इतिहास एक संकल्पना !
इतिहास कसा लिहिला जातो ? याबाबत अनेक लोकांना मध्ये संभ्रम आहे. बरेच लोक म्हणतात "जेते इतिहास लिहितात" [म्हणजे जिंकलेले ] त्यामुळे जास्तीतजास्त सत्य बाहेर निघणे शक्य नसते. मात्र इतिहासात कोणतीही गोष्ट अंतिम सत्य नसते. प्राचीन व मध्ययुगीनकाळी पुरेसे ऐतिहासिक साधने उपलब्ध नव्हते. त्यामुळे इतिहासलेखनात अडचणी निर्माण होत असे. मात्र आधुनिककाळात जेव्हा इतिहासलेखन शास्त्रांचा विकास झाला. तसेच इतिहासांचे निरनिराळे प्रवाह निर्माण झाले. त्यावेळी जास्तीतजास्त वस्तुनिष्ठ इतिहास बाहेर पडू लागला आहे. बरेच लोक सहज म्हणतात पुस्तकात जो इतिहास लिहिला तो सत्य कसा मानायचा ? माझ्यामते इतिहास कोणत्या पुस्तकात कसा लिहिला याला जास्त महत्त्व नसते. तर तो इतिहास लिहिताना किती अस्सल कागदपत्रांचा वापर केला. तो समकालीन आहे का ? याला जास्त महत्त्व असते. तसं पाहिले तर इतिहासलेखनांची सुरुवात ग्रीसमध्ये झाली. भारतात वेद, वाडंमय , महाकाव्य , उपनिषदे , स्मृती व पुराणांमार्फत इतिहासाचे संकलन केले गेले. ते लेखनापेक्षा मौखिक पद्धतीने जतन करण्यात आले. कश्मीरचा इतिहास " "राजतरंगिणी " कल्हण नावांच्या इतिहासकारकांने लिहिले. विशेष म्हणजे अनेक राज्यात इतिहास लिहिताना त्या त्या राजाला खुश करण्यासाठी चांगल्या गोष्टींचाच उल्लेख केला जात असे. मात्र कल्हणने कश्मीरच्या राजांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा कटाक्षाने उल्लेख केला. त्यामुळे त्या इतिहासात वस्तुनिष्ठता येते. आधुनिक इतिहास लिहिताना " कोणताही ऐतिहासिक साधन मिळाल्यावर ते साधन कोणत्या काळातील आहे ? मिळालेले दस्तऐवज त्याकाळात होते का ? लिखाणातील ती शाई होती का ? ती लिपी होती का ? तसेच ते दस्तऐवज ज्यांने बनवले तो राजाचा आश्रित तर नव्हता ना ? त्यांत त्यांच्या वैयक्तिक संस्काराचा भाग तर नाही ? अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो. तसेच आधुनिक इतिहास लेखनशास्त्रांत पुरातत्वशास्त्र, मावनवंशशास्त्र ,नाणकशास्त्र , लिपीशास्त्र यांचाही समावेश केला जातो. कर्ब -१४ सारख्या वैज्ञानिक शास्त्रांचा समावेश असल्याने वस्तुनिष्ठ इतिहास बाहेर पडत आहेत. तसेच एखाद्या घटनांचा विचार करताना वसाहतवादी , राष्ट्रवादी , मार्क्सवादी , सभालटर्न अशा अनेक प्रवाहांतून पाहून वास्तववादी इतिहास लिहिला जातो. पुन्हा इतिहास म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेघ नाही. यात काळानूसार वेगवेगळ्या शोधानूसार अजून वस्तुनिष्ठ येत आहे. तसेच इतिहासात फक्त दस्तऐवजच नाही तर भौतिक व मौखिक साधनांचाही उपयोग केला जातो. त्यामुळे आधुनिककाळात सत्य इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग आहे. गरज आहे. मोकळ्या मनाने व पूर्वग्रहदुषित मन बाजूला ठेवून जाणून घेण्याची..........
---- प्रशांत कुलकर्णी मनमाड
No comments:
Post a Comment