विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 23 March 2022

शरीफराजे भोसले गढी - खानोट

 

शरीफराजे भोसले गढी - खानोट 
पोस्त सांभार ::























 
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खानोट या गावी शहाजीराजे भोसलेंचे बंधू शरीफराजे भोसले यांची गढी आहे. खानोट गाव हे सोलापूर महामार्गावरील भिगवण गावापासून १० कि.मी अंतरावर आहे. सद्यस्थितीत गढीची दुरावस्था झालेली आहे. तरी दगडी प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. समोरच एक भैरवनाथ मंदिर, दीपमाळ आहे. चुन्याचे जाते पहायला मिळते. वीरगळ, पाषाणातील मूर्ती पहायला मिळतात. समोरच असलेल्या वाड्याची संपूर्ण भिंत मजबूत स्थितीत दिसून येते. आतमध्ये पडझड झालेली आहे. लाकडी तुळई आणि बांधकाम पाहून पूर्वी किती भव्यता असेल हे लक्षात येते.
मालोजीराजांनी आपल्या पराक्रमाने निजामशाहीत फार मोठा प्रभाव निर्माण केला. त्यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे, शहाजीराजांच्या नंतर त्यांना जे दुसरे पुत्र झाले त्यांचे नाव शरीफजी शहा. शरीफ नावाच्या एका अवलियाच्या कृपेने ही मुले झाली म्हणून त्यांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवण्यात आल्याचे मानले जाते. शरीफजी हे अतियश तेज:पुंज आणि पाणीदार असल्याचे शिवभारतकार म्हणतात. ज्या वेळी मालोजीराजे निधन पावले त्या वेळी त्यांच्या पत्नी उमाबाई यांनी आपल्या पुत्रावर नजर ठेवून शोक आवरला व सती जाण्याचा निर्णय रहित केला. विठोजीराजांनी राज्यकारभार हाती घेऊन शहाजी व शरीफजी या दोघांना वाढविले. मालोजीराजे वारल्याची बातमी निजामाला समजल्यावर त्यालासुद्धा आपल्या सेनेचे पंख तुटल्यासारखे वाटू लागले. निजामशाहने शहाजी व शरीफजी या मालोजींच्या दोन्ही पुत्रांना विठोजींसह बोलावून स्वतः सांत्वन केले. वडिलांची जहागिरी त्यांच्याकडे चालू केली. तसेच सुवर्णालंकार, सुंदर वस्त्रे, मौल्यवान रत्नमाला आणि हत्ती, घोडे देऊन त्यांचा सत्कार केला व आनंदाने त्यांना घरी पाठविले.
शरीफजींनी विठोजीराजांबरोबर निजामशाहीत सेवा केली. तीन वर्षांचे असतानाच त्याला पंचहजारी मनसबदारी मिळाली. शहाजीराजांच्या लग्नानंतर जुन्नर येथील विश्वासराव यांच्या गंगाव्वा ऊर्फ दुर्गाबाई या मुलीशी शरीफजी यांचा विवाह झाला. १६२४ मध्ये झालेल्या भातवडीच्या लढाईत शरीफजी धारातीर्थी पडले.शरीफजींचे पुत्र त्र्यंबकजी, त्यांचे पुत्र व्यंकोजी, नंतर माणकोजी, नंतर शहाजी (दुसरे) व नंतर परत माणकोजी, संभाजी, मालोजी व स्वरूपजी यांतील माणकोजी हे करवीरकरांकडे दत्तक गेले. शहाजीराजे (दुसरे) हे खानवटकर राजे भोसले म्हणून प्रसिद्ध झाले.
साभार - डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...