विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ !

 

सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ !

१ जानेवारी बाळाजी विश्वनाथ यांची 

जयंतीनिमितीविनम्र  आभिवादन !

💐💐💐💐

महाराष्ट्राच्या  इतिहासात  शिवछत्रपतीचे स्थान अनन्यसाधारण आहे. शिवरायांच्या मृत्यूनंतर  औरंगजेब भली मोठी फौज  घेऊन महाराष्ट्रात  आला. मात्र २७ वर्षाच्या कालावधीत शिवरायांचे स्वराज्य त्याला जिंकता आले नाही. शंभूमहाराज ,  राजाराम महाराज  व महाराणी ताराबाई  यांच्या चिवट प्रतिकारामुळे महाराजांचे राज्य औरंगजेबाला जिंकणे शक्य झाले नाही. अखेर  २१ फेब्रुवारी  १७०७  मध्ये  अहमदनगरमधील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू  झाला. पुढे औरंगजेबाच्या कैदेत असलेले शंभूमहाराज पुत्र  शाहू महाराज महाराष्ट्र  आले. पुढे  महाराणी ताराबाईची कोल्हापूर  व शाहू महाराजांची  सातारा या छत्रपतींच्या दोन गाद्या निर्माण  झाल्या. मात्र पुढे कोल्हापूरच्या राज्य कोल्हापूरपर्यत मर्यादित  राहिले. मात्र शाहू महाराजांचे सातारा छत्रपतीचे राज्यांचे साम्राज्यात रुपांतर झाले. त्यांत छत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील नेतृत्व करणारे पेशवे व  नव्या दमाचे मराठे सरदार यांचा मोलाचा हात होता.  मात्र शालेय इतिहासाच्या पुस्तकात या संदर्भात  फार तोकडी माहिती असते. 

छत्रपती  शाहू महाराजांचे बाजू बळकट होण्यामागे  बाळाजी विश्वनाथ भट यांचा महत्त्वाचा  वाटा होता. बाळाजी विश्वनाथ  हे कोकणातील "श्रीवर्धन  " येथील राहणारे. त्यांचा जन्म १ जानेवारी १६६२ मध्ये झाला. मात्र जंजिरांच्या सिद्दीच्या धर्मांध वागणूकीला कंटाळून ते देशावर आले. काही काळ ते राजाराम महाराजांच्या रामचंद्र पंत अमात्य यांच्या हाताखाली नोकरीस होते. १७०७ मध्ये जेव्हा  छत्रपती  शाहू महाराज महाराष्ट्रात  आले. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ  शाहू महाराजांना येऊन मिळाले.  त्यावेळी शाहू महाराजांचा पक्ष बळकट करण्यासाठी  बाळाजी विश्वनाथ यांनी मोठी भूमिका पार पाडली.  महाराष्ट्रातील  शूर- वीर मराठ्यांना एकत्र करण्यासाठी  मराठा मंडळाची स्थापना केली. धनाजी जाधवांसारखे मातब्बर मराठे सरदार शाहू महाराजांच्या पक्षात आले. शिवरायांचे आरमार  कान्होजी  आग्रें यांनी छान सांभाळले होते. त्यांचे राजकारणातील वजन वाढले होते.  बाळाजी विश्वनाथ यांनी कान्होजी आग्रेंना शाहू महाराजांच्या पक्षात आणले. तमाम शूर -वीर मराठे सरदारांना शाहू महाराजांच्या छत्राखाली एक करण्याचे अनोखे कार्य बाळाजी विश्वनाथांनी केले.  त्यामुळे शाहू महाराजांनी  १७ नोव्हेंबर  १७१३ रोजी  बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपद दिले.  येथे पेशवे ही संकल्पना  पूर्णपणे  वेगळी होती. हे लक्षात  घेणे महत्त्वाचे  आहे. पेशवे पद हे शिवरायांपासून होते. मात्र त्याकाळात छत्रपतीचे नेतृत्व  होते. मात्र छत्रपती  शाहूंनी नेतृत्व  पेशव्यांना दिले.मात्र  मुख्य आधिकार छत्रपतीकडे  होते.  युद्धमोहिम पेशव्यांच्या  नेतृत्वाखाली  निघू लागले. अष्टप्रधान मंडळातील  इतर पदे नामधारी झाले. पेशवे व मराठा मंडळ  या नवीन विचारधारा  मुख्य झाली.  बाळाजी विश्वनाथ  यांनी दिल्ली दरबारात जाऊन स्वराज्याच्या सनदा , चौथाई व सरदेशमुखीचे सहा सुभ्यावरील हक्क   आणले. तसेच शंभू महाराजांची पत्नी महाराणी येसूबाई व शाहु छत्रपतीबरोबर कैदेत असलेले सर्व लोकांना  मुक्त करुन महाराष्ट्रात  परत आणले. दिल्लीच्या या मोठ्या राजकारणामुळे शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांना "सेनाकर्तै"हे पद दिले.  चौथाई- सरदेशमुखीच्या सनदांमुळे मराठ्यांना नर्मदा नदी ओलांडून  आपला राज्यविस्तार करण्याची मोठे क्षेत्र निर्माण  झाले.  १२ एप्रिल  १७२० मध्ये बाळाजी विश्वनाथ यांचा सासवडजवळ मृत्यू  झाला. आपल्या कर्तृत्वाने बाळाजी विश्वनाथ  यांनी पेशवा या संकल्पनेला एक वेगळी लकाकी दिली. " अतुल पराक्रमी  सेवक" असे शाहू महाराजांनी  बाळाजी विश्वनाथांचे वर्णन केले आहे.

---- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड


संदर्भ -१.  मराठ्यांचा इतिहास -खंड-२ अ.रा.कुलकर्णी  व प्र.न .देशपांडे 

   २. प्रतापसुर्य बाजीराव - प्र.के.घाणेकर

३.मराठ्यांचा इतिहास  -कोलारकर


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...