विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १८

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची

भाग १८
माळव्याची वाटणी झाली त्यात धार प्रांत व त्याच्या आसपास चे काही परगणे शिवाय काही जवळच्या रजपुत सरदारांकडील खंड असे आनंदरावांना त्यांच्या हाताखालील लोकांच्या पोषणार्थ देऊन त्यास माळव्यात मुद्दाम कायम करण्यात आले होते ; यात मुख्यता हा हेतु होता की, गुजरातच्या बाजूने माळव्याच्या पश्चिम सरहद्दीवर येणाऱ्या मुसलमानांच्या व तिकडच्या विरोधी मराठी सरदारांच्या स्वार्यांपासून माळव्याचे रक्षण व्हावे.( ग्रॅंट डफ भाग 1 ) माळव्याचे वाटणी शिवाय उत्तरेकडील अजमेर, प्रयाग वगैरे सुभ्यात होणाऱ्या स्वार्यांमध्ये ही ठरावीक हिस्सा आनंदरावांना मिळत होता.( धार दरबार दप्तर अप्रकाशित )
माळव्याची वाटणी होऊन आनंदराव धार प्रांत मिळाल्यावर त्यांनी धार येथे आपले वास्तव्य कायम केले. म्हणूनच त्यांना या संस्थांचे संस्थापक समजण्यात येते. आनंदरावांना स्वतंत्र सरदारकीचा अधिकार मिळाल्यानंतर ते फार दिवस वाचले नाहीत. ते स्वारी वरून परत येत असताना ( विस्तारनामा अप्रकाशित) इसवीसन 1736 च्या जून महिन्यात उज्जैन येथे सर्पदंशाने मरण पावले.(राजवाडे खंड 11 ले.20 व धार दरबार दप्तर अप्रकाशित) माल्कम साहेबांनी आनंदराव यांचा मृत्यू इसवी सन 1749 मध्ये झाला असे लिहिले आहे, पण ते बरोबर नाही. आनंदरावांची सुंदर अष्टपैलू नक्षीदार उज्जैन येथें मंगळेश्र्वरानजीक मंदाकिनी घाटावर आहे. आनंदराव स्वारीवरुन परत आले त्यावेळी त्यांचे धाकटे बंधू जगदेवराव हे त्यांच्या बरोबर होते. आनंदरावांचा मृत्यू अगदी अल्पवयात झाल्यामुळे त्यांच्या स्वतंत्र कर्तबगारीस पुढे वाव मिळाला नाही. व त्यांच्या हातून पुढे मराठीसाम्राज्याची अधिक महत्त्वाची कामगिरी बजावली जाऊन त्यांचा विशेष पराक्रम व मुत्सद्दीपणा निदर्शनास आला नाही.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...