नर एल्फिन्स्टन यांची मुंबईतून बदली झाली. त्यावेळी त्यांच्यासाठीच्या निधीतून अनेक शैक्षणिक संस्थांची पायाभरणी झाली. या शैक्षणिक कार्यक्रम नानांचा मोठा वाटा होता. गव्हर्नर बेंटिग यांनी सतीची चाल बंद केली. त्यावेळी , सामाजिक क्षेत्रात प्रचंड कार्य नानांनी केले. १८५२ मध्ये बॉम्बे असोशिएशनच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांतून हिंदुस्थानची पहिली राजकीय चळवळ सुरु झाली. त्यांतून दादाभाई नौरोजी , न्यायमूर्ती रानडे सारखे अनेक राजकीय नेते तयार झाले. मुंबईचे आद्य शिल्पकार म्हणून नाना शंकरशेठ यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. ३१ जुलै १८६५ मध्ये नानाशंकर शेट यांचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment