विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १०

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग १०
या सुमारास प्रतिनिधींचे कारस्थान जोरात होते, निजामाने ही बरीच गडबड उडवून दिली होती; तेव्हा त्याच्या प्रतिकारार्थ छत्रपती शाहू महाराजांनी सर्व सरदारांना निकडीचे हुकूम पाठविले होते.(म.री.मध्य वि., पृष्ठ 217) अाज्ञे प्रमाणे उदाजीरावानींही आपल्या पथकासह हजर राहून पालखेडची मोहीम फत्ते करण्यात बाजीरावास मदत केली . शेवटी इ.स.1728 च्या फेब्रुवारीत निजाम व छत्रपती यांच्यात मुंगी शेवगावचा तह होऊन प्रकरण तात्पुरते मिटले.
राजा गिरधर बहाद्दरनंतर माळव्याच्या सुभ्याचे काम त्याचा मुलगा राजा भवानीराम यांच्याकडे सोपवले गेले होते. त्याच्याशीही चिमणाजीआप्पा व उदाजी पवार यांच्या उज्जैन व सिरोंज वगैरे ठिकाणी चकमकी झाल्याचे अर्व्हिनच्या पुस्तकावरून कळते .
इसवीसन 1728 मधील उदाजी पवार व मल्हृाररावजी होळकर यांच्या माळव्यावरील स्वारी बद्दल आणखी एक दाखला उपलब्ध झाला आहे.( जमीदार धर्मपुरी यांच्या दप्तरातील एक महजर अप्रकाशित) या स्वारीत उदाजी पवार व मल्हारराव होळकर यांनी मांडवगडावर आपले ठाणे बसविले होते, परंतु त्या वेळचे माळव्यातील बादशाही कामदार महाराजे जयसिंग व उमरखां फौजदार वगैरेंनी अधिक जमावा निशी येऊन पुन्हा मांडवगडावर आपला कब्जा कायम केला; तेव्हा बादशाही अंमलदारांना सतवण्यासाठी या मराठा सरदारांनी कसबे धरमपुरी ,खुजावा वगैरे बादशाही मुलखात हल्ले करून खंड वसूल केला व आपला मोर्चा परत फिरूवून दक्षिणेत निघून गेले.
इ.स. 1728-29-30 या सालात उदाजीरावांच्या नावाने देशमुख देशपांडे यांना जारी झालेली 150 होऊनही अधिक ताकीद पत्रे धार दरबाराच्या दफ्तरात आहेत ; त्यात माळवा, गुजरात ,नेमाड, खानदेश,सोंदवाडा ,काठीयावाड ,मेवाड ,मारवाड, सोरठ,खेचीवाडा,कच्छ व सिंध वगैरे प्रांतातून मागील सालाप्रमाणे मोकास बाबीचा वसूल करण्याचा अधिकार उदाजीरावांना दिला आहे; त्यावरून या सालाच्या पूर्वी व नंतरही या सर्व प्रांतातून मोकास बाब वसूल करण्याचे काम उदाजीरावांकडे सोपविण्यात आले असून ते त्यांनी उत्तम प्रकारे चालवले होते हे उघड आहे.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...