विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 19 August 2021

एक विलक्षण बांधणीतंत्र.......खांदेरीचा किल्ल्ला....

 

एक विलक्षण बांधणीतंत्र.......खांदेरीचा किल्ल्ला....

१४ अॉगस्ट १६७८ मध्ये शिवरायांनी खांदेरीची किल्ल्यांची निर्मिती केली. त्यावर प्रकाश टाकणार छोटासा लेख !




छत्रपती  शिवाजी महाराजांचे युध्द व मोहिम तसेच त्यांचा पराक्रम     यावर भरपूर  प्रमाणात लेखन  सर्वत्र आढळते. मात्र शिवरायांचे किल्ले बांधणीत केलेले विलक्षण  प्रयोग हा विषय तसा दुर्लक्षित राहिलेला दिसतो. महाराष्ट्रात ( संख्येने )  जेवढ्या प्रकारचे  किल्ले आहेत तेवढे किल्ले जगात कुठे आढळणार नाही. सामान्यतः  तीन प्रकारचे किल्ले आढळतात  १.डोंगरी किल्ले - डोंगरावर बांधलेले किल्ले उदा - प्रतापगड , रायगड वगैरे २. भुईकोट किल्ले - जमीनीवर बांधलेले किल्ले उदा -चाकणचा किल्ला  इत्यादी  तर ३. समुद्रातील किल्ले - समुद्राच्या बेटावर गोडे पाणी पाहून बांधलेले किल्ले. उदा - विजयदुर्ग , सिंधुदुर्ग वगैरे होय.

 त्याकाळात ज्यांच्या ताब्यात किल्ला त्या परिसरात  त्यांची सत्ता चालत असे. म्हणून  शिवरायांनी शत्रूच्या ताब्यातील किल्ले जिंकले व ज्याठिकाणी गरज आहे त्याठिकाणी  स्वतः किल्ल्यांची उभारणी  केली. शिवरायांनी  किल्ल्यांची बांधणी करताना निरनिराळे प्रयोग  केले. आज आपण खांदेरी किल्ल्याविषयी माहिती मिळवू या!

 मुंबईकर ब्रिटिश  आणि  जिंजिरेकर सिद्धी हे दोघेही कोकणातील हिंदवी स्वराज्याचे शत्रू होते. ब्रिटिश  व सिद्धी यांचे आरमार प्रबळ होते. शिवरायांनी  या प्रबळ शत्रूना शह देण्यासाठी   अनेक समुद्री किल्ल्यांची निर्मिती  केली. त्यांत सिंधुदुर्ग , पद्मदुर्ग , विजयदुर्गाबरोबरच खांदेरी किल्ल्यांचे महत्त्व  आहे.  जंजिरा ते मुंबई  या सागर मार्गावरच एखादा जलदुर्ग उभारुन या मार्गावर एखादी  पाचर मारता यावी म्हणून  शिवरायांनी  थळपासून जवळ असणाऱ्या खांदेरी बेटाची निवड केली.खांदेरीचा किल्ला म्हणजे  जणू अचल युद्धनौकाच होय. मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली  पुरेसे सैनिक , तोफा , गवंडी , पाथरवट , लोहार , सुतार , चांभार आणि  हरकामे देऊन जुलै १६७६ मध्ये खांदेरी किल्ल्यांच्या प्रत्यक्ष उभारणीस सुरुवात केली.खांदेरीचा पाणकोट म्हणजे  मुंबईच्या उरावर उगारलेला खंजिरच ठरणार होता.यांची जाणीव ब्रिटिशांनी  होती. म्हणून  हा किल्ला बनू नये म्हणून  मुंबईचा गव्हर्नर जेराल्ड अँजिअर्स , मिंचिन , केग्विन व थोर्प यांनी  बांधकाम व्यत्यय आणण्याचे  हरप्रकारे प्रयत्न केले.  मात्र सर्व संकटांना तोंड देत शिवरायांनी या किल्ल्यांची निर्मित्ती अखेर १४ अॉगस्ट १६७८ मध्ये पूर्ण केली.विशेष  म्हणजे  या किल्ला जिंकण्याचा प्रयत्न ब्रिटिश  अवश्य  करणार हे माहित असल्याने या किल्ल्यांच्या बांधणीत विलक्षण प्रयोग  केलेले दिसते. खांदेरी किल्ल्यांच्या तटबंदीजवळ पाण्यात लहानमोठे , न घडवलेले ओबडधोबड  धोंडे नि खडक जणू काही पेरुन टाकले. या खडकांपैकी काही भरतीच्या पाण्यात पातळीच्याही वर , तर काही आहोटीच्या वेळी फक्त पाण्याबाहेर डोकावणारे असंख्य  दगड तेथे जाणूनबुजून  टाकण्यात आले. समुद्रात  एखादी वस्तू पडली म्हणजे  अल्पावधीत त्यावर कालवे  म्हणजे बारनॕकल्स ही शंख -शिंपल्यांच्या वर्गातील  प्राण्याची वाढ होऊ लागते. त्यांच्या अतिधारदार कडांमुळे त्या खडकांवर वावरणे अशक्य होऊन बसते. तसेच त्याकाळात कच्चा चामड्याच्या  पादत्राणांचा वापर होत असे ; व  असे पादत्रांणे सागरी खारट पाण्यात वापरले तर त्यांची  चांगलीच     वाटच लागते. आणि  अनवाणी वावरणे शक्य नाही तर पादत्राणे या पाण्यात टिकतच नाही.त्यामुळे खांदेरी बेटाच्या सर्व  बाजूंना पेरलेल्या खडकांवर उतरुन तेथून तटाला शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश करणे अशक्यच होते. जर एखादी शत्रूची बोट या किल्ल्यांच्या तटबंदीशी लगट करण्याचा प्रयत्न  केला तर तटबंदी भोवती पेरुन ठेवलेल्या दगड किंवा  खडकावर निश्चितच  आपटणार अशीही व्यवस्था  होती. तर दुसरीकडे  समुद्राच्या लाटा तटबंदीच्या आधि खडक व दगडावर आदळल्यामुळे तटबंदीला त्या लाटा कमीप्रमाणात आदळतील. त्यामुळे तटबंदीचे शत्रूपासून व लाटापासून ही संरक्षण  होऊन केवढा विलक्षण  प्रयोग या किल्ल्याच्या भोवती शिवरायांनी केला. यावरुन शिवरायांच्या कल्पकतेची जणू साक्ष या किल्ल्याच्या प्रयोगातून मिळते.मुंबईच्या प्रख्यात मरीन ड्राइव्हच्या संरक्षणासाठी  याप्रकारे प्रचंड मोठे काँक्रीटचे ट्रायपॉडस एकात एक गुंतवून टाकले आहे. त्यामुळे मुंबापुरीचा हा हार शाबूत राहिला आहे. ही युक्ती शिवरायांनी साडेतीशने वर्षापूर्वी खांदेरी दुर्ग बांधताना केली यावरुनच शिवरायांचे दुर्गव्यवस्थापनातील विज्ञान लक्षात येते. 




संदर्भ -शिवरायांचे दुर्गविज्ञान - प्र.के.घाणेकर 

-- प्रशांत कुलकर्णी  मनमाड (नाशिक)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...