विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 20 August 2021

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

 

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

१९ व्या शतकात भारतात शेकडो समाजसुधारक जन्माला आले. त्या समाजसुधारकांनी  देव हा मनुष्यात शोधला ;मानवता हाच खरा धर्म मानला.  यात मुशीतील समाजसुधारक म्हणजे  विठ्ठल रामजी शिंदे होय. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल  १८७३ मध्ये  कर्नाटकातील " जमखंडी" येथे झाला.त्यांचे वडील रामजीबाबा हे संत  तुकाराम महाराजांचे भक्त होते. " विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ! भेदाभेदभ्रम अमंगळ !!" या विचारांचे बाळकडू विठ्ठलरावांच्या जीवनात बालपणापासून होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचे मॕट्रिकचे शिक्षण  जमखंडी येथे झाले. पुढे उच्चशिक्षण त्यांचे पुणे व पुढे मॕचेस्टरला गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे भारतात परत आले.  विठ्ठल रामजी शिंदेना प्रथम राजकीय  चळवळीचे आकर्षण  होते. त्यांनी  लोकमान्य टिळकांशी संपर्क  साधला. लोकमान्य टिळकांबाबत नेहमी चुकीचा प्रचार केला जातो की , ते समाजसुधारणेच्या विरोधात होते. सनातनी  वगैरे मात्र त्याच लोकमान्य टिळकांनी  विठ्ठल  रामजी शिंदे यांना  सांगितले  की , तुम्ही  राजकीय चळवळीपेक्षा समाजसुधारणेचे कार्य करावे. समाजसुधारणेचे कार्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे. (संदर्भ- लोकमान्य ते महात्मा -सदानंद मोरे ) विठ्ठल रामजी शिंदेनी आपला मार्ग निवडला तो म्हणजे   समाजसुधारणेचा !  १९१७ मध्ये  राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात  विठ्ठल रामजी शिंदेनी अस्पृश्यतानिवारणाचा ठराव आणावा म्हणून  टिळकांनी  त्यांना  सर्वतोपरी मदत केली. अॕनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली  कलकत्ता  अधिवेशनात हा ठराव मंजूर  झाला.  या ठरावाला पाठिंबा  देताना  लोकमान्य टिळक म्हणाले ," प्रत्यक्ष  देव जरी अस्पृश्यता पाळू लागला  तरी मी त्याला देव म्हणून  ओळखणार नाही, पुढे २५ डिसेंबर  १९२० या दिवशी नागपूर येथे महात्मा गांधीच्या अध्यक्षतेखाली  "आखिल भारतीय  अस्पृश्यतानिवारक परिषद " भरली. यांत विठ्ठल रामजी शिंदे यांचे योगदान मोठे होते. विठ्ठल  रामजी शिंदेनी अस्पृश्यतानिवारणाबरोबरच देवदासी व मुरळी या अनिष्ट प्रथा बंद करण्याचे महत्त्वाचे  कार्य केले. धर्म , तत्वज्ञान , इतिहास ,समाजशास्त्र ,मानववंशशास्त्र या विषयांवर विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोठा व्यासंग होता. त्यावर त्यांनी  अनेक  लेख  व व्याख्यान दिले.  माणसाला देव  मानणारा आणि  समाज हेच आपले मंदिर समजणारे निष्काम कर्मयोगी विठ्ठल रामजी शिंदे यांना महर्षी ही पदवी देण्यात आली. असा हा समाजपुरुष २ जानेवारी  १९४४ मध्ये वैकुंठवासी झाला.


--- प्रशांत  कुलकर्णी  मनमाड


No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...