पुणे जिल्ह्यातील पिंपळे जगताप या गावात बडोदेकर (बडोदा संस्थान गुजरात ) गायकवाड सरकारांचे सोयरे सरदार जगताप यांचा भव्य चिरेबंदी वाडा आहे. या भव्य वाडाबांधकामासाठीचा सर्व खर्च बडोदा संस्थान तर्फे करण्यात आला . या मध्ये त्याकाळी ६० हजार खर्चून हा भव्य चिरेबंदी वाडा बांधण्यात आला व ४० हजार मध्ये वाड्या शेजारील मंदिर बांधण्यात आले . वाड्याचा महादरवाजा पूर्वेकडे आहे हा दरवाजा १० फूट उंच व ५ फूट रुंद असून याची दारे अजूनही सुस्थित आहेत . दरवाज्याला लागून दोन्ही बाजूस २० फूट उंचीचे बुरुज अजूनही खंबीरपणे उभे आहेत .पूर्वी च्या काळी वाड्या मध्ये न्याय निवाड्यासाठी सदर भरत असे . पिंपळे जगताप व इथून शेजारीच असलेलं धामरी हे गाव जगतापांना जहागिरीवर मिळालं .आताच्या पूर्वजांनी या वाड्याची योग्य काळजी घेऊन हा ऐतिहासिक ठेवा जोपासला आहे .
माहिती : महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य .
- संकेत जगताप
No comments:
Post a Comment