मराठेशाहीतील धाडसी मराठा वीरांगना तुळशीबाई निंबाळकर
तुळशीबाई निंबाळकरांचा मुगल सुभेदाराविरूध्द धाडसी पराक्रम: सन १७१० मध्ये मराठा सरदार निंबाळकर यांची विधवा राणी तुळशी बाई हिने बऱ्हाणपुर शहराला वेढा घालून अठरा दिवस आतमध्ये कोंडी केली. की बेरारमधून कुमक मदत मागवावी लागली. याची कथा अशी आहे की, पतीच्या निधनानंतर १७०९ मध्ये भरपाईच्या अर्जविनंत्या करूनही मुगल सुभेदार मीर अहमद खान उत्तर देईना तेव्हा तुळशीबाई निंबाळकरांचा मुगल सुभेदाराविरूध्द धाडसी पराक्रम (सन १७१० मध्ये) मराठा सरदार निंबाळकर यांची विधवा राणी तुळशी बाई हिने बऱ्हाणपुर शहराला वेढा घालून अठरा दिवस आतमध्ये कोंडी केली. बेरारच्या सुलतानाला मदत मागवावी लागली.
याची कथा अशी आहे की पतीच्या निधनानंतर १७०९ मध्ये भरपाईच्या अर्जविनंत्या करूनही मुगल सुभेदार मीर अहमद खान उत्तर देईना. पंधरा सोळा हजार घोडेस्वार पाठवून अठरा लाख चौथाईची रक्कम वसूल करून द्यावी अशी मागणी केली होती कारण त्या बदल्यात बऱ्हाणपुर शहर आणि तिथल्या सराईत राहणाऱ्या मुगल अधिकारी लोकांचे रक्षण करण्याचे आश्वासन मराठ्यांनी मोगलांना दिले होते. पण सुभेदाराला विटले एका विधवा बाईने आता काय होईल या विचाराने दुर्लक्ष केले.
तिने बऱ्हाणपुरला वेढा दिला. मराठी विधवा बाईने केलेल्या आक्रमणास व मागणीला तोंड देण्यासाठी सुभेदार आणि फौजदार यांनी सैन्यबळाच्या जोरावर त्या शहराकडे आगेकूच केले. मुगल सैन्याच्या आगमनाची वार्ता तुळसीबाईस समजली तिने मराठा सैन्याची दोन गटात विभागणी केली. पाच हजार घोडेस्वारांची एक तुकडी तिने मीर अहमद खान याला बऱ्हाणपुरकडे रोखण्यासाठी पाठवली आणि उरलेल्या सैन्याच्या बळावर तिने शहर लुटण्याची योजना आखली. मराठ्यांची सेना व मीर अहमद खान याच्या नेतृत्वाखाली लढा देणारी मुगल सैन्य यांच्यात चकभकी घडल्या त्यात मीर अहमद खान जखमी झाला.परंतु त्याला त्याच वेळी मराठी सैन्याने बऱ्हाणपूर लुटले ही बातमी कळली.तेव्हा तो बऱ्हाणपुरच्या दिशेने निघाला. या चकमकीत जाफरखान हा ही मुघलांच्या बाजूने मराठ्यांविरूध्द लढला परंतु मराठी सैन्याचा मारा एवढा जबरदस्त होता की त्यापुढे मुगला़ंच्या सैन्याचे व अहमदखानाचे मुलाचे प्रयत्न असफल ठरले आणि मुगल सैन्याने पलायन केले. काही सैनिक जे मराठ्यांच्या हाती लागले ते त्यांनी कैद केले. मीर अहमद खान मात्र जखमी झाला आणि मराठ्यांशी लढतांना घोड्यावरून खाली पडून मरण पावला.
बऱ्हाणपूर मध्ये अडकून पडलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी पैसा देवून सुटका करून घेतली.
बेरारच्या सुभेदार सय्यद रूस्तान खान मदतीला मोठे सैन्य घेऊन येत आहेत ही वार्ता कळल्यावर मगच समझोता झाला आणि वेढा उठला. पतीच्या निधनानंतर धीराने विचाराने वागणारी मोठ्या मोगल सैन्याला आपल्या चतुर धोरणाने नमवणारी तुळसाबाई निंबाळकर इतिहासाच्या पानांवर परत झळकायला हवी.
महाराणी म्हणून महालांची कथा सरसपणे ऐकणाऱ्यांना ही भवानी आणि अशा अनेक स्रीया विस्मरणात जातात हे दुर्दैव.. जिजाऊंच्या काळानंतर अशा अनेक तडफदार स्रिया होवून गेल्या.
संदर्भ:खानदेश गॅझेटीयर 1880
No comments:
Post a Comment