पोस्तसांभार :प्रसाद शिंदे
14 जाने 1761 रोजी पानिपतच्या युद्धात शिंदे घराण्याने फार मोठा पराक्रम गाजविला, अनेक शिंदे वीर हुतात्मा झाले. ऐन हातघाईचा युद्ध प्रसंग आला तेव्हा अनेक जण रणांगण सोडून पळाले. अशा अत्यंत बिकट आणि जीवन मरणाच्या प्रसंगी एक वीर पुरुष सदाशिव भाऊ बरोबर राहीला. समोर मृत्यू दिसत असता अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिला आणि लढत लढत धारातीर्थी अडला पण मागे हतला नाही, हे होते शिंद्यांचे इमान, स्वराज्यनिष्ठा आणि हौतात्म्य, जसे चुलते दत्ताजी , तुकोजी आणि अनेक शिंदे वीरांचे तसे या जनकोजींचे.
1744 साली चांभारगोंद सद्य श्रीगोंदा येथे श्रीमंत जयाजी आणि सखुबाई राणीसाहेब यांच्या पोटी जन्मलेले जनकोजी यावेळी केवळ 17 वर्षाचे होते. या वयात एवढा धीरोदत्तपणा, बलिदानाची तयारी हे त्या शिंदे वीरा लाच शोधावे.
जनकोजींच्या या शौर्याचे कवन दुर्गप्रसाद आसाराम तिवारी या उत्तर भारतीय शाहिराने कसे रचले आहे बघा, वाचा सांगा इतरांना --
राष्ट्राचा शामियाना, चौफेर तनावे तुटले।
धैर्याचा एकचि खांब, वायूशी झगडून डोले।
हा पडेल किंवा पडला, मोtaले बसती झोले।
त्या एका खडगावरती दखनची अब्रू होती।
ते खडग जयाचे हाती
त्या शिंदे कुलदीपाची
धन्य जननी, जनकोजी।।
प्रा.डॉ.पी.एन.शिंदे सर
No comments:
Post a Comment