विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

"सरसेनापती संताजीराव घोरपडे -कालपट"

 


"सरसेनापती संताजीराव घोरपडे -कालपट"
१३३४ :- घोरपडे-भोसले यांचे पुर्वज सुजनसिंह
दक्षिणेत.
१३९८ :- घोरपड्यास मुधोळचे जहागिरी प्राप्त.
१४७१ :- भीमसिंहास "राजा घोरपडे बहाद्दर" हा
किताब.
१५६५ :-तालीकोटची लढाई. विजयनगर
सम्राज्याचा अस्त. कर्णसिंह व भीमसिंह
यांचा पराक्रम.
१५७८ :- संताजीरावांचा पणजोबा वल्लभजी
महाराष्ट्रात स्थायिक.
१६४५ :- संताजीराव घोरपडेंची जन्म.
१६७४ :- संताजीराव घोरपडे यांस शिवरायांच्या
लष्करात जुमलेदाराचा हुद्दा.
१६७७ :- हंबाररावांबरोबर कोप्पल प्रांतावरील
स्वारीत संताजीचा पराक्रम.
१६७९ :- संताजी शिवाजी महाराजांच्या
जालन्याच्या स्वारीत.
१६८१ :- संताजीची कर्नाटकात मोहिम. पठाण
बेरडांचा पराभव. अनेक ठाणी सर.
संभाजी महाराजांची प्रशस्ती.
फेब्रु. १६८९ :- संगमेश्वरावर संभाजी महाराजांस
कैद,
संताजीचे पिता म्हाळोजी घोरपडे
स्वामीकार्यावर ठार.
९ फेब्रु. १६८९ :- राजाराम महाराजांचे रायगडावर
मंचकारोहन.
११ मार्च १६८९ :- मोगली छावणीत शंभुछत्रपतींची
हत्या.
५ एप्रिल १६८९ :- राजाराम महाराज रायगडाबाहेर
पडतात.
सप्टेंबर १६८९ :- संताजीचा बादशाही छावणीवर
हल्ला.छावणीचे सोन्याचे कळस
कापले. परत येताना रायगडास वेढा
घालून बसलेल्या
जुल्फिकारखानावर हल्ला.
२६ सप्टें. १६८९ :- राजाराम महाराजांचे पन्हाळ्याहुन
जिंजीकडे प्रयाण.
ऑक्टो-नोव्हें.१६८९ : बिदनुरच्या राणीवर जाणाऱ्या
जाननिसारखान, मतलबखान व
सर्जाखान यांचा संताजीकडून
पराभव.
ऑक्टो-नोव्हें.१६८९ : संभाजी महाराजांना कैद करणारा
शेख निजाम संताजीकडून जखमी व
पराभूत.
नोव्हें. १६८९ : राजाराम महाराज जिंजीस
पोहोचतात.
३ नोव्हें.१६८९ : रायगड ,येसूबाई व शाहूराजे
यांच्यासह मोगलांच्या ताब्यात.
२०/२५ एप्रि.१६९० : सातारच्या पायथ्याशी सर्जाखान
संताजीकडून पराभूत व कैद.
जून १६९० : म्हसवडजवळ संताजी-धनाजीचा
लुत्फुल्लाखानावर हल्ला.
६ जुलै १६९० : संताजीचा लुत्फुल्लाखानाच्या
खटावमधील छावणीवर रात्रीचा
छापा. मोगलांची दाणादाण.
ऑगस्ट १६९० : जूल्फिकारखान जिंजीच्या
पायथ्याशी पोहोचला ,वेढा चालू. २३ नोव्हे. १६९० : नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे व
नागोजी माने मोगलांकडून निघून
स्वराज्यात दाखल.
१६९१ : या साली मे पूर्वी केव्हतरी संताजी
सेनापतिपदाची प्राप्ती.
जून १६९१ : संताजीचा जाननिसारखान व
तहव्वनुरखान यांच्यावर विजय.
१६ डिसें.१६९१ : असदखान व कामबकक्ष जिंजीच्या
पायथ्याशी पोहोचतात.
ऑगस्ट १६९२ : मराठे पन्हाळा मोगलांकडून घेतात.
सप्टें-ऑक्टो.१६९२ : संताजी-धनजीचा बेळगाव-धारवाड
प्रदेशांत धुमाकूळ.
१३ डिसें.१६९२ : इस्माईलखान मखा धनाजीकडून
कैद.
गनिमी काव्याची अप्रतिम लढाई.
१४ डिसें.१६९२ : अलिमर्दाखान संताजीकडून कैद.
१६ डिसें. १६९२ : जिंजीपुढे मोगलांची दाणादाण
कामबकक्ष असदखानाकडून कैद,
वेढा उठतो.
५ जाने.१६९३ : संताजीचा जूल्फिकारखानावर देसूर
येथे हल्ला.
जाने. १६९३ : जूल्फिकारखानाची राजाराम
महाराजांकडे तहाची याचना.
सुरक्षित माघार घेऊ देण्याची
परवानगी,संताजीचा रुसवा.
२२ जाने.१६९३ : मोगलांची जिंजीपुढ़ून वांदिवॉशकडे
माघार.
७ फेब्रु. १६९३ : संताजीचा कासिमखानावर हल्ला,
खान पराभूत,कांचीपुरममध्ये आश्रय.
जुल्फिकारखान साहाय्यास धावून
येतो.
मार्च १६९३ : संताजी त्रिचनापल्लीस वेढा
घालतो.
मार्च १६९३ : बहिर्जी घोरपडे व यचप्पा नाईक
यांची बंडखोरी.
२३ एप्रिल, १६९३ : त्रिचनापल्लीचा नायक शरण.
एप्रिल १६९३ : राजाराम महाराज तंजावरच्या
भेटीस.
मे १६९३ : संताजीचा राजाराम महाराजांशी
बिघाड,संताजी सेनापतिपदावरून
दूर, धनाजीची नेमणूक.
मे - जून १६९३ : बंडखोर बहिर्जी व याचप्पा यांचा
राजाराम महाराजांशी वलोरजवळ
झगडा.
जुलै-ऑगस्ट १६९३ : संताजी २० हजार घोडदळानिशी
महाराष्ट्रात येतो.
ऑक्टो. १६९३ : जुल्फिकारखान वेढा घालण्याच्या
इराद्याने जिंजीपुढे पुन्हा दाखल
ऑक्टो.१६९३ : संताजीची नजिबखान बहादुर
याच्याशी लढाई.
ऑक्टो-नोव्हे.१६९३ : हिंमतखानाशी संताजीच्या
धवपळीच्या लढाई,विक्रमहळळी
जवळ हिंमतखान, हमीदु दुधीनखं व
ख़्वाजाखान यांच्याशी लढाई.
हिंमतखान संताजीच्या पाठलगावर.
नोव्हे. १६९३ : संताजी उत्तर कर्नाटकत. चौथाईची
वसुली.
नोव्हे.-डिसें.१६९३ : संताजी जिंजीच्या अर्ध्या वाटेवरुन
परत.
जाने.-फेब्रु.१६९४ : संताजीची गोवळ्कोंडा प्रदेशात
मोहीम.
फेब्रु. १६९४ : जुल्फिकारखान जिंजीचा वेढा
उठवून तंजावरच्या स्वारीवर.
फेब्रु. १६९४ : संताजी मोहिमेवरून महादेव
डोंगराकडे परत.
फेब्रु.-मार्च १६९४ : संताजी-धनाजीची दिलजमाई.
मार्च १६९४ : जुल्फिकारखान तंजावरवर हल्ला.
मार्च १६९४ : राजाराम महाराजांकडून बहिर्जीनचे
समाधान. महाराज बहिर्जीस
तंजावरच्या मदतीस पाठवितात.
मे १६९४ : तंजावरचे शहाजीराजे मोगलास
शरण.
मे १६९४ : संताजी उत्तर कर्नाटकात
मोहिमेवर.
जून १६९४ : संताजी भूपलगडाकडे परत.
जाने. १६९६ : धनाजी आपल्या फौजेसह
प्रदेशात.
२० जाने.१६९६ : बसवा पट्टणजवळ संताजीची
हिंमतखानाशी लढाई. खान ठार.
२५ फेब्रु.१६९६ : संताजी हमीदुद्दीनखानाशी
लढाई.संताजी माघार.
मार्च १६९६ : धनाजी जिंजी किल्ल्यात दाखल.
मार्च १६९६ : संताजीच्या हमीदुद्दीनखानाशी
धवपळीच्या लढाया.हमीदुद्दीनखानाचा
बादशहाकडून सत्कार. संताजी
जिंजीकडे रवाना.
१ एप्रिल १६९६ : संताजी आपल्या फौजेसह
जिंजीच्या प्रदेशात.
एप्रिल १६९६ : संताजी जुल्फिकारखानाशी अरणी
येथे लढाई.
८ मे, १६९६ : संताजी आपल्या फौजेनिशी
जिंजीत दाखल.
मे-जून १६९६ : संताजी राजाराम महाराजांशी
बिघाड. संताजी आपल्या फौजेसह
जिंजी बाहेर. संताजी
सेनपतिपदावरून दूर
जून १६९६ : संताजी राजाराम महाराज, धनाजी
यांच्याशी लढाई. अमृतराव निंबाळकर
ठार.
जुलै-ऑगस्ट१६९६ : संताजी जुल्फिकारखानाशी संघर्ष.
सप्टें. १६९६ : संताजी अर्काटला वेढा.
सप्टे.-ऑक्टो.१६९६ : संताजी- जुल्फिकारखान संघर्ष
चालूच. संताजीच्या हाताखालची
फौज आपल्याकडे आणण्यात
राजाराम महाराज यशस्वी.
जुल्फिकारखान संताजीच्या
पाठलागावर.
नोव्हे.१६९६ : संताजी महाराष्ट्राच्या मार्गावर. धनाजी
व हणमंतराव निंबाळकर संताजीच्या
मार्गावर.
नोव्हे.- डिसें. १६९६ : धनाजीचा संताजीवर हल्ला.
व संताजी पराभूत असहाय होऊन
महाराष्ट्राकडे पलायन.
डिसें. १६९६ : धनाजी संताजीच्या पाठलागावर.
दुसऱ्या बाजूने जाने. १६९७ गजिउद्दीन
फिरोजजंगही पाठलगावर.
मार्च-एप्रिल १६९७ : संताजी सतार्याच्या प्रदेशात.
धनाजीशी शेवटच्या चकमकी.
एप्रिल १६९७ : दहिगावच्या लढाईत संताजीचा
पुरता मोड.
एप्रिल-मे १६९७ : संताजीस विपन्नावस्था.
शंभुमहादेवाच्या डोंगरत आश्रय.
जुलै (पहिला आठवडा) :संताजीचा नागोजी मन्याकडून
खून.मराठेशाहिची शोकांतिका.
🚩🔥॥ हर हर महादेव, जय श्रीराम ॥🔥🚩
🚩🔥॥ जयभवानी, जय शिवाजी....॥ 🔥🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...