माहूरगडाची रायबागण
पोस्तसांभार ::सतीश राजगुरे
इ.स.
१६५८ मध्ये औरंगजेबाने आपल्या बापाविरुद्ध बंड पुकारले होते. तेव्हा मुघल
साम्राज्यात दोन गट पडले. एक दारा शुकोहचा तर दुसरा औरंगजेबाचा.
औरंगजेबाच्या बाजूने माहूरच्या उदाजीरामचा मुलगा जगजीवनराव लढत होता.
आग्र्याजवळ 'समुगढ' (Samugarh) येथे दारा शुकोह आणि
औरंगजेब यांच्यात निर्णायक लढाई झाली. या लढाईत जगजीवनराव मारला गेला.
त्याच्या मृत्यूनंतर सैन्याचे नेतृत्व एका स्त्रीने केले. सैन्यात
लढणाऱ्या एकमेव स्त्रीला औरंगजेबाने बघितले असावे. तिच्या असामान्य
शौर्याने तो प्रभावित झाला. या लढाईत औरंगजेबाचा विजय झाला. मात्र त्या
लढणाऱ्या स्त्रीचा लौकिक सर्वत्र पसरला होता.
औरंगजेबाने
स्वतःला रीतसर गादीवर बसवून घेतल्यानंतर त्या स्त्रीस बोलाविण्याची आज्ञा
केली. त्याप्रमाणे ती स्त्री दरबारात हजर झाली. तेव्हा ज्ञात झाले की ती
माहूरचे मोगल सरदार राजे उदाराम यांची पत्नी आहे. तिचे नाव सावित्रीबाई!
डोळ्यासमोर पोटच्या मुलाचा मृत्यू झालेला असून देखील खचून न जाता ती
प्राणपणाने लढली होती. याची दखल घेऊन औरंगजेबाने तिला 'रायबागन' (रॉयल वाघीण) हा खिताब बहाल केला.
'रायबागन'चे
संस्कृत रूप म्हणजे 'राजव्याघ्री' (राज्याची वाघीण). कवींद्र परमानंदकृत
श्री. शिवभारत या ग्रंथात तिचा याच नावाने उल्लेख केलेला आहे.
No comments:
Post a Comment