विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 6 November 2021

#मराठा_साम्राज्यात_पवारांची #विशेषता_धारच्या_पवारांची_कामगिरी भाग ११

 


#मराठा_साम्राज्यात_पवारांची
भाग ११
इस 1728 च्या पावसाळ्यानंतर पुन्हा उदाजी पवार माळव्यात आले; बरोबर मल्हाररावजी होळकर हे होते. या उभयतां सरदारांनी त्यावेळचा बादशाही सुभेदार दयाबहाद्दर याचा पराभव करून पराभवाची खबर पुण्यास तारीख 9 व तारीख 22 ऑक्टोबर 1728 रोजी पोहोचवली होती. (पे.श.ष्ट. 57 ) याच महिन्यात चिमाजीअप्पांनीही माळव्यावर स्वारी काढली.
ते माळव्यात आल्यावर उज्जैन जवळ दयाबहाद्दरशी पुन्हा लढाई झाली. या लढाई त्यांनी त्याचा पराभव इसवीसन 1729 च्या आरंभी केला. (ब्र.च.ले.43 ता.4/5/1729 पुढे चिमणाजीआप्पा देशात परत गेले व पवार, शिंदे ,होळकर वगैरे सरदार छत्रसालाच्या बोलण्यावरून बाजीराव बुंदेलखंडात मोहिमेवर जाण्यास निघाले होते, त्यांच्याबरोबर बुंदेलखंडाकडे रवाना झाले. बाजीराव माळव्यातील लष्करास घेऊन गेले असा उल्लेख शकावली पृष्ठ 57 मध्ये आहे .तेथे मार्च महिन्यात महंमदखान बंगश याचा पराभव होऊन मे महिन्यात त्याचा मुलगा कायमखान याच्याशी लढाई झाली. कायमखाना कडील लष्कर लुटले गेले व हत्ती घेतले गेले; तेव्हा तो 100 स्वारांनिशी पळून गेला.
या सुमारास छत्रपती शाहू महाराजांनी चातुर्मास्य सानिध्य राहून मनसुबा करण्याकरिता उदाजीरावांना घेऊन येण्याविषयी चिमाजी आप्पांना लिहिले ,(शा.रो.ले 107 ता. 23/4/1729) व बाजीरावासही सानिध्यात येण्याची आज्ञा केली ; यावरून उदाजीराव बुंदेलखंडातील मोहीम संपल्यावर बहुधा बाजीरावा बरोबर दक्षिणेंत जाऊन छत्रपतींच्या दरबारात हजर झाले असावेत. या सुमारास उदारावांनी नारोशंकर यास माळव्यात अंमलदार म्हणून पाठवले असल्याने त्यांच्याकडे "अम्मल कुल बाब कुल कानू " सुरळीत देणे विषयी इंदुरकर नंदलाल मंडलोई यांस ताकीदीची पत्रे लिहिली. (म.वी.1पृष्ट 363/ 64) ही पत्रे बहुदा त्यांनी दक्षिणेतुनच लिहिली असावीत.
संग्रहण -
*महेश पवार व अनिल पवार*
इतिहास माहिती प्रसारक व
सोशल मिडिया प्रमुख ,
*राजे धार पवार युवा संघटना*
*अध्यक्ष सुर्यजीत पवार*, महाराष्ट्र राज्य🙏
(अनमोल सहकार्य :- गडप्रेमी श्री.बाळासाहेब पवार)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...