विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 April 2022

मध्ययुगीन महाराष्ट्रातील न्यायदानाची **रवादिव्य* *पद्धती** *( दैवी क्रिया )*

 

*

मध्ययुगीन महाराष्ट्रातील न्यायदानाची **रवादिव्य* *पद्धती** *( दैवी क्रिया )*
*लेखन आणि संकलन श्री श्रीनिवास राजेंद्र शिंदे देशमुख शिक्केकरी कुडाळ परगणे जावळी प्रांत सातारा जिल्हा*
*संदर्भ- The Judicial System of Marathas by Vithal Trambak Gune *( 1953)*
*पे. द. शा. रुमाल नंबर- १, पुडके* *क्रमांक-१६, पुष्ट क्रमांक- १२५* ( *तिथी- शके १६४६ जेष्ठ* *वद्य ६ इंदूवसारे , इसवी सन १* *जून १७२४* )*
*विषय*
* श्री कुसाजी अनंत प्रभुणे* *( कुडाळ परगण्याचे मूळ देशपांडे)* *विरुद्ध अपाजी खंडो व रयाजी वाघोजी, जानो महादेव जोशी व अपाजी श्यामजी व अण्णाजी वेंकाजी अकलुजकर* **यांच्यातील कुडाळ परगण्याच्या ६३ गावाच्या देशकुलकर्णी आणि गाव कुलकर्णी पदावरून वाद **
आपण अनेक वेळा " मी मोठ्या
दिव्यातून बाहेर पडलो" किंवा मी मोठं दिव्य केले" असे बोलतो
किंवा ऐकतो.
*दिव्य* या शब्दाचा अर्थ दैवी शक्ती असा होतो.
शिवकाळात गावागावांमध्ये गोतसभा हा सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग होता. या गोतसभेत तेथील देशमुख देशपांडे , मुकादम, पाटील आणि बारा बलुतेदार यांचा समावेश असे. त्याकाळात गावाच्या वेगवेगळ्या तंटा आणि वादांचे निवारण हे गोतसभेद्वारे होत असे.
त्याकाळी राजसत्ता देखील गोतसभेच्या आड येत नसत.
न्यायदानात पुरावे म्हणून प्रत्यक्ष साक्षी, कागदपत्र घेतले जात परन्तु ज्यावेळी वादी आणि प्रतिवादी यांना साक्षी पुरावे मान्य न झाल्यास आणखी एक पद्धत न्यायदानात वापरली जात असे ती म्हणजे *दिव्य*
पूर्वीची जनता देवावर विश्वास
ठेवणारी, देवाला घाबरणारी होती. बरेचवेळा देवाच्या शपतेवर, बेलभंडारा उचलून व्यवहार होत असे आणि ते पिढ्यानपिढ्या पाळले जात.
*दिव्याचे प्रकार*
रवा दिव्य
अग्नि दिव्य
ऐरणी दिव्य हे दिव्याचे मुख्य प्रकार मानले जात.
यातील रवा दिव्य म्हणजे काय ते आपण पाहू.
*रवा दिव्य ही पद्धत पाचव्या शतकातील लिहिल्या गेलेल्या " नारद स्मृती ग्रंथातील - तप्त मास दिव्य " या प्रकाराशी मिळता जुळता आहे.*
मराठीमध्ये रवा म्हणजे लोखंडाचा तुकडा असा होतो.
जेव्हा गोतसभा दिव्य करण्यास मान्यता द्यायची त्यावेळी वादी आणि प्रतिवादी यांना तिथले अधिकारी आणि स्थानिक गोत सभा यांच्याकडे चिरपत्र घेऊन पाठविले जात असे. दिव्य हे शक्यतो तीर्थक्षेत्री केले जायचे. दिव्य करण्याची तिथी ठरविली जात असे.
दिव्य करण्याआधी सर्वात प्रथम वादी आणि प्रतिवादी यांच्याकडून आपण दिव्यास तयार असल्याचे राजीनामे घेतले जात. त्यानंतर दिव्याची प्रक्रिया केली जात असे. यात वादी किंवा प्रतिवादीच्या हाताच्या खाना खुणा प्रथम नोंद केल्या जात. नंतर जो दिव्य करणार आहे त्यास गरम तेलातून लोखंडाचा तप्त तुकडा काढावयास लावत आणि तो दुसऱ्याच्या हाती दिला जात असे.
त्यानंतर त्यांच्या हाताला कापडी पिशवीने गुंडाळले जात असे आणि त्यांना दोन दिवस एका ठिकाणी बंद करुन ठेवले जात असे. नंतर तिसऱ्या दिवशी त्यांचे हाताचे कापड काढून हात बघितले जात ज्याच्या हाताला फोड आले असत त्याला खोटे ठरविले जात असे आणि ज्याच्या हाताला फोड नाहीत त्याला खरे ठरविले जात असे. त्यानंतर त्यांना स्थलपत्र दिले जात असे ज्यात दिव्याबद्दची सविस्तर माहिती आणि गोतसभेचा दिव्य जिंकनाऱ्याच्या बाजूने शेरा असे. वादी आणि आपल्या मूळ गावी परत आल्यावर तेथील गोतसभा या स्थलपत्राच्या आधारे एक महजर करीत असे आणि न्यायदानाची प्रक्रिया पूर्ण होत असे.
सध्याच्या उपलब्ध कागदपत्रावरून असे दिसते की रवा दिव्य ही पद्धत महाराष्ट्रात इसवी सन १३०० ते इसवी सन १८०० या पाचशे वर्ष अस्तित्वात होती.
*सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील कुडाळ परगण्याच्या देशकुलकर्णी पदाच्या वादाविषयीचा १ जुन १७२४ रोजीचा महजर उपलब्ध* *आहे. वतनपत्राचे एकूण १० बंध उपलब्ध आहेत.*
त्यानुसार कुसाजी अनंत प्रभुणे ( कुडाळ परगण्याचे मूळ देशपांडे) विरुद्ध अपाजी खंडो व रयाजी वाघोजी व जानो महादेव जोशी व अपाजी श्यामजी व अण्णाजी वेंकाजी अकलुजनकर यांच्यात कुडाळ परगण्याच्या ६३ गावाच्या देशकुलकर्णी आणि गाव कुलकर्णी पदावरून वाद होता. यात जोशींनी रवादिव्य केले. या वादात *कुसाजी प्रभुणे हे खरे ठरले आणि त्यांना संपूर्ण ६३ गावचे देशकुलकर्णी पदाचे वतनपत्र श्रीमंत छत्रपती शाहू* *महाराजांनी कुडाळ परगण्याचे राजश्री शाहाजी शिंदे देशमुख कुडाळकर आणि राजश्री बाजी चिकणे देशमुख ( मेढा ) यांच्या उपस्थितीत दिले**
*पूर्वीच्या काळीश्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर मंदिर परिसरात निरंजना ( कुडाळी) नदीकाठी देशपांडे घराण्यातील पुरुषांच्या* *तीन समाध्या होत्या परंतु कालौघात एकच समाधी उपलब्ध आहे. सदरची समाधी ही *श्री कुसाजी अनंत प्रभुणे - देशपांडे यांची आहे. या समाधीचा जीर्णोद्धार त्यांच्या वंशजांनी इसवी १९९३ साली केला आहे.*

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...