विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग १२

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग १२
पुढे चातुर्मास नंतर उदाजी पवार व मल्हारराव होळकर यांनी माळव्यात येऊन गुदस्तसाली मुसलमानां तर्फे राजे जयसिंह वगैरेंनी येऊन कब्जा केलेला मांडवगड डिसेंबर 1729 मध्ये पुन्हा काबीज केला.( शकावली पृष्ठ 59)
इसवीसन सतराशे 1730 च्या आरंभी चिमणाजी बल्लाळ, उदाजी पवार व मल्हारराव होळकर या सरदारास शाहू महाराजांनी लिहिले की "सवाई जयसिंह उज्जैनला अाले आहेत, त्यांचा स्नेह घरोबा पूर्वीपासून चालत आला आहे, त्यांचे मनधरण व रक्षण स्वामीस अगत्य याकरता उभयपक्षी स्नेहाभिवृद्धी होईल तो अर्थ करणे."
यावरून सवाई जयसिंहाशी मसलत होऊन मांडवगड पुन्हा त्यांच्या स्वाधीन केला गेला असावा.( शा.म. रो.ले 198 तारीख 19 मार्च 1730) यानंतर चिमणाजीआप्पा पावागडच्या स्वारीवर गेले होते, त्यांच्याबरोबर उदाजीराव गेले होते किंवा माळव्यातच राहिले होते हे अद्यापि कळत नाही . या संबंधाचे काही कागदपत्र उपलब्ध झाल्यास आणखी अधिक माहिती मिळेल.
इसवीसन 1731 च्या आरंभी उदाजीराव दाभाड्यांच्या पक्षास मिळाले होते. उदाजीरावांच्या मनात बाजीरावांविषयी तेढ उत्पन्न झाली होती. तथापि मुख्य राज्य सत्तेशी कोणत्याही तर्हेचा विरुद्ध भाव त्यांच्या मनात नव्हता, ते स्वतःस छत्रपतींचे नोकर बनवीत असत. शेवटी 1731 च्या एप्रिलमध्ये उभोई नजीक भिलापूर येथे दाभाड्यांशी बाजीरावाची लढाई होऊन त्या लढाईत उदाजीराव व चिमणाजी दामोदर यांचा पाडाव झाला होता. परंतु पुढे लवकरच( तारीख 28/ 4 /1731) पूर्वी उदाजीराव व बाजीराव यांची भेट होऊन , बाजीरावाने उदाजी पवार व चिमणाजी दामोदर यांना वस्त्रे व हत्ती देऊन गौरविले व पुन्हा आपल्या बाजूला वळवले.( ब्र. च.ले.359 तारीख 28/4/1731)
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...