विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

राजधुऱधर..सदाशिवभाऊ पेशवे.....

 

राजधुऱधर..सदाशिवभाऊ पेशवे.....

चिमाजी अप्पा यांचे पुत्र सदाशिवभाऊ पेशवे यांची आज  जयंती ३ आॕगस्ट १७३० त्यानिमित्त लेख!

          श्रीमंत थोरले बाजीरावांनी मराठ्याचे साम्राज्याची सीमा दिल्लीपर्यत पसरवली. बाजीरावांच्या मृत्यूनंतर  त्यांचे थोरले पुत्र नानासाहेब पेशवे पदावर विराजमान झाल्यानंतर  नर्मदानदी ओलांडून  जाणे चौथाई - सरदेशमुखी वसूल करणे मराठ्यासाठी नित्यांची बाब झाली होती.  मात्र  त्यानंतर अफगाणिस्थानचा बादशहा अहमदशहा अब्दाली याने १७४८ मध्ये पहिली स्वारी केली. नंतर उत्तरभारतात येऊन लूट व कत्तली त्याने तीनवेळा केल्या.   त्यामुळे मुघलबादशहाने १७५२ मध्ये मराठ्यांनी करार केला .त्या करारानूसार विशिष्ट  रक्कम  , पंजाबपर्यत चौथाई-सरदेशमुखीचा अधिकार  मराठ्यांना देण्यात आला. त्या मोबदल्यात मराठ्यांनी मुघलांचे अब्दालीपासून रक्षण करण्याचे वचन दिले. त्यामुळे  बाजीरावांचे कनिष्ठ पुत्र  रघुनाथरावांनी अब्दालीने जे भारतातील प्रांत बळकावले होते. ते परत मिळवण्यासाठी उत्तरेत मोहिम काढली. आणि  थेट अटकेपार झेंडे लावले. तेव्हापासून अटक ही मराठ्यांची सीमा ठरवली. अब्दालीचा मुलगा तैमूरशहाला  मराठ्यांनी हुसकावून दिले. या बातम्यांनी अब्दाली संतापला. त्यात  पानिपत युध्दाचा कळीचा नारद नजीबखानाने अब्दालीला निमंत्रण  दिले. १० जानेवारी  १७६० रोजी बराई घाटाजवळ अब्दालीचे सैन्य यमुना ओलांडत असताना दत्ताजी शिंदे त्यांच्याशी तुंबळ युद्ध  झाले. त्यांत दत्ताजी शिंदेचा मृत्यू  झाला. ही बातमी पुण्याला येऊन धडकली. त्यावेळी अब्दालीचे पारिपत्य करण्यासाठी  कोणाला पाठवावे हा प्रश्न श्रीमंत नानासाहेबांसमोर होता. त्यावेळी नुकताच उदगीरची मोहिमेत मोठा विजय मिळवलेल्या सदाशिवभाऊचे  सर्वत्र  गाजत होते. सदाशिवभाऊ हे बाजीराव पेशव्यांचा भाऊ चिमाजी अप्पा यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म ३ अॉगस्ट १७३० मध्ये झाला. चिमाजी अप्पाचा मृत्यू  झाला .तेव्हा सदाशिवभाऊ फक्त दहा वर्षाचे होते. पुढे त्यांनी  युध्दशास्त्र व इतर शिक्षण  घेतले.  सदाशिवभाऊ आपल्या पित्यासारखे शूर   होते. त्यावेळी मोठा तोफखाना , बंदुकांच्या जोरावर निजाम मराठ्यांना त्रस्त करत होता. त्यावेळी गनिमी काव्याच्या अदभुत  कौशल्याने सदाशिवभाऊंनी निजामाचा बंदोबस्त केला. निजामाचा अजस्त्र तोफखाना मराठ्यांच्या ताब्यात आला.  या पार्श्वभूमीवर  अब्दालीचा बंदोबस्त  करण्याची मोहिम सदाशिवभाऊ पेशव्यांकडे आले. त्याप्रमाणे  १६ मार्च १७६० रोजी सदाशिवभाऊ प्रचंड फौज घेऊन उत्तरेकडे निघाले.२अॉगस्ट  १७६० मध्ये सदाशिवभाऊंनी दिल्ली  सर केली. अब्दालीच्या सैन्याचा धीर सुटला. नजीबने मराठ्यांचा पूर्ण  पराभव होत नाही. तोपर्यंत  लढा चालू ठेवण्याची विनंती अब्दालीला केली. भाऊंनी दिल्ली  सोडून कुंजपु-याकडे कूच केली. १७ अॉक्टोबर १७६० रोजी कुंजपुरा जिंकून दत्ताजीच्या मृत्यूला जबाबदार  असणारा कुत्बशहाचा वध  केला.इकडे अब्दालीने यमुना ओलांडली.  आजच्या हरियाणाजवळील पानिपतजवळ अब्दाली व भाऊसाहेब यांचे सैन्य समोरासमोर आले.  अब्दालीने भाऊसाहेबांना पत्र पाठवले होते की, पंजाब प्रांतापर्यत आमचे राज्य व पुढील  राज्य मराठ्यांचे असेल. मात्र मराठ्यांची सीमा अटकपर्यत असेल. तुझे राज्य अफगाणिस्तानपर्यत असावे  असे स्पष्ट  निर्देश भाऊसाहेबांनी दिले.  दरम्यान  मराठ्यांजवळील धान्याचा साठा संपुष्टात  आल्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली. शेवटी १४ जानेवारी १७६१ रोजी युध्दाला तोंड फुटले.  भाऊसाहेबांचा तोफखाना प्रमुख  इब्राहिमखान गारदीच्या तोफासमोर अब्दालीचे सैन्य मोठ्या प्रमाणात गारद होत होते. मराठ्यांची सरशी होत होती. मात्र नंतर परिस्थितीत बदल झाला. अब्दालीचे राखीव सैन्याचा अचानक प्रवेश झाला.युध्द पारडे फिरले. अखेर त्यांत मराठ्यांचा पराभव झाला.पानिपत म्हणजे   मराठ्यांचे हार नसून हिंदुस्थानाच्या रक्षणासाठी   केलेले बलिदान  होते. सदाशिवभाऊ व तमाम मराठ्यांनी त्यांच्या अंगात रक्ताचा थेंब असेपर्यंत मातृभूमीसाठी केलेले बलिदान होते. अब्दालीने पुन्हा  भारतात आक्रमण करण्याची हिंमत केली नाही. एवढेच नव्हे तर त्याने भारतातून बाहेर जाताना दिल्लीचे रक्षण करण्याची जबाबदारी  पुन्हा  मराठ्यावर सोपवून तो अफगाणिस्थानला गेला. त्यावेळी त्याने पुण्यात नानासाहेब  पेशव्यांना पत्र पाठवून सदाशिवभाऊच्या युद्धकौशल्याची तोंडभरुन स्तुती केली.



     प्रशांत कुलकर्णी  मनमाड

Comments

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...