विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

खान्देश

 खान्देश मध्ये सर्वात प्रथम अभीर यांचे मोठे राज्य होते त्याच वेळीस भिल्ल यांची लहान राज्ये देखील होती. चालुक्य, राष्ट्रकुट काळात खान्देश वर अभीर यांचेच राज्य होते. पुढं यादव काळात खान्देश यादवयांचे मुख्य भाग झाला. सेऊणदेश, बागलान ही खान्देशचेच भाग होते. बागलण राज्य मोठे होते. साल्हेर ही राजधानी होती पश्चिम खान्देश पूर्ण बागलाणच्या ताब्यात होता. बागलाण वर अभीर, यादव आणि राठोड यांच्या सत्ता झाल्या. शंकरदेवच्या काळापर्यंत खान्देश यादव यांचे मांडलिक होते. देवगिरीच्या अस्तानंतर बागलाण स्वतंत्र झाले.खान्देश मध्ये राजभिल्ल आणि राजपूत यांचे राज्य होते. जेव्हा राणा प्रताप हे भूमिगत झाले तेव्हा ते खान्देश मध्ये आले होते. तेथे भिल्ल राजांची राज्ये होती. तेव्हाच अनेक राजपूत पण येथेच स्थायिक झाले. बडवाणी चे राज्य राजपूत वंशिय होते. मुस्लिम आक्रमन नंतर अनेक राजपूत राजे हे दक्षिण गुजरात आणि खान्देश मध्ये स्थायिक झाले. डांग ची संस्थाने ही राजभिल्ल यांची होती. एकूण 15 संस्थाने डांग मध्ये होती. बडवाणीचे राज्य भिल्ल राजांचे होते.अकरणीचे राज्य हे राजपूत-भिल्ल वंशिय यांचे होते. पूर्व खान्देश मध्ये यादव आणि अहिरांचे अनेक राज्ये होती. तुघलक नंतर फारुखी घराण्याने या सर्व राज्याचा पराभव करून स्वतःचे राज्य तयार केले यालाच खान्देशचे फारुखी राज्य म्हणतात. पण त्यांनी इतर लहान राज्ये नष्ट न करता. त्यांच्याकडून खंडणी वसूल करत असे. पुढं मोघलांनी सर्वात प्रथम खान्देश राजयवर आक्रमन केले. अकबरने हे राज्य जिंकले. पुढे नाना पेशवे पर्यंत हा भाग मोघलांकडे होता. त्यानंतर खान्देश वर होळकर, शिंदे, नागपूरकर भोसले आणि निजामाचे काही भागावर वर्चस्व होते. ब्रिटिशांनी दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धात खान्देश जिंकले पण तहात त्यातील अनेक भाग त्यांना सोडावा लागला. यानंतर इंग्रजी सत्तेत खान्देश पूर्णपणे वर्चस्वाखाली आणले.1800 ते 1857 पर्यंत भिल्लांनी खान्देश मध्ये अनेक बंड केले. यासाठी कॅप्टन ब्रिग्ज पहिला खान्देशचा कलेक्टर म्हूणन नियुक्ती केली. यानंतर अनेक ब्रिटिश अधिकारी येथे नेमण्यात आणले. पुढं खान्देश कधी बॉम्बे प्रेसिडेंन्सी कधी वऱ्हाड प्रांत तर कधी मध्य प्रांतात खान्देशचे विलीनीकरण होतं असे. त्यानंतर 1947 ला खान्देश संयुक्त महाराष्ट्रचा भाग झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...