हुतात्मा अनंत कान्हेरे
२१ डिसेंबर १९०९ हाच दिवस ज्यादिवशी नाशिक येथे ब्रिटिश जिल्हिधिकारी क्रूर जॕक्सनचा वध केला.
जाज्वल्य देशभक्तीचा मूर्त अविष्कार म्हणजे क्रांतिकारी चळवळ होय. ज्यावेळी एखाद्या क्रांतिकारक वधस्तंभावर चढत असत त्यावेळी त्याच्या प्रेरणेतून हजारो क्रांतिकारक तयार होत असे. क्रांतिकारी मार्ग पत्करणे म्हणजे सतीचे वाण होते. सर्व क्रांतिकारक तरुण होते. त्यांनी ठरवले असते तर चांगल्या पगाराची नोकरी पत्करुन सुखाचे जीवन जगता आले असते. मात्र या सर्व क्रांतिकारकांनी आपले संपूर्ण जीवन भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केले. अनंत लक्ष्मण कान्हेरे हे याच विचाराने प्रेरित झालेले क्रांतिकारक होय. अनंतराव यांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे यागावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते आपल्या मामाकडे औरंगाबाद येथे राहू लागले .त्यावेळी नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी " अभिनव भारत " ही क्रांतिकारक संघटना स्थापन केली होती. देशभक्तीचे वेड असलेले अनेक तरुण या संघटनेकडे ओढले गेले. त्यावेळी सावरकर हे लंडनला उच्चशिक्षणासाठी इंडिया हाऊस मध्ये राहत होते. नाशिकची अभिनव भारत संघटना सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर चालवत होते. त्यावेळी नाशिकच्या जिल्हाधिकारी पदी जॕक्सन नावाचा क्रूर व ढोंगी अधिकारी होता. क्षुल्लक कारण दाखवून तो देशभक्तांना कारावासात टाकत असे. अभिनव भारत संघटनेचे अनेक तरुण व बाबाराव सावरकरांना त्याने दडपशाहीचा अवलंब करुन तुरुंगात टाकले. त्याच काळात लंडन येथे क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा यांनी " क्रूर कर्झन वायलीचा वध केला. त्या घटनेनंतर नाशिकमध्ये जिल्हाधिकारी जॕक्सनचा वध करावा हा विचार १८ वर्षाचा तरुण अनंत कान्हेरे यांच्या मनात घोळू लागला . स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनहून अनंत कान्हेरेना पिस्तुल पाठवले. अनंतराव नेमबाजीचा सराव करु लागले. दिवस ठरला २१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॕक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात"शारदा " नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॕक्सन या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते.जॕक्सनने विजयानंद नाट्यगृहात प्रवेश करण्याआधि अनंत कान्हेरे , अण्णासाहेब कर्वे व विनायक देशपांडे हे तीन तरुण नाट्यगृहात आले होते. जॕक्सनने दरवाजा़तून प्रवेश केल्यावर अनंत कान्हेरेंनी चार गोळ्या जॕक्सनवर झाडल्या. जॕक्सन जागीत कोसळले. अनंतराव शांतपणे पोलिसांना स्वाधीन झाले.अनंतराव ,कर्वे व देशपांडे यांना १९ एप्रिल १९१० मध्ये ठाण्याच्या तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली.मात्र हे सर्व तरुण मोठ्या धीरोदत्त वृत्तीने फाशी गेले. एखाद्या अधिकाऱ्यांचा वध करुन देशाला स्वतंत्र मिळणार नाही हे या तरुणांना माहित होते. मात्र निर्माल्यवत झालेल्या भारतीयांना जागे करण्यासाठी असे वध आवश्यक होते. १००० निषेध सभापेक्षा अशा घटनेने ब्रिटिशांवर प्रचंड जरब बसली. निरीश्वरवादी क्रांतिकारक भगतसिंग यांनी हे मान्यच केले होते.अशा असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानाचाही परिणाम भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाला.
---- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment