विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 6 September 2021

सरसेनापती प्रतापराव गुजर….. यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक भाग २

 


सरसेनापती प्रतापराव गुजर…..
यांच्या आखणीतील एक सर्जिकल स्ट्राइक
भाग २
रात्रीच्या वेळी हत्तींना पाणी पिण्यासाठी माहूत व इतर सैन्य जलाशया जवळ जावयास निघाले तेव्हा त्यांना कळून चुकले की आपण पुर्णपणे अडकले गेलो आहोत. याच वेळी घुळीचा लोट आसमंतात उधळीत प्रतापराव आपल्या हजार घोडेस्वारांनीशी शत्रूवर तुटून पडले. ह्या अकस्मात झालेल्या हल्याने बहलोल खानाचा सैन्य धांदळून गेले. मात्र काहीच वेळात बेहलोल खान व त्याचे सैन्य देखील युद्धास सज्ज झाले. तुंबळ युद्ध सुरु झाले. चार घटका युद्धाचा खणखणाट चालू राहिला.
मराठ्यांचा आवेश पाहून शत्रू सैन्य आता माघार घेऊ लागले. पराक्रमाची नशा चढलेल्या आनंदरावांनी काही विरांच्या मदतिने शत्रू वर परत हाल्ला चढविला. मात्र यात आनंदराव जखमी झाले परंतु मागे हाटले नाहीत. तब्बल तिन घटीकापर्यंत(अंदाजे एक ते दिड तास) आनंदरावांनी शत्रू सैन्याची धुळधाण उडाविली.
ह्याच वेळी एक भला मोठा, उन्मत्त हत्ती पिसळला. त्या हत्तीने घट्ट बांधलेली साखळी स्वतः तोडून ती सोंडेत पकडली व रणांगणावर बेफान पणे सैरावैरा धावत सुटला. आपल्याच सैन्यात हत्तीने दाणादाण उडवून दिली. कित्येक जण जखमी तर काही मारले देखिल गेले. काही काळानंतर माहूतांनी बहूत प्रयत्नांनी हात्तीला वश केले. मात्र याच संधीचा फायदा घेत सिद्धी हिलाल याने आपले पाच पुत्र व सैन्याच्या मदतीने शत्रू वर पुन्हा हाल्ला चढविला. रुपाजी भोसले, सोमाजी मोहिते व सिदोजी निंबाळकर हे देखील शत्रू वर तुटून पडले. विठोजी शिंदे व विठ्ठल पिलदेव हे एका बाजूने मोठ्या सैन्यासोबत शत्रू सैन्यावर धावून गेले.
महादजी ठाकूर हा देखील सोमाजी मोहित्यांच्या सोबतीला लढत होता. विजापुरी सैन्याच्या वतीने भाईरखान नावाचा सेनापती आपल्या लढवय्या पठाण फौजेला घेऊन पुढे सरसावला. पठाणांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध माजले. तिरंदाजांच्या कमानी स्थिरावल्या, समशेरी भिरभीरु लागल्या कित्येकांचे हात तुटले, कित्येकांचे पाय गेले, रक्ताचे पाठ वाहू लागले. कित्येंकांची शिरकमल भु-क्षेत्रावर रक्ताभिशेख घालत कोसळली. कित्येकांची रक्ताने आंघोळ झाली होती. युद्ध मग्न झालेल्या त्या दोन्हीही सैन्यांचे सुर्यास्ता पर्यंत युद्ध सुरू होते.
दिपाजी राऊत व कृष्णाजी भास्कर हे दोन्हीही रणधुरंदर हातात नंग्या समशेरी घेऊन घोड्यावर स्वार होत शत्रू सैन्याचा पाठलाग करु लागले. सापडेल त्याला आपल्या समशेरीचे पाणी पाजत यमसदनी पाठवत होते. मात्र क्षत्रिय धर्म सांडला न्हवता. कोणाच्याही पाठीवर वार झाला नाही. त्यांच्या या अतुलनिय पराक्रमाने रणांगण पटून उठले होते. मात्र याच बहलोलखानाचा सरदार सिद्धी महमद बर्क याने तिर-कमान रचली. सुटलेला तिर राऊतांच्या घोड्याचा वेध घेणारा निघाला. राऊतांचा घोडा रणांगणावर कामी आला. राऊतांनी रणभूमीचे भान राखत दुसऱ्या घोड्यावर ते अरुढ झाले. शत्रू सैन्याने या घोड्याच्या देखील कुशीत, पाठीवर व तोंडावर तलवारीने तीन वार केले. मात्र आता राऊतांचा क्रोध अनावर झाला. राऊतांची समशेर बर्कीचे रक्त प्राशन करण्यास तहानली होती. राऊतांनी घोडा बर्कीच्या जवळ घेतला व तलवारीने केलेल्या एका प्रहारातच बर्की संपविला.
कित्येक रणांगणावर समशेर गाजविणारा बाहलोल खानाचा आधारस्थंभ बर्की, रणांगणावर कोसळल्याची वार्ता रणभूमीवर वाऱ्यासारखी पसरली. शत्रू सैन्य धिर सोडून पळू लागले. बर्कीच्या मृत्युची वार्ता ऐकून बहलोल खान जाणून चुकला की, त्याचा काळ जवळ आला आहे. मृत्यूच्या भितीने बहलोल खान प्रतापरावांना शरण आला. प्रतापरावांनी त्याला माफी दिली. कृष्णाजी भास्कर यांनी शत्रूच्या सैन्याची लूट केली. कित्येक हत्ती, घोडे पाडाव झाले.
शरण आलेला बहलोलखान प्रतापरावांनी दाखविलेल्या मार्गाने मराठ्यांसमोर पराजीत होऊन मागे निघून गेला. (पर्णालपर्वतग्रहणाख्यान, अध्याय -५, ३८-१०५ सारांश)
प्रतापरावांच्या सैन्याने विजापुरी सैन्याची कोंडी केली. विजापुरी सैन्याची रसद तोडण्यात आली. तसेच अवश्यक असणाऱ्या पाण्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आले. अशा हलाखीच्या परिस्थितीत मराठ्यांनी शत्रू वर हल्ला चढवीला. बेलोलखान जेरीस आला. बेलोलखानाने प्रतापराव व मराठा सैन्यासमोर शरणागती पत्करली. प्रतापरावांनी त्यास माफी दिली. प्रतापराव माघारी फिरले. येताना वाटेत मोघलाईत असलेले भागानगर, देवगड, रामगीरी ह्या प्रदेशांची लूट करुन प्रतापराव स्वराज्यात परतले.
….. (क्रमशः)
आपलाच,
अनिकेत अशोक पाटील,
मुरुड-जंजिरा, रायगड
९२२६३६०७३३

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...