भाग १४
यापुढे उदाजीरावांवर छत्रपतींची नाराजी झाली, नाराजीचे कारण नीटसे कळत नाही. ब्र.च.ले 278 यात " राजश्री कडील (छत्रपतींकडील) बाबुराऊ यासी न पटे जाहले." असे कारण दिले आहे. उदाजीरावांवर ही जी छत्रपतींची नाराजी झाली त्याबद्दल उदाजीरावांना फार हळहळ वाटत होती. उदाजीराव या संबंधाने ब्रह्मेंद्रस्वामीस मोठ्या काकुळतीने लिहितात,( ब्र.च. ले. 306) की "यजमान श्रमाचा जान होऊन कृपा करीत नाहीत" यावरून छत्रपतींच्या गैरमर्जीचे शल्य उदाजीरावांना कसे बोचत होते हे लक्षात येईल. या नाराजीबद्दल स्वामींनीही चिमणाजीआप्पा कडे उदाजीरावांची फार जोराची शिफारस केली.( ब्र.च.ले.278) स्वामींच्या शिफारशीप्रमाणे थोडे दिवसांनी छत्रपतींची उदाजीरावांवर पुन्हा मर्जी बहाल झाली व त्यांच्याकडे पूर्ववत कामे सांगण्यात येऊ लागली .सावीत असे शा.म.रो.ले. 70 ता.1/10/17 36 वरून दिसते. यात उदाजीरावां
कडून गोवळकोटच्या मोर्चासाठी स्वार आणले गेल्याचा उल्लेख असून आणखी त्यांचे पुत्र दारकोजीराव यांच्याबरोबर शंभर स्वार पाठवण्याविषयी छत्रपतींनी उदाजीरावांना आज्ञा केली आहे.
यानंतर उदाजीराव माळव्यात आले होते .1736 चे नोव्हेंबरात बडवानी प्रांतात असतांना त्यांनी मागिल सालाप्रमाणेच तेथील लोकांवर सक्ती केल्यावरून त्यांना पुन्हा छत्रपती शाहू महाराजांनी ताकदीने लिहले होते.(शा.म .रो.ले 203 तारीख 29/ 11 /1736)
शाहू महाराजांची रोजनिशी ले.93 तारीख 22 /11 /1747 वरून इसवीसन 1747 पर्यंत परगणे खरगोन कडील मोकासाबाबेचा अधिकार उदाजीरावांकडे होता असे दिसते.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment