श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक
पोस्तसांभार :
श्रीमंत राजेभोसले वावीकर
छत्रपती
शिवरायांचे निधन झाल्यानंतर आणि शंभूराजांच्या गैरहजेरीत वयाने खूपच लहान
असलेले राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न झाला पण शंभूराजांनी
परिस्थिती व्यवस्थित हाताळली. गादीसाठी फुटीर राजकारण स्वराज्यात होऊ शकते
याचे भान राखून शंभूराजांनी राज्याभिषेक करवून घेण्याचा निर्णय घेतला.
शके
१६०२ रौद्र संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच २० जुलै १६८० रोजी
छत्रपती संभाजी महाराजांचे मंचकारोहण झाले आणि स्वतः स्वराज्याचे दुसरे
छत्रपती झाल्याचे घोषित केले.
(तारखे संदर्भात विविध मतभेद आढळतात याची नोंद घ्यावी)
बिकट
काळात आणि वातावरणात मंचकरोहणात राज्याभिषेक झाला होता पण शास्त्रार्थ
दृष्टीने त्यामध्ये दोष असल्याचे सर्वांना आढळले. विधियुक्त राज्याभिषेक
झाला पाहिजे असे शंभूराजांना पण वाटू लागले त्यानुसार मग रौद्रनाम
संवत्सरातील माघ शुद्ध ७, शके १६०२ म्हणजेच १४, १५ व १६ जानेवारी १६८१
यादिवशी शंभुराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला व ते स्वराज्याचे दुसरे
छत्रपती झाले.
राज्याभिषेकावेळी पूर्व कैद्यांना मुक्त करणे अशी
परंपरा असल्याने शंभू राजांनी त्यांना मुक्त केले. राज्याभिषेक प्रसंगी
छत्रपती संभाजी राजांनी स्वतःच्या नावे नवीन नाणी (चलन) बनवून घेतली. पुढील
बाजूस “श्री राजा शंभूछत्रपती” अशी अक्षरे कोरली तर मागील बाजूस “छत्रपती”
हे अक्षर कोरले
छत्रपती संभाजी महाराज यांची राजमुद्रा:
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते |
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि ||
अर्थ-
शिवपुत्र श्री शंभो यांची राजमुद्रा आकाशाप्रमाणे अमर्याद आहे व ज्याच्या
अंकाच्या आधारावर आश्वस्त अशी मुद्रा कोणाच्यावर छत्र म्हणुन असणार नाही ?
(सर्वांवर छत्र म्हणुन राहील.)
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा...
No comments:
Post a Comment