विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595) उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती भाग १

 

शिवकालीन इ.स. 1673 (शके 1595)
उंबराणीच्या लढाईबद्दल माहिती
पोस्तसांभार ::एकनाथ वाघ

भाग १
उंबराणीच्या लढाई :-
प्रथम उंबराणीच्या लढाई बद्दल सविस्तर माहिती घेण्याअगोदर या लढाईची कालावधी आणि ऐतिहासिक माहितीची जेधे शकावली आणि सभासद बखरी नुसार झालेली नोंद बघूया ;
शके १५९५ प्रमादी संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदेला राजश्री राहीईरीहून पनाल्यास गेले तेच मासी बहलोल खान यांसी व प्रतापराव व आनंद राव यासी लढाई जाहाली विज्या पुरा जवळ फत्ते जाली येक हती पाडाव जाला. (जेधे शकावली)
प्रतापराव यास हुकूम करुन आणविले आणि हुकुम केला की, ” विजापुरचा बेलोलखान येवढा वळवळ बहूत करीत आहे. त्यास मारुन फते करणे.” म्हणोन आज्ञा करून लष्कर नवाबावरी रवाना केले. त्यांनी जाऊन उंबराणीस नवाबास गांठिले. चौतर्फा राजियाचे फौजेने कोंडून उभा केला. युद्धही थोर जाहले. (सभासद बखर)
उमराणी (सध्या ता. जत जि. सांगली) लढाई बद्दल सविस्तर माहिती अशी आहे की, विजापुरी सरदार अब्दुल करीम बहलोलखान हा बारा हजार स्वार घेऊन स्वराज्यावर चाल करुन आला. ही वार्ता महाराज्यांस समजताच महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांस बेलोलखानावर रवाना केले. बेलोलखानाचे सैन्य व प्रतापराव यांच्या सैन्याची भेट उंबराणीस झाली. मराठ्यांनी बेलोलखानाच्या सैन्याची केलेली वाताहात कथन करताना, कवी परमानंद आपल्या पर्णालपर्वतग्रहणाख्यान ह्या काव्यात सांगतात,
उम्राणी गावाजवळ येताच त्याला (बेलोलखानास ) पत्र आले की, सर्जाखानासोबत मुजाफर मलीक हा सैन्यासह रांंगणे किल्ल्याच्या आसपास आहे. त्याला आपल्या बाजूला वश करुन घ्यावे. तसेच सिद्धी मसूद, कर्नेलचा अब्दुलअजीज, नळदुर्गाच्या अलिकडील खिदिरखान (याला पणि म्हणतात) हे तिन सेनापती आहेत. इतर सैन्य मदतीला मिळविण्यासाठी ह्या तीन सेनापतींनी दिलेरखानास भेटून सैन्य मागावे. अशाप्रकारे सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी याला युक्तीने जिंकावे.
वरील सर्व योजना छत्रपती शिवाजी महाराज्यांस समजताच, शिवरायांनी आपल्या प्रतापराव, आनंदराव या सेनापतिंना बोलावून त्यांना सर्व डाव समजाविला. जो पर्यंत बहलोलखान स्वतःच्या थोड्याफार सैन्यासह जवळच आहे तोपर्यंत त्याला एकट्याला गाठावे व जोरदार हल्ला करावा. महाराजांची आज्ञा घेऊन सेनापती निघाले. या वेळी प्रतापरावांसोबत आनंदराव, सिद्धी हिलालखान,विठोजी शिंदे, कृष्णाजी भास्कर, विठ्ठल पिलाजी उर्फ पिलदेव, विसो बल्लाळ हे साथीदार होते.
(सिद्धी हिलाल हा मुस्लिम अधिकारी असून तो कधी महाराजांकडे तर कधी अदिलशाहीत येऊन जाऊन होता. मालोजी राजे यांचा भाऊ विठोजी राजे भोसले, यांचा द्वितीय पुत्र खेळोजी राजे भोसले यांचा सिद्धी हिलाल हा क्रितपुत्र होता. क्रितपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम पण स्वतःच्या मुलासारखा वाढविलेला. )
इतिहासाकारांनी या लढाईचा अगदी डोळ्यासमोर उभा राहील, असा प्रसंग रेखाटला आहे.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...