भाग ८
इसवीसन 1723 च्या अखेरीस मराठे सरदारांनी माळव्यावर स्वारी करून माळव्यातील बादशाही सूर्याचा मोड केला.(पे. शकावली पृ. 48) या स्वारीत "पवारांनी जो अम्मल साधेल तो साधावा" असे ठरले होते.( शकावली 49 ) त्याप्रमाणे पुढील उद्योग उदाजी व त्यांचे बंधू आनंदराव यांनी चालविले.
इसवीसन 1724-25-26 या सालात उदाजीरावांच्या गुजरात व माळवा प्रांतात स्वाऱ्या झाल्या आहेत . या स्वाऱ्यात गुजरातेत लुनावाड्या पर्यंत त्यांनी आपला वचक बसविला व तेथून मराठ्यांचे हक्क वसूल केले.(गुजरातचा इतिहास लोकहितवादी कृ. पृष्ठ 268)
इसवीसन 1725 मध्ये गुजरातचा त्यावेळचा नायब सुभा सुजायतखान याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ रुस्तमअली खान व निजामाचा मामा हमीद खान यांचे युद्ध पेटलाद नजीक आडास येथे जुंपले होते.त्यावेळी उदाजी पवार व दावलजी सोमवंशी हे मराठे सरदार फौंजासह दक्षिणेतून हमिदखानच्या मदतीस आले. या युद्धात शेवटी पेटलाद परगण्यातील वसो येथे रुस्तमअलीचा पराभव होऊन तो मारला गेला.
या पुढील वर्षी उदाजीरावांनी वहीवाटी प्रमाणे आपले हक्क वसुलीचे काम चालविले त्यावेळी माळव्याचा बादशाही सुभेदार राजा गिरीधर बहाद्दर हा होता. त्याच्याशीही मराठी सरदारांच्या पूर्वी याप्रसंगी अनेक चकमकी झाल्या. अखेरीस इसवीसन 1726 मध्ये सारंगपूरच्या लढाईत तो मारला गेला.(म.री.मध्यविभाग पृष्ठ 370) या स्वारीत उदाजीराव व चिमणाजी दामोदर यांनी सारंगपूराहुन पंधरा हजार रुपये खंड वसूल केला. या लढाईत गिरीधर बहाद्दरचे संबंधी राव गुलाबराम व राजा आनंदराम हे ही पडले.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)
No comments:
Post a Comment