माहूरगडाची रायबागण
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
उंबरखिंडीची लढाई- इतिहासातील सर्वात मोठा गनिमीकावा!
औरंगजेबाने
आपला मामा शाहिस्तेखान यास 'दख्खनचा सुभेदार' म्हणून नेमले होते. छत्रपती
शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असता त्याने पुणे, सुपे,
चाकण, इंदापूर इत्यादी परगणे काबीज केले. यावेळी शाहिस्तेखानाला सहाय्य
करण्यासाठी रायबागनला पुण्याला पाठविण्यात आले. शिवाजी महाराज
पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटून आले. त्यानंतर शाहिस्तेखानाने कारतलब
खानासोबत 'सावित्रीबाई' ऊर्फ 'रायबागन' हिला नेमले आणि चौल, कल्याण,
भिवंडी, पनवेल, नागोठणे काबीज करण्यासाठी मोठ्या फौजेनिशी त्यांना पाठवले.
कारतलब खानासोबत कच्छवाह, चतुर्भुज चौहान, अमरसिंग चंद्रावत, मित्रसेन व
त्याचा भाऊ, सर्जेराव गाढे, जसवंतराव कोकाटे हे मोगलांचे सरदारही मोहिमेत
होते.
२ फेब्रुवारी १६६१ रोजी हे युद्ध झाले. कारतलब खानाने लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता 'उंबरखिंडी'तून
प्रवेश केला, त्यावेळी तेथील १५ मैलांच्या चिंचोळ्या पट्ट्यात त्याच्या
सैन्यावर मावळ्यांनी बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू
केला. कारतलब खान, रायबागन व मोगलांच्या सैन्याने प्रतिहल्ला करण्याचा
प्रयत्न केला. पण हे जंगल एवढे घनदाट होते व मराठा सैन्य एवढे चपळ होते की
मोगल सैनिकांना शत्रू कुठे आहे, हे दिसतही नव्हते.
आता लढण्यात काहीही अर्थ नाही, हे जाणून रायबागनने कारतलब खानास शिवाजी महाराजांना शरण जाण्याचा सल्ला दिला. त्यावेळी, "तुम्ही
सर्व सैन्य वाघाच्या तोंडी देऊन मोठी चूक केली आहे. आता मरणाच्या दारात
उभ्या असलेल्या सैनिकांना वाचवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना शरण
जा व त्यांच्याकडे दया याचना करा. राजे मोगलांप्रमाणे नाही, शरण आलेल्या
सर्वांना माफी देतात!" असे खडे बोल रायबागनने कारतलब खानाला
सुनावले. तिचा सल्ला ऐकून कारतलब खानाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे दूत
पाठविला, मोठी खंडणी दिली व क्षमा मागितली. अशारितीने त्याने आपली सुटका
करून घेतली.
मुघल
सैन्याचे घोडे, हत्ती, खजिना, डेरे, शस्त्रे हे सर्व साहित्य मराठ्यांना
मिळाले. शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी 'उंबरखिंडीची लढाई' ही
महत्वाची लढाई मानली जाते. उंबरखिंडीची लढाई म्हणजे शिवरायांच्या युद्ध
तंत्राचे उत्तम उदाहरण
No comments:
Post a Comment