विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

शिंदेशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे

 

१९ जुलै १७४५
 शिंदेशाहीचे संस्थापक श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे 
पोस्तसांभार ::प्रसाद शिंदे 

---------------------------------------------------
शिंदेशाहीचा उदय---
कबूल केल्याप्रमाणे शिनदेशाहीचा उदय कधी झाला, कसा व कोणी केला याचे थोडे विवेचन करीत आहे. मला मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहीत असून यापेक्षा कोणाला अधिक साधार माहिती असेल तर द्यावी मला त्याचा उपयोग होईल.
M W Barve has written book -- Life of Ranoji Rao Sindia, Founder of Gwalior State. या नावावरूनच स्पष्ट होते की राणोजीनी ग्वाल्हेर राज्य स्थापन केले. त्याच श्रीमंत राणोजीनी शिंदेशाही स्थापन केली. त्याकडे वळण्यापूर्वी एक उल्लेख असा बर्वे यांनी नाव छान दिले आहे पण माझी थोडी निराश झाली कारण लेखकांनी राणोजींचे कार्य फार दिले नाही पण त्यांना स्लीपर बॉय मात्र म्हटले आहे. असो ते त्यांचे मत जे आम्हाला मान्य नसून आमच्या पुस्तकात त्याचे खंडन केले आहे. मूळ मुद्द्याकडे वळतो.
श्रीमंत राणोजी पराक्रमी होते. स्वराज्यासाठी त्यांनी अनेक वेळा ते सिद्ध केले. आशा माणसाचा उदय, उत्कर्ष कोणी रोखू शकत नाही. घराण्याची parshvbhumi, छत्रपती घराण्याशी नातेसंबंध आणि कर्तबगारी याच्या जोरावर त्यांचा विकास होत गेला. मोहिमांचा तपशील देत नाही. बादशहकडून मराठ्यांना माळव्याच्या चौथाईच्या सनदा मिळाल्या होत्या. त्या वसुलीवरून 1728 साली मुघल सुभेदार बहाद्दूर बंधुशी मराठ्यांचे युद्ध होऊन ते बंधू मारले गेले. मराठ्यांचा मार्ग मोकळा झाला. या विजयात राणोजी यांचा सहभाग होता. माळव्या सह मोठा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला.
सरकार व सरदारामध्ये त्या प्रदेशाची वाटणी झाली ती अशी -
शिंदे 30%, होळकर 30 %, सरकार 31% आणि पवार 9%. पुढे त्यात बदल झाले सरकार 45, शिंदे व होळकर प्रत्येकी 22.5 पवार 10%. याचा अमल 1732 पासून झाला. पण राणोजीना त्यापूर्वी माळव्यात वसुलीचे अधिकार मिळाले होते. राणोजी याना 1731 साली मुता लकी मिळाली होती.ती या घराण्याकडे कायम राहिली असे ऐतिहासीक कागदपत्रात स्पष्ट म्हटले आहे.
या वाटणीतून शिंद्याना 60 महाल, परगणे व सरकार आले. त्यात 9 राजाशी संबंध आला पैकी 2 राजे सामायिक होते. सुमारे 50 ते 60 लाख उत्पन्नाचा प्रदेश शिंद्याना मिळाला. या वाटणीबरोबर शिंदेशाही 1732 साली अस्तित्वात आली. श्रीमंत राणोजीनी उज्जैन ही आपली राजधानी केली त्याबद्दल इंग्रज लेखक Keene, Rulers of India Madhoji Patel या ग्रँथात लिहितात, Ranohi fixed his headquarters at the famous Hindu town of Ujjain the capital of the legendary Vikram aditya. पुढे श्रीमंत महादजी अखेर येथूनच कारभार केला.
हा थोडक्यात वृत्तांत, अधिक सविस्तर माहिती आपणाला आमच्या आगामी पुस्तकात मिळेल.
✍️प्रा.डॉ.पी.एन.शिंदे सर(सातारा)

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...