पोस्तसांभार : शिवकन्या आर्या पाटिल
मौजे निगडे बु. येथील "डिवळ" यांचा अपभ्रंश होऊन खुटवळ >>> खुटवड असा झाला आहे. खुटवड हे पाटील घराणे आज देखील निगडे बु. या गावात पहायला मिळतात. पाटील घराणे वेगळे असुन बाहेरून आलेले खुटवड (पाटील नसलेले) देखील या गावात पहायला मिळतात व त्यांनी खुटवड पाटील यांच्या आश्रयाने राहिले व त्यावरुन आश्रयदात्यचे खुटवड नाव घेतले असे संदर्भ व परंपरा आहेत यावरुन हे स्पष्ट होते. खुटवड पाटील घराणे चे मूळ गाव उंबरे असुन राजगडवर जिजाऊ आईसाहेबांच्या अतिशय जवळच्या लोकांमधे खुटवड घराण्याचे नाव घेतले जायचे. शिवरायांच्या मोहिममधे टक्के व खुटवड पाटील यांचे आपल्या बांदल साथीदाराने बरोबर नेहमीच लढलेले पहायला मिळालेले आहेत. प्रतापगड च्या मोहिमेची कमाल याच गुंजण मावळ मधल्या मावळ्यांनी यशश्वी केली. गुंजन मावळ मधील देशमुख वादाचा बिमोड करण्यासाठी व एक शांत पुरक वातावरण निर्मिती साठी खुटवड पाटील घराणे ने खुप काम केले असल्याचे दाखले आहेत. न्यायप्रिय,शब्दस किंमत देने आणि समंजस भूमिका यामुळे त्यांची प्रशंसा खुद शिवरायांनी केली आहे. बांदल व मौजे बोरवले चे मारेकरी समाज हे खुटवड पाटील सोबत कायम सुख दुखात एकत्र राहिलेला असुन बांदल व खुटवड पाटील नाते संबंध असण्याची शक्यता आहे. श्री हनुमान मंदिर,मौजे निगडे बु. हे खुटवड पाटील यांच्या पुढाकाराने व बांदल यांच्या बरोबरीने आकारस आले असुन त्यास शिवकाळीन महत्व आहे.
No comments:
Post a Comment