संत गाडगेबाबा
२० डिसेंबर संत गाडगेबाबांची पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !
आज स्वच्छता अभियान कार्यक्रम आपण देशभरात राबविताना पाहतो. टि.व्ही, वर्तमानपत्रात या संदर्भात शेकडो बातम्या व जाहिराती दिसतात. मात्र हे काम अनेक वर्षापूर्वी संत गाडगेबाबा गावागावात करत होते. कोणतेही अवघड काम एका माणसापासून सुरु होते. त्यांचे मूर्तिमंत प्रतिक म्हणजे संत गाडगेबाबा होय. गाडगेबाबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ मध्ये झाला. त्यांची शेतीभाती होती. आर्थिक परिस्थिती चांगली होती. मात्र गाडगेबाबांच्या वडीलांचे लवकरच निधन झाल्यावर ते आपल्या मामाकडे राहू लागले . गाडगेबाबा भोवतालचे दुःख व अंधश्रध्दा पाहून व्यतित होत असे. जगाच्या कल्याणासाठी आपण ही काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात येत असे. त्यामुळे एक दिवस आपले कौटुंबिक जीवनाचा त्याग करुन ते बाहेर पडले. ते गावोगावी फिरु लागले. रोज नव्या गावी जायचे दिवसभर गाव स्वच्छ करायचे. त्यानंतर रात्री लोकांच्या मनावरील मळभ दूर करण्यासाठी कीर्तन करायचे. साध्या सोप्या भाषेत गाडगेबाबा अंधश्रध्देवर प्रहार करत असे. गाडगेबाबांचा विरोध धर्म व ईश्वराला नव्हता तर चुकीच्या रुढी परंपरा, कर्मकांड व अंधश्रध्देला होता. एक दिवस प्रसंंग गाडगेबाबा रेल्वेने प्रवास करत असताना एक सुधारित विज्ञानवादी गृहस्थाने गाडगेबाबांना प्रश्न विचारला की , "आपण गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे कीर्तन करतात आपण देवाचे अस्तित्व मानतात का ?" त्यावर गाडगेबाबांनी त्या गृहस्थाला प्रतिप्रश्न विचारला" आपण आता ज्या रेल्वेने प्रवास करत आहे ती कधी बंद पडते का ?" त्यावर त्या गृहस्थाने उत्तर दिले "हो कधी कधी बिघडली तर बंद पडते." पण ईश्वराने निर्माण केलेली ही सृष्टी जगराहाटी कधी बंद पडल्याचे तुम्ही ऐकले आहे का ? त्यावर तो गृहस्थ शांत झाला. ही सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराला मी मानतो. कोणतेही शिक्षण न झालेल्या गाडगेबाबांनी आपल्या अनुभवाच्या शाळेतून खूप काही शिकले होते. गाडगेबांबानी अनेक अनाथआश्रमे काढली. त्यांतून गोरगरीबांना राहण्याची सोय केली. मात्र त्याबरोबर स्वावलंबी जीवनाचे धडे लोकांना दिले. प्रसिद्ध लेखक गो.नी.दांडेकर यांनी अनेक वर्ष गाडगेबाबांना बरोबरच फिरस्ती केली. गाडगेबाबांचे चरित्र -लेखन केले. गाडगेबाबांनी आपल्या अनाथआश्रमांचे ट्रस्टी आपल्या नातेवाईकांना केले नाही.दानशूर लोकांनी दिलेल्या देणग्याचा विनियोग गरीब लोकांसाठी केला. जगाच्या कल्याणासाठी झटणा- या गाडगेबांचे निधन २० डिसेंबर १९५६ मध्ये झाले.
---प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment