इतिहासाचार्य वि.का.राजवाडे!
महाराष्ट्राचे जे अनेक नामवंत इतिहासकार व संशोधक होऊन गेले त्यामध्ये इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचा वरचा क्रमांक लागतो. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे इतिहास संशोधनाच्या कार्यात वाहिले होते. इतिहास संशोधन लेखन यासच त्यांनी जणू आपला संसार मानला होता. प्रचंड बुद्धिमत्ता,चिकाटी, सत्य शोधून काढण्याचा ध्यास , उत्तम पद्धतीने मीमांसा करण्याची वृत्ती
इतिहासाचे पूरक अशा सर्व विषयांचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, कठोर परिश्रम परीक्षा इत्यादी गुण वि.का. राजवाडे यांच्या अंगी असल्याने ते श्रेष्ठ दर्जाचे संशोधन करु शकले. वि.का. राजवाडे यांचा जन्म २४ जून १८६३ रोजी कोकणात वरसई या गावी झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याला झाले.१८८२ मध्ये ते मँट्रिक परीक्षा पास झाले .शालेय किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील नेमलेल्या पुस्तकांकडे त्यांनी कधीच फारसे लक्ष दिले नाही. इतिहास , अर्थशास्त्र , धर्मशास्त्र नीतिशास्त्र , राज्यशास्त्र, तत्वज्ञान ,तर्कशास्त्र , समाजशास्त्र इ. विविध शास्त्रांचा ग्रंथाचा त्यांनी अभ्यास केला." केवळ विद्यार्जन करण्याचा हेतू बाळगणारा मी , नोकर तयार करण्याच्या गिरणीत जाऊन पडलो". अशा कडक शब्दांत त्यांनी तत्कालीन शिक्षणसंस्था व शिक्षण पद्धतीसंबंधी आपली मते व्यक्त केली आहेत.विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी ज्ञानसाधना केली होती.ती आयुष्याच्या अंतापर्यत चालूच राहिली. १८९४ मध्ये भाषांतर मासिक राजवाडे यांनी सुरु केले. वि.का. राजवाडे यांनी १९८६ " मराठ्यांच्या इतिहासाची साधने " हा पहिला खंड लिहिला. पानिपतच्या युद्धासंबंधी २०४ पत्रे खंडात अखंडपणे प्रकाशित केले. वि.का. राजवाडे यांची राहणीही अत्यंत साधी होती. धोतर , लांब काळा कोट , डोक्याला पागोटे असा होती. एखाद्या ठिकाणी जुनी कागदपत्रे आहेत असे समजले की, ती मिळवण्यासाठी ते जिवाचे रान करीत.अहोरात्र परिश्रम करुन ते कागदपत्रांचे अर्थ लावीत प्रसंगी पदरमोड करुन ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करत असे. पैशाअभावी महाराष्ट्रातील अनेक किल्ले भ्रमण पायी केले. राजवाडे त्यांनी साधने जमवणे, त्यांचे वाचन , चिंतन - मनन व प्रसिद्धी हे काम आयुष्यभर व्रत म्हणून चालू ठेवले होते. या सर्व तपश्चर्येचे फळ म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाचे २२ खंडांतून त्यांनी अस्सल ४६६४ पत्रे प्रसिद्ध केले. ज्यांची पृष्ठसंख्या ६००० इतकी होती. २२ खंडातून ९ खंडांना त्यांनी ज्या प्रस्तावना लिहिल्या आहेत त्या विद्वेत्तेची सखोल अशा संशोधक वृत्तीची , इतिहासविषयक तत्वज्ञानाची साक्ष देतात. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या २२ खंडापैकी ९ व्या खंडाला प्रस्तावना ही ५३२ पानांची आहे. मराठ्यांच्या ऐतिहासिक दस्तावेजमधील खालील ग्रंथात राजवाडे यांनी प्रस्तावना लिहिल्या .१. महकावीची बखर -२. राधामाधवविलासचंपू-३. ज्ञानेश्वरी -एकनाथ ४. ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण ५. ऐतिहासिक विविध विषय खंड-१,२,३ ६. श्री.संस्कृत भाषेचा उलगडा ७. श्री. समर्थ रामदास ८. कादंबरी ,९.शाळांमधील अनुभव १०. राजवाडे मराठी धातुकोश ११.राजवाडे नामादी शब्द युत्पत्तिकोश ,१२.संकीर्ण लेखसंग्रह ,१३. राजवाडे लेखसंग्रह भाग-१.२.३ १४ भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास एवढी विपुल संपादा राजवाडेनी निर्माण केली. राजवाडेच्या अथक परिश्रमातून आज मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास जगासमोर आला. ३१ डिसेंबर १९२६ रोजी त्यांचे धुळे निधन झाले. धुळे येथे त्यांच्या नावाने राजवाडे संशोधन मंडळाची स्थापना केली आहे. त्यांत आज ही मराठ्यांच्या इतिहासाचे अस्सल साधने पाहण्यास मिळतात. आयुष्यभर अहोरात्र परिश्रम करणाऱ्या वि.का. राजवाडे यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा !
--- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment