जागर-मराठेशाहीचा - जागर -
फलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे होय.
त्यांची सोयरीक कायमच भोसले घराण्याशी होत राहिल्याने ,राजकीय व सामाजिकदृष्ट्या हे घराणे फार महत्वाचे मानले गेले.
वनंगपाळ बारा वजीराचा काळ अशी या घराण्याची ख्याती.या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांना चार अपत्ये.
थोरले साबाजी दोन नंबर जगदेवराव तीन नंबर सईबाई आणि चार नंबर बजाजी.
मुधोजी राजांचे सर्वात ज्येष्ठ पुत्र साबाजी राजे नाईक निंबाळकर यांच्या कन्या दिपाबाई होत.दिपाबाई या महाराणी सईबाई राणीसाहेब यांच्या भाची.महाराष्ट्रात जेव्हा परकीय सत्तांसाठी आप्तस्वकीयांच्या सर्रास कत्तली केल्या जात हा तो काळ. स्वतःच्या मर्दुमकीच्या जोरावर अनेक मोठमोठ्या कुटुंबांनी आपली छाप महाराष्ट्रावर पर्यायानं इतिहासावर पाडली अश्यांपैकी एक असणाऱ्या निंबाळकर घरण्यातील "साबाजी राजे नाईक निंबाळकर" यांच्या घराण्याची लेकं "दीपाबाई" बांदल घराण्याची लक्ष्मी म्हणून हिरडस मावळातील नाईक बांदल देशमुख यांच्या घराण्यात आल्या.
दिपाबाई यांच्या पोटी जन्माला आलेला रणमर्द योद्धा म्हणजे " बाजी बांदल " हे होत.
मराठ्यांच्या आपापसातील युद्ध असोत वा शत्रू शाह्यांशी केलेली निकराची पंजेफाड़, संपूर्ण ताकदिनीशी पाठिंबा देणे हेचं दीपाई बांदल यांनी आपले आद्य कर्त्यव्य समजले., कान्होजी जेधे आणि कृष्णाजी बांदल यांच्यातील लढाई दरम्यान लढण्यासाठी कृष्णाजींस दीपाई साहेबांनी शंभु प्रसाद नावाचा घोडा दिला होता, अशी इतिहासात नोंद आहे.
स्वराज्याच्या लुटुपुटुचा खेळ छत्रपती शिवरायांनी जेव्हा नुकताचं मांडला, तेव्हा नुकताचं मांडलेला डाव मोडून काढण्यासाठी विजापुरी दरबारने पाठवलेला कसलेला सरदार फत्तेहखान आणि त्याची कैक हजाराची फ़ौज स्वराज्यावर चालून आली यावेळी खळद बेलसर येथे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम झाला., हे घडलेलं युद्ध सगळ्या जाणकारांना ठाऊक असेलचं., पण याचं युद्धात स्वराज्याला मदत म्हणून स्वता:च्या दिमतीस असलेलं सैन्य या लढ्यात शिवरायांच्या बाजूने लढण्यासाठी म्हणून दीपाबाई बांदल यांनी पाठवले हे ठाऊक असलेली लोकं नगण्यचं.
१६५९ साली स्वराज्यावर आलेली अफझलरूपी टोळधाड़ कायमची गर्दीस मिळविण्यासाठी झालेल्या प्रतापगडाच्या महाप्रतापी पर्वात "दिपाबाई बांदल " यांचा सक्रीय सहभाग असल्याची नोंद इतिहासात आहे.,
महाराजांना पुरंदरच्या तहाप्रमाणे आग्र्याला जावे लागले. त्यावेळी महाराजांनी दिपाऊसाहेबांना राजगडावर जिजाऊसाहेबांनबरोबर राज्यकारभार पाहण्यासाठी बोलावून घेतले. त्यावेळी दिपाबाईसाहेब जिजाऊ साहेबांच्या बरोबर सावली सारख्या राहिल्या.१७ जून १६७४ रोजी जिजाऊंचे निधन होईपर्यंत दीपाबाईसाहेब जिजाऊसाहेबांच्या बरोबरच होत्या.
राजं पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले, तेव्हा अतिशय मुरब्बी राजकारणी पत्रांची, शब्दांची देवाणं घेवाणं करून, शत्रुला गाफिल ठेवत, मराठ्यांचा मुकुट शत्रुच्या तावडीतून निसटला खरा पण शत्रूला या गोष्टीचा सुगावा लागताचं त्यांचा पाठलाग सुरु झाला, पण लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजेल एवढ्या जबरदस्त महत्वकांक्षी स्वराज्यनिष्ठा आपल्या मनाशी होती, म्हणूनचं गजापूरच्या खिंडीत स्वतःच्या देहाची चाळण करण्यासाठी बाजी बांदल हे खडे ठाकले आणि त्यांनी राजांना विशाळगडी जाण्यसाठीची विनंती केली., हे बाजी बांदल म्हणजे या वीर मातेचा वीर सुपूत होयं.
राजे दुष्मनाच्या गर्दीतून निसटले खरे पण त्यासाठी या बांदल घराण्याने हसत हसत सूतक आपल्या घरावर घेतले., सूतक चढलेल्या घराला सांत्वन करण्याच्या आपल्या पूर्वपार चालत आलेल्या पद्धती प्रमाणे, जिजाऊनी स्वतः जातिनिशी जाउन दिपाऊंचे सांत्वन केल्याच्या उल्लेखाची नोंद आपण कुणी घेतली नसेल पण ती ऐतिहासिक दस्तऐवजात आहे. "पोटचं पोरं गेल्याचं समिंदराएवढं दुःख त्या माईनी कसं सोसले हे तिचं तिलाचं ठावं"
याचं युद्धानंतर भरविण्यात आलेल्या जखमदरबारात शाहीर अज्ञानदासानं गायिलेल्या पोवाड्यात जेधे आणी बांदल घराण हे शिवरायांना, प्रभू श्रीरामचंद्राला लभलेल्या अंगत-हनुमंताप्रमाणे नोंदवले गेले आहे., आणी याचं गजापुरच्या खिंडीतील पराक्रमापाई बांदल घरण्याला तलवारीच्या पहिल्या पातीचा मान मिळाला.
जशा दीपाबाई उत्तम माता, होत्या तश्या त्या उत्तम प्रशासकदेखील होत्या .आत्ताच्या काळात चालणारे जमिनीचे तंटे हे त्या काळात देखील चालायचेचं तेव्हा शिवरायांना यात लक्ष घालून त्यासंदर्भात योग्य तो न्यायनिवाडा करावा लागायचा., अश्याच एकदा डोहर देशमुख यांच्या जमीनीविषयक तंट्यावर निवाडा करण्याची वेळ शिवरायांवर आली तेव्हा त्या निवाडा सभेत म्हणजे तत्कालीन कोर्टात न्यायाधीश म्हणून "दीपाबाई बांदल "या कार्यरत होत्या.
मिर्झाराजा जयसिंग जेव्हा स्वराज्यावर चालून आले, तेव्हा नाइलाजास्तव त्याच्यासोबत तह करणे छत्रपती शिवाजी राजांना भाग पडले., आणि याचं तहाच्या कलमानुसार राजे आणि बाळ शंभू राजांना आग्र्यास बादशहाच्या भेटिस जावे लागले, मोघल दरबारी असणाऱ्या रिवाजाप्रमाणे यांच्यासोबत दगा होऊन पिता पुत्रास कैददेखील घडली, तेव्हा राजगड़ी जाउन" दीपाई बांदल" यांनी जिजाऊस धीर दिल्याचे उल्लेख देखील आपणास मिळतात .
दस्तूरखुद्द "छत्रपती शिवरायांची प्रथम पत्नी, युवराज संभाजी महाराजांच्या मातोश्री "सईबाईसाहेब "राणीसरकार या दिपाऊ बांदल यांच्या आत्त्या होतं".
कर्तुत्व, त्याग, पराक्रम परंतु पूर्णपणे अपरिचीत असणाऱ्या दिपाबाई साहेब बांदल यांना पाचव्या माळेचा मान जातो.
लेखन
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
No comments:
Post a Comment