पुढे काही दिवसांत इ.स.१६६३ मध्ये महाराजांनी लाल महालावर हल्ला करून शाहिस्तेखानाची बोटे छाटली. तीन महिन्यांनंतर खान पुणे सोडून गेला. त्याला बंगालला पाठविण्यात आले. मात्र रायबागनला मराठ्यांच्या कारवाया थांबवण्यासाठी पुणे प्रदेशातच नेमण्यात आले.
१६६४ साली महाराजांनी पहिल्यांदा सुरत लुटली, त्यावेळी रायबागनचे सैन्य आणि मराठ्यांमध्ये चकमक झाली. यात रायबागनचा पराभव झाला व तिला कैद करण्यात आले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला मनसबदाराचा मान देऊन गौरव करून परत पाठवून दिले. पुढे १६८०-१६९० च्या दरम्यान रायबागनचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment