सानेगुरुजी एक आदर्श
२४ डिसेंबर सानेगुरुजीची जयंतीनिमित्त विनम्र आभिवादन!
उगवत्या पिढीवर चांगले संस्कार करुन देशाचे भविष्य बलवान करणारे पाडुरंग सदाशिव साने म्हणजे "सानेगुरुजी"आजही महाराष्ट्रात आदर्श मानले जातात. "जो करेल मनोरंजक मुलांचे त्यांचे नाते जडेल प्रभुशी " हे त्यांच्या जीवनाचे ब्रीद होते. सानेगुरुजी चा जन्म २४ डिसेंबर १८९९ मध्ये कोकणातील पालगड याठिकाणी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण दापोली येथे झाले. तर त्यांचे उच्चशिक्षण पुणे येथे झाले. सानेगुरुजीची कर्मभूमी ही खानदेश होती. बालपणी त्यांच्या जीवनाच्या सर्व अवस्था व कक्षा व्यापणारी त्यांची आई " यशोदाबाई " यांना त्यांनी आपले दैवत मानले. आई माझा गुरु ! आई कल्पतरु! असे सार्थ वर्णन सानेगुरुजींनी केले आहे. सानेगुरुजी एक आदर्श शिक्षकच नव्हे; तर ते चांगले लेखक , पञकार , देशभक्त समाजसुधारक म्हणून परिचित आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला भरपूर खाद्य मिळावे म्हणून त्यांनी "छाञालय " हे दैनिक सुरु केले. त्यांची १११ पुस्तके लिहिली. " गोड निबंध , लहान मुलांच्या गोष्टी , असे खूप बालसाहित्या बरोबरच मानवजातीची कथा , भारतीय संस्कृती , गोष्टीरुप गांधीजी हे पुस्तके विशेष प्रसिद्ध होते. महात्मा गांधीच्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रीय भाग घेतला. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास पत्करावा लागला . नाशिकच्या कारागृहात असताना त्यांनी " श्यामची आई " हे पुस्तक लिहिले. ते म्हणजे आजही संस्काराची शिदोरी मानली जाते. म.गांधीच्या अस्पृश्यता - निवारणात त्यांनी भाग घेतला. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी आमरण उपोषण केले. अखेर त्यांत त्यांना यश आले. खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे........... बलसागर भारत होवो , विश्वात शोभूनी राहो........ असे अनेक सुंदर गीत त्यांनी लिहिली. .
भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साधी, सरळ, ओघवती भाषा, भावपूर्ण संस्कारक्षम निवेदनशैली हे त्यांच्या लेखणाचे विशेष गुण होते. असे बहुआयामी व्यक्तीमत्व असलेले सानेगुरुजीचा हा आदर्श आजही प्रत्येकासाठी आदर्श व मार्गदर्शक आहे.
- प्रशांत कुलकर्णी मनमाड.
No comments:
Post a Comment