विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १३

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग १३
पुढे ऑक्टोंबर महिन्यात मल्हारराव होळकरांना सामील होऊन उदाजीरावांनी माळव्यात धार नजीक तिरळा येथे माळव्याचा बादशाही सुभेदार दयाबहाद्दर याच्याशी लढाई करून त्या गारद केले. (होळकर कैफियत) या स्वारीत उदाजीरावांचे धाकटे बंधू जगदेवराव हे ही होते.(मावजी कै.पृ.69-79)
इसवी सन 1734 च्या आरंभी उदाजीराव कोकणात हबश्या कडील मोहिमेवर होते. त्यांनी सिद्दी अंबर अफवानी याचा पराभव व शिरच्छेद वाडी पाचाड येथे केला.( ब्र. च.ले 278 रा.ख. तीन प्रस्तावना पृष्ट 34 ) इसवी सन 1734 मध्ये ऑक्टोंबर महिन्यात शाहू महाराजांनी उदाजीरावांना काही सनदा करून दिल्या आहेत. (मलठण दप्तर अप्रकाशित) पुढे या वर्षाच्या अखेरीस " दिल्लीहून फौजा येत आहेत तेव्हा एक महान सानिध्य फतेपुरामाजीच रहाणे, दूर प्रान्ते गुजरात कडे न जाणे." म्हणून शाहू महाराजांनी खास दस्तखताची पत्रे सरदारांना पाठविली , त्यात कृष्णाजी पवार व उदाजी पवार यांनाही ही पत्रे पाठवली होती.(शा.म.रो.ले 65 तारीख 14 /12 /1734 ) यावरून कृष्णाजी व उदाजी पवार हे या सुमारास मध्यप्रांतात होते व
त्यांच्याकडे काही गुजरातकडील कामगिरी सोपवली होती. यानंतर तारीख 19 डिसेंबर 1734 रोजी गायकवाडांशी झगडा न करण्याविषयी शाहू महाराजांनी उदाजीरावांना लिहिले होते. त्यावरून ते लवकरच गुजरातेत गेले असावेत.
इसवीसन 1735 च्या आरंभी उदाजी पवार माळव्यात होते .यावेळी मल्हाराव होळकर व उदाजी पवार यांनी बडवानी प्रांतात अधीक सख्ती केल्यावरून तसे न करण्याबद्दल छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ताकदीची पत्रे लिहिली आहेत. (शा.म.रो.ले 202 तारीख 12/ 8/ 17 35)
यानंतर सप्टेंबरात पुन्हा शाहू महाराजांनी उदाजीराव यांना काही सनदा करून दिल्या आहेत.( मलठण दफ्तर अप्रकाशित )
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...